प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
हा आठवडा धावपळीचा असेल. रवी, बुध, केतू पंचम स्थानात आहेत, बुधाचा अस्त झाला आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक बोलणे योग्य ठरेल. आपल्या बोलण्याचा विपर्यास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत जास्त भावनिक न होता निर्णय घ्या. महिलांनी घराकडे लक्ष द्यावे. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागू शकते. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळू शकेल, स्पर्धेत भाग घ्यावा.
वृषभ
या आठवड्यात रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मागील काही दिवसांपासून, काही कारणांमुळे मागे पडलेली कामे पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागू शकते. महिलांनी घरात गरज असेल तेव्हाच बोलावे आणि विचारल्यास स्वतःचे मत द्यावे. छोटे प्रवास होतील. विद्यार्थ्यांना घरात केलेल्या कामाचे कौतुक होईल, छान बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
या आठवड्यात कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. ऑफिसमधील शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करून इतर सहकाऱ्यांना मदत करू शकाल. महिलांनी कामाचे नियोजन नीट करावे. घरात किराणा सामान भरून ठेवा, ऐनवेळी फजिती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मित्रांबरोबर फिरायला जायला मिळू शकेल, आनंदी रहाल.
कर्क
या आठवड्यात कामापेक्षा ऑफिसमधील राजकारणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायिक लोकांना एकापेक्षा जास्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबात मान मिळेल. कुटुंबासाठी खर्च करू शकाल. घरी पाहुणे येण्याची शक्यता असल्याने महिलांनी सज्ज रहावे. घरात वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना छोटी कामे करून पैसे मिळवता येऊ शकतात आणि घरात स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे देण्याचा आनंद मिळू शकेल.
सिंह
या आठवड्यात कामे नियोजित वेळेत पूर्ण करू शकाल. वरिष्ठ आनंदी राहतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी हा आठवडा चांगला आहे. मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो. व्यावसायिक वर्गाला वडिलोपार्जित संपत्तीबाबतचे निर्णय मार्गी लागतील. कोर्टातील अडकलेली कामे मार्गी लागतील. महिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, गिफ्ट मिळतील. आनंदी रहाल. विद्यार्थ्यांनी मित्रांबरोबर उगाच वाद वाढवू नका. काही गोष्टी पटल्या नाहीत तर, बाजूला व्हा.
कन्या
हा आठवडा नेहमीची ठरलेली कामे पूर्ण करण्यात जाईल. तुम्ही केलेले कामाचे नियोजन उपयोगी येईल. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच घेऊन जाऊ शकतात. घरात पाहुणे येतील. महिलांसाठी घरात आणि कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. घरातील कामात त्यांना मदत मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रामाणिकपणे करावा, यश नक्की मिळेल.
हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…
तुळ
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. नवीन संधी मिळतील, त्यांचा उपयोग करून घ्या. कामाच्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करा, शॉर्टकट घेऊ नका. जवळची वाटणारी व्यक्ती ऐनवेळी धोका देण्याची शक्यता आहे, म्हणून सतर्क राहावे लागेल. बोलताना विचारपूर्वक बोला. दुसऱ्याचे बोलणे पूर्णपणे ऐकूनच स्वतःची प्रतिक्रिया द्या. महिलांना नवीन संधी मिळतील, प्रयत्न नक्की करावा. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात प्रगती करू शकतील, तसेच नवीन योजना अमलात आणू शकाल.
वृश्चिक
हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. व्यावसायिक वर्गाला नवीन योजनांचा लाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना कामात प्रगती करता येईल. नवीन प्रोजेक्ट मिळू शकतील. महिलांच्या घरातील वस्तू हरवण्याची शक्यता आहे, काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी ‘आपले काम भले आणि आपण भले’ या वृत्तीने वागावे. मित्रांच्या भांडणात पडू नका.
धनु
या आठवड्यात स्वतःची कामे प्रामाणिकपणे करा. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आर्थिक निर्णय योग्य मार्गदर्शनाखाली घ्या. घरात छोटी कामे करावी लागू शकतात. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत तरी, उत्साह कायम ठेवा. महिलांना इतरांच्या मनाप्रमाणे वागावे लागू शकते, वाद घालू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यश तुमचेच आहे.
मकर
या आठवड्यात तुमची कामे सहजपणे पूर्ण होतील. नवीन खरेदीचा आनंद मिळू शकेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकाल. भावंडांबरोबर भेटीगाठी होऊ शकतात. मित्रांबरोबर फिरण्याचे बेत आखू शकाल. महिला मनाप्रमाणे स्वतःसाठी खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांना लांब सहलीचे बेत आखता येतील. पॉकेटमनी जास्त मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
या आठवड्यात ऑफिसमध्ये काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. तब्येतीची छोटी कुरबुरी राहतील. आहार आणि व्यायाम योग्य मार्गदर्शनाखाली घ्या, फायदा होऊ शकतो. तब्येतीमुळे वर्क फ्रॉम होम घ्यावे लागू शकेल. महिलांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. पथ्य पाळावे लागेल. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.
मीन
या आठवड्यात ठरलेली कामे वेळेत पूर्ण होतील. सकारात्मक विचार करा. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःकडे लक्ष द्यावे लागेल. योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांना कामाची जबाबदारी देणे योग्य ठरेल. घरात उत्साही वातावरण ठेवण्यासाठी महिलांनी स्वतः आनंदी आणि उत्साहात रहावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात नियमितपणा खूप गरजेचा आहे. नवीन पुस्तके वाचणे आवश्यक आहे.
हेही वाचा – कलियुगातील सावित्री