मेष
या आठवड्यात जरा तब्येतीच्या तक्रारी संभवतात, योग्य आहार आणि पथ्ये पाळावीत. नोकरदारांनी कामाकडे बारीक लक्ष देऊन काम करावे, वरिष्ठांकडून आलेली कामे आधी पूर्ण करावीत. व्यावसायिक लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. निर्णय सखोल विचार करूनच घ्यावा. महिलांनी रोजचे रुटिन सुरू करावे, तथापि, तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना सुट्टीत घरच्यांसह देवदर्शनाला जाता येईल.
वृषभ
या आठवड्यात राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिक लोकांना नवीन प्रोजेक्टवरील काम वेगाने सुरू करता येईल, त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांना बदलीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन महिला पिकनिकचा बेत ठरवतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. त्याबद्दल कौतुक होईल आणि बक्षीस मिळेल.
मिथुन
या आठवड्यात नोकरदारांवर कामाचा खूप ताण पडेल. ऑफिसचे तास कमी पडतील, घरी यायला उशीर होईल. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, वेळेवर जेवण करा. व्यावसायिक लोकांनी इतरांवर अवलंबून राहू नका, कामात स्वतः लक्ष घाला. प्रथमोपचाराची सामग्री घरी ठेवावी. महिलांनी घरात काम करताना सावध राहावे, घाईगडबड करू नये. आपल्या प्रोजेक्ट किंवा थिसिसचा विषयाबाबत विद्यार्थ्यांनी मित्रांबरोबर विचारविनिमय करू नये.
कर्क
या आठवड्यात मनाप्रमाणे कामे होतील. सुट्टीवर गेलेले सहकारी कामावर आल्याने कामाचा ताण कमी होईल. नवीन प्रोजेक्टला वेळ देऊ शकाल. व्यावसायिक कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे, पण शांत रहा. महिलांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी. त्याचबरोबर, सतत तक्रार करण्याचे टाळून स्वतःचे छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतून मार्ग काढता येईल, त्यासाठी सकारात्मक विचार करा.
सिंह
या आठवड्यात नवीन योजना अमलात आणण्यासाठी मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कामे पूर्ण करू शकाल. नवीन आणि जुने संबंध उपयोगी पडतील. पैशाच्या गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. महिलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, त्या संधीचा फायदा घ्या. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात प्रगती करता येईल, नवीन संधी मिळू शकतील.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय
कन्या
हा आठवडा खूप घाईगडबडीचा जाणार आहे. घरातील राहिलेली कामे आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरदारांना कामाच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहता येणार नाही. महिलांना मैत्रिणींबरोबर छान वेळ घालवता येईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विद्यार्थ्यांनी मेहनत करावी, यश नक्की मिळेल. तुम्हाला जे हवे ते प्रयत्नपूर्वक मिळेल.
तुळ
हा आठवडा सुरुवातीला जरा धावपळीत जाईल, नंतर मात्र कामे रेंगाळतील. काम करताना इतरांना कमी लेखू नका. सहकारी आणि मित्रांना बोलण्याची संधी द्यावी, त्यांचे बोलणे नीट ऐकून, विचार करून तुमचे मत मांडा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. महिलांना नवीन मैत्रिणी मिळतील, आनंदात वेळ घालवू शकाल. स्वत: निवडलेल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल, सकारात्मक विचार करा, मोठी स्वप्ने बघा.
वृश्चिक
हा आठवडा मस्त आरामात जाणार आहे. सगळी कामे वेळेवर आणि अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. सहकारी, मित्रपरिवार मदत करतील. तुमच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासामुळे अवघड कामे पूर्ण करू शकाल. वरिष्ठ खूश होतील. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. महिलांना घरातील आणि बाहेरील कामे धडाडीने पूर्ण करता येतील, मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा, नको ते धाडस करू नये.
धनु
हा आठवडा आरामदायी आहे. गेल्या महिन्यापासून एखादी काळजी लागली होती ती संपेल. नवीन गोष्टी शिकता येतील. तुमची प्रॉपर्टी किंवा शेअरविषयीची कामे मार्गी लागतील. त्यासाठी जवळच्या लोकांची मदत मिळेल. सकारात्मक विचारपद्धतीमुळे तुमच्याजवळील लोक लांब जाणार नाहीत, ते समजून घेतील. महिलांना बहिणीविषयी चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा द्यावी, यश मिळेल. वादविवाद स्पर्धेतही भाग घ्यावा.
मकर
हा आठवडा खूप आरामदायी असेल. कामाचा ताण जास्त नसेल. सहकारी तुमची कामे स्वतःहून पूर्ण करतील. मित्रांसोबत ट्रिपला जाऊ शकाल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवाल. व्यवसायिकांची कामानिमित्त थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे. घरात पाहुणे येतील, त्यांच्या पाहुणचारात महिलांचा वेळ जाईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावे.
कुंभ
या आठवड्यात अतिघाईमुळे कामात चुका होण्याची शक्यता आहे, काळजी घ्यावी आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कोणी कितीही सल्ले दिले तरी स्वतःच्या अंतर्मनाचे ऐका. व्यावसायिक लोकांनी हातातील संधी सोडून संभाव्य नवीन संधींच्या मागे जाऊ नये. महिलांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना जुने बालपणीचे मित्र भेटतील, छान वेळ घालवाल.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
मीन
हा आठवडा आरामदायी जाईल. बहुतेक गोष्टी मनाप्रमाणे घडतील. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पण त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या. छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. भावा-बहिणींच्या भेटीगाठी होतील. पाककौशल्याबद्दल महिलांचे कौतुक होईल, घरात मान मिळेल. विद्यार्थ्यांनी माणसे ओळखायला शिकावे. कोण तुमच्या उपयोगाचे आणि कोण तुमचा गैरवापर करून घेत आहे, हे वेळीच जाणून घ्यावे.


