डॉ. श्रीकांत राजे
होमिओपॅथी चिकित्सक
वजन वाढीला मानसिक चिंता आणि ताण कारणीभूत असतो. अगदी “आपण बिल्कुल टेंशन घेत नाही,” म्हणणारे असो किंवा “टेंशन नै लेने का…” असे म्हणणारे “सर्किट” असो… हे सर्व कळत-नकळत ताण… कॉर्टिसॉन… लठ्ठपणाचे शिकार झालेले असतात.
वस्तुत:, कंठस्थ ग्रंथी (थायरॉईड) स्त्राव रक्तात सोडते, त्यामुळे विविध टप्प्यानंतर हाडात कॅल्शियम स्थिरावते. एकूणच चालत्या-फिरत्या शरीराला वाढीसाठी आणि एकूणच शारिरीक, मानसिक, भावनिक, विकासाला थायरॉक्झिन हे संप्रेरक प्रोत्साहन देते. निर्माण होणारी उष्मा आणि प्रोत्साहीत चयापचय यामुळे वाढ / विकास छान होतो.
श्वसन (सपाट पोट असताना) छातीचा पिंजरा “फुलतो कमी होतो”… फुफ्फुसाच्या आकुंचन प्रसरणामुळे हृदय निरोगी राहते. “सुटलेल्या पोटाने” मात्र छातीचा पिंजरा न हलता “पोटच आत बाहेर” करते. नंतर पोट सुटण्याला मदत होते.
हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!
आता कमरेच्या मणक्यावरील ताण वाढतो. डिस्क झिजणं सुरू होते. या झिजायला मीठ, नमकीन, सोडा, अति तिखठ हे मदत करतात. आता सुटलेले पोट आणि कंबर आपला “ताण” गुडघ्यावर पाठवितात. कंबर दुखी कमी होत नाही, ती गुडघ्याकडे “ट्रान्सफर” झाल्याने कमी वाटते. नंतर कंबर आणि गुडघे दोन्ही “सफर” होतात.
वजनाने गती, हालचाल कमी होते. अंतर्गत अवयवांचे रक्ताभिसरण मंद गतीने होते. रक्तसंचय वाढतो. त्यामुळे अवयवाच्या रुटीन कामात अडथळा येतो. यकृत हे एक रक्तसंचय करणारा अवयव आहे. परिणामी कालांतराने “फॅटी लिव्हर” ला सामोरं जावं लागतं. पित्ताशयाची तिच बोंब. पित्ताशय अतिरेकी पित्ताचा निचरा न झाल्याने पित्ताचे खडे (बाईल स्टोन) सुरू होतात…
मुत्रपिंड अनावश्यक क्षार आणि पाणी उत्सर्जन करते. परंतु पोट सुटल्याने वारंवार न वाकल्याने मूत्रवाहिन्यांच्या आतून क्षार जमतो. (पाण्याच्या टाकीत आतून जमतो तसा) त्याच्या काठिण्यासाठी ऑक्झलिक आम्ल “ऑक्झलेट” बनविते. नंतर स्टोन झाल्याचे “बारसं” होते.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी आहार-विहार
मी “चालण्या”सोबत “वाकणं” केलं तर ही शक्यता कमी होईल. (पण बुटाचे बंद “वाकून” बांधण्यापेक्षा “पायच वर करून” आम्हीच पोटाला वाकण्यापासून वाचवतो.
ईश्वराने शरीर सर्व अपेक्षित साधनांनी जन्माला घातले आहे. आपण कृतीशील, प्रयत्नवादी व्हावे म्हणून त्याने स्वभाव आणि सोबती जन्माला घातले. “तू कृतीशील रहा, मी पाठीशी आहे.” म्हणून तो सोबती बरोबर असतो. परंतु सर्व सुखसोयी नवनवीन कल्पनांच्या विकासासाठी नसून विश्रांतीसाठी आहेत, असा आपण सोयीस्कर अर्थ लावतो.
शासकीय मोफतधान्य वितरण व्यवस्था ही काम करताना कुणी उपाशी राहू नये या उद्देशाने बनली. तर आंम्ही “धान्य फुकट मिळते तर काम कशाला करायचं!” असं समजतो. अशी वृत्ती वजन वाढविते. कृतीशील, गतीशील राहिले तर प्रकृती आणि प्रगती दोन्ही साध्य होईल. “चरैवेती चरैवेती” वृत्ती हवी. वजनच नाही तर, संपूर्ण आरोग्यच आनंददायी असेल…
मोबाइल – 9921 548 851


