मेष
या आठवड्यात निर्णय घेताना भावनिक होऊ नका, विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरदार वर्गाला हा आठवडा सामान्य राहील. सगळी कामे सुरळीत होतील. व्यावसायिक वर्गाने सांभाळून बोलावे. व्यावसायिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमची मते पटवून देऊ शकाल. महिलांना जोडीदाराची मदत मिळेल. त्यांचे निर्णय अचूक ठरतील. विद्यार्थ्यांच्या मुलाखती यशस्वी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी कला विश्वात रमू शकतात.
वृषभ
या आठवड्यात नोकरदार वर्गाकडे नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. नवीन सहकाऱ्याबरोबर काम करावे लागेल. व्यावसायिक लोकांना नवीन संधी मिळतील, त्याचा उपयोग करून घ्यावा. व्यावसायिक जोडीदाराकडून फायदा होण्याची शक्यता आहे. लग्नसमारंभासाठी महिलांचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेता येईल, कॉलेज इव्हेंटमध्ये सहभागी व्हा.
मिथुन
या आठवड्यात नोकरदारांना सांभाळून राहावे लागेल. कुठलाही निर्णय घेताना सखोल विचार करावा. नोकरी बदलण्याचा विचार करू नये. व्यावसायिक वर्गाला मिळालेली कामे लवकर पूर्ण करावीत. नवीन कामाच्या मागे लागू नये. येणी वसूल करावीत. महिलांना घरातील रखडलेली कामे पूर्ण करता येतील. नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांनी वाहने सावकाश चालवावीत. कागदपत्रे सांभाळून ठेवावीत.
कर्क
या आठवड्यात नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसाठी नवीन टार्गेट मिळेल; ते पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला काम आणि कुटुंबासोबत फिरायला जाणे दोन्ही एकत्र साधता येईल. नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. महिलांच्या बाबतीत घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरात धार्मिक कार्य घडेल. विद्यार्थ्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परिश्रम करावे लागतील.
सिंह
या आठवड्यात मन प्रसन्न नसेल. कुठलेही काम करताना उत्साह नसेल. कामे रखडतील; त्यामुळे नोकरदारांना कंटाळा येईल. व्यावसायिक वर्गाची नियोजित कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मेडिटेशन करा आणि सूर्याची उपासना करा. छोटे प्रवास कराल; उत्साह वाटेल. महिलांचा नवीन खरेदी करण्यात वेळ जाईल आणि नवीन ग्रुपमध्ये सामील होऊ शकाल. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत जास्त वेळ घालवू नये, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
कन्या
या आठवड्यात नोकरदारांना खूप धावपळ करावी लागणार आहे. कामे पूर्ण करण्यात समाधान मिळेल. नवीन संधी मिळेल. कामाचे कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाला कामासाठी प्रवास होईल. काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. महिलांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. जुन्या मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करता येईल, नवीन ओळखी होतील.
तुळ
या आठवड्यात नोकरदारांना रखडलेली कामे पूर्ण करता येतील. कोणतेही काम विचारपूर्वक करा. सहकारी मित्रांना विश्वासात घ्या. प्रश्न संयमाने सोडवा. व्यावसायिक वर्गाने जपून कामे करावीत. कायद्याचे पालन करावे. महिलांनी आपल्या वागणुकीतून आणि बोलण्यातून नाती जपावीत. विद्यार्थ्यांनी आपली मते इतरांवर लादू नयेत, अभ्यासात लक्ष द्यावे.
वृश्चिक
या आठवड्यात उष्णतेचे आजार होण्याची शक्यता आहे. पाणी भरपूर प्यावे. रवी, मंगळ आणि शुक्र वृश्चिक राशीत आहेत. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरदारांनी सांभाळून वागावे आणि बोलावे. व्यावसायिक वर्गाकडून कामे पटापट होतील. अधिकार वापरून कामे करून घेऊ शकाल. महिलांच्या बाबतीत जुने आजार उद्भवतील, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना मित्रांमध्ये स्वतःची छाप पाडता येईल, वक्तृत्व स्पर्धा गाजवू शकाल.
धनु
मागील आठवडा खूप तणावात गेला. या आठवड्यात छान प्रवास होईल. मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. जुने परिचित भेटतील. नोकरदारांसाठी आठवडा सर्वसाधारण राहील. कामे करत रहा; त्याचा फायदा नंतर होईल. व्यावसायिक वर्गाने आपले वर्चस्व तसेच ठेवावे, त्यामुळे कामे लवकर होतील. महिलांनी सगळ्यांशी मैत्री करू नये, नीट पारखून मगच मैत्री करावी. विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू शकतो; नवीन ओळखी होतील. त्यातून नवीन शिकायला मिळेल.
मकर
या आठवड्यात भाऊ, बहिणी, आजोळचे नातेवाईक भेटतील. नोकरदारांना कामाचा ताण कमी असेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. व्यावसायिक वर्गाला ओळखीतून नवीन काम मिळेल. कामाचा मोबदला चांगला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. छोट्या कारणांवरून महिलांनी वाद घालू नये, समोरच्याचे म्हणणे ऐकून मगच आपले मत द्यावे. विद्यार्थी नवीन कोर्सच्या शोधात असतील तर, चांगली संधी मिळेल आणि मनाप्रमाणे काम करता येईल.
कुंभ
या आठवड्यात वडिलांकडील नातेवाईक भेटण्याचा योग आहे. नोकरदारांना सुट्टी मिळण्यात अडचणी येतील. कामाचा ताण राहील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. जुनी येणी मिळतील. महिलांना पौर्णिमेच्या सुमारास मुलांबाबत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
मीन
या आठवड्यात मंगलकार्यात सहभागी होण्याचा योग आहे. त्या निमित्ताने प्रवास घडेल. नातेवाईक भेटतील. जुन्या आठवणी निघतील; ताजेतवाने वाटेल. नोकरदारांची कामे पटापट होतील. वरिष्ठ खूश राहतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. दानधर्म कराल. महिलांचा लांबचा प्रवास होईल. खरेदी करता येईल. आनंदी राहाल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, योग्य मार्ग मिळेल. गुरूचे पाठबळ राहील.


