Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeआरोग्यHair care :  केस गळतात! मग काय करायचे?

Hair care :  केस गळतात! मग काय करायचे?

मागील लेखात आपण Hair wash routine बद्दल माहिती घेतली होती. जसे आपण skin साठी skin care routine follow करतो, तसेच Hair wash routine सुद्धा follow केलेले चांगले असते. Hair wash करताना routine मध्ये Shampoo, conditioner आणि live in Serum याचा समावेश केला जातो. आजच्या लेखात आपण काही केसांच्या समस्यांबद्दल माहिती घेऊ.

केसांत होणारा कोंडा (Dandruff) हा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे कोरडा कोंडा (Dry Dandruff) आणि दुसरा म्हणजे तेलकट कोंडा (oily Dandruff). कोरडा कोंडा म्हणजे असा कोंडा जो केसांपासून वेगळा होऊन कपड्यांवर, चेहऱ्यावर पडलेला दिसतो. या कोंड्याचे कारण हे scalp वर येणारा अतिरीक्त कोरडेपणा. कोंड्याचा हा प्रकार सामान्यत: जास्त आढळतो. हा कोंडा होण्यामागे कारण म्हणजे, चुकीचा Shampoo, Hormonal imbalance, काही वेळा शॅम्पू नीट धुतला गेला नाही तर, त्याचे एक प्रकारचे आवरण तयार होते आणि कोंडा होतो. हा कोंडा योग्य तो anti-dandruff shampoo वापरून जाऊ शकतो. Anti-dandruff shampoo चा वापर हा औषधासारखा झाला पाहिजे. म्हणजे, कोंडा गेला की, या शॅम्पूचा वापर थांबवला गेला पाहिजे.

तेलकट कोंडा (oily dandruff) ही समस्या जास्त गंभीर आहे. हा कोंडा scalp ला केसांच्या मुळाशी चिकटून रहातो. केसात घाम येणे, केस खूप दिवस न धुणे, Hormonal imbalance इत्यादी याची कारणे आहेत. हा कोंडा केसांच्या मुळाशी चिकटून राहात असल्यामुळे केसांची मुळे block होतात. अशाच वेळी sebaceous Glands मधून sebum Secrete जे होते, ते अडकून राहाते. तिथे bacterial infection होऊन हा कोंडा तयार होऊ शकतो. तेलकट कोंड्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले shampoo वापरावेत. त्याचा जास्त चांगला उपयोग होतो.

हेही वाचा – Hair care : शॅम्पू वापरण्यापूर्वी…

केसात होणारी चाई

चाई म्हणजे डोक्यावरच्या एखाद्याच भागात केस गळतात. अनुवांशिकता, Hormonal changes, काहीवेळा खूप दिवस एखादे आजारपण, त्यावरची औषधे यामुळे चाई होऊ शकते. शक्यतो चाई असेल तर डॉक्टरांना विचारून त्यावर औषध घ्यावे.

केस गळणे ही सर्वात कॉमन समस्या आहे. दिवसातून अंदाजे 50 ते 150 केस गळत असतील तर, त्याला ‘केस गळणे’ म्हणत नाहीत. त्याहून जास्त केस गळत असतील आणि नवीन केस येण्याच्या गतीमध्ये तफावत असेल तर त्याला ‘केस गळणे’ असे म्हणतात. केस गळणे हे अनुवांशिक, आजारपण, Hormonal imbalance, चुकीच्या उत्पादनांचा वापर, केसांवर होणाऱ्या treatmets (Hair colour, perming, straighting), केसांना मिळणारी over heat (dryer किंवा iron चा अतिरिक्त वापर), उत्पादनांचा अतिवापर, menopause इत्यादी गोष्टींमुळे होऊ शकते. काही वेळा उत्पादन बदलले किंवा त्यांचा वापर कमी केला की, केस गळणे कमी होऊ शकते. पण शारिरिक समस्यांमुळे जे केस गळतात त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच इष्ट.

हेही वाचा – Hair care :  केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?

खरंतर, पांढरे केस ही समस्या नाही. केसांच्या रंग प्रदान करणारे melanin असते, कालांतराने त्याचे उत्पादन मंदावत जाते आणि थांबते. ज्यामुळे केस पांढरे होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, समस्या नाही.

पुढील भागात आपण केसांबद्दल अजून माहिती बघू…

(क्रमश:)

lee.parulekar@gmail.com

लीना परुळेकर
लीना परुळेकर
I have completed my beauty certification from BUTIC COLLEGE OF BEAUTY OF MAYA PARAJAPYE FROM PUNE. PASSED "CIDESCO EXAMINATION" IN 2003. It is an international examination for Beauty. Worked in BUTIC SALON AS AN OPERATOR AND WORKED AS AN INSTRUCTOR IN BUTIC COLLEGE OF BEAUTY.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!