मेष
या आठवड्यात आपली कामे स्वतःच पूर्ण करण्यावर भर द्या; इतरांवर अवलंबून राहू नका. नोकरदारांच्या दृष्टीने वातावरण चांगले राहील; सगळी कामे जबाबदारीने पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला स्थितिजन्य लाभ मिळण्याची शक्यता आहे; अनपेक्षित लाभही संभवतो. तरुण–तरुणींचे विवाह ठरण्यासाठी योग्य कालावधी आहे. महिलांना कामानिमित्त प्रवास घडेल; प्रवासात कार्यसिद्धी होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे.
वृषभ
या आठवड्यात शुभग्रहांमुळे अनुकूल वातावरण राहील. बुद्धिजीवी, कलाकार आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ संभवतो. नोकरदार जातक आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकतील. व्यावसायिक वर्गाने नवीन संधींचा उपयोग करून घ्यावा; नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील; परदेशी प्रवास संभवतो. महिलांना माहेरील मंडळींबरोबर छान प्रवास घडेल. विद्यार्थ्यांना नवीन पार्ट-टाइम जॉब मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
या आठवड्यात शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी तसेच व्यवसायात अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. व्यवसायात स्पर्धक प्रबळ होतील. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. कामगार त्रास देण्याची शक्यता आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळणार नाही; जास्त काम करावे लागू शकते. विद्यार्थ्यांच्या समाजातील मान्यवर लोकांशी भेटीगाठी होतील.
कर्क
या आठवड्यात तरुण–तरुणींचे विवाह ठरतील. नवीन नियोजन फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकी फायद्याच्या ठरतील. नोकरदारांची दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिक वर्गाने जाहिरातबाजीला फसू नये; कोणाच्याही गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. महिलांनी कुटुंबात वादविवाद होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी; अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
सिंह
या आठवड्यात वक्री ग्रहमानाचा परिणाम होणार आहे. काही कामे विलंबाने होतील. नोकरीत नवीन बदल होतील; प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गात मोठ्या उलाढाली संभवतात; नवीन प्रोजेक्ट मिळतील; करारावर सही होईल. सरकारी कामात अडचणी येतील, पण तुम्ही मार्ग काढू शकाल. महिलांना मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल; हातून दानधर्म होईल. विद्यार्थ्यांना कार्यक्षेत्रात यश मिळेल; वाहने जपून चालवा.
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
कन्या
या आठवड्यात विचारामध्ये सकारात्मकता असेल. जवळील व्यक्तीसोबत भविष्यातील नियोजन करू शकाल. नोकरदारांना नवीन संकल्पना आणि विविध माध्यमांतून आपले मत मांडता येईल. आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल; त्यामुळे आनंदी राहाल. व्यावसायिक वर्गाने सार्वजनिक जीवन सांभाळावे; वाद–विवाद टाळावेत; खरेदी–विक्रीतून फायदा होईल. महिलांकरिता धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे; दानधर्म करू शकाल. विद्यार्थ्यांना वातावरण अनुकूल राहील; मनाप्रमाणे मार्क मिळतील.
तुळ
या आठवड्यात कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका; फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची तसेच, बदलीचीही शक्यता आहे. व्यावसायिक वर्ग धंद्यात तेजी अनुभवेल; चांगली उलाढाल होईल; भागीदाराच्या व्यवसायातून विशेष फायदा होईल. महिलांच्या बाबतीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे; वाणी आणि बुद्धीचा योग्य वापर करावा. विद्यार्थी नवीन कार्य मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने हाती घेतील आणि पूर्ण करतील.
वृश्चिक
या आठवड्यात गुरुतुल्य किंवा सन्मानीय व्यक्तीचा सहवास लाभेल. मन अध्यात्माकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे; सहकुटुंब धार्मिक स्थळाला भेट द्याल. नोकरदारांना आर्थिक फायदा होईल. जुने वाहन विकून नवीन खरेदी करण्यासाठी उत्तम आठवडा आहे. व्यावसायिक वर्गाच्या नवीन योजना सुरू होतील; कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. महिलांनी सहलीचे बेत आखावेत; मैत्रिणींना घेऊन सिनेमा पाहू शकाल. विद्यार्थ्यांना भविष्यासंबंधी गंभीर्याने विचार करावा, निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या.
धनु
या आठवड्यात स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या; खाण्या–पिण्यावर नियंत्रण ठेवा; पथ्ये पाळा. नोकरदार रखडकलेली कामे पूर्ण करू शकतील; सहकाऱ्यांचे कामही करावे लागेल; त्यामुळे चिडचिड होऊ शकते. व्यावसायिक वर्गासमोर अचानक कामगारांचे प्रश्न उद्भवू शकतात; मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सकारात्मक विचार करून सुवर्णमध्य काढा. महिलांच्या बाबतीत घरात छोट्या समस्या उद्भवतील; शांतपणे सोडवू शकाल. विद्यार्थ्यांनी बाहेरचे खाणे टाळावे; घरचा डबा न्यावा; संसर्गाची भीती असल्याने आजारी मित्राबरोबर राहू नका.
मकर
या आठवड्यात प्रगतीचा आलेख उंचावेल. नोकरदारांना नवीन क्षेत्रात प्रगती करता येईल; नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर, उत्तम आठवडा आहे; नवीन नोकरीसाठी मुलाखती देऊ शकता. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल; सामाजिक क्षेत्रातून सन्मानित व्हाल; अडकलेले पैसे मिळतील. विवाहयोग्य तरुण–तरुणींचे विवाह ठरतील. महिलांनी कुटुंबात आणि मैत्रिणींबाबत विनयाने वागावे; गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे; इतरांशी स्पर्धा करू नका; कायद्याने वागा.
कुंभ
या आठवड्यात नैराश्य संपेल; प्रश्न संपतील; नवीन मार्ग सापडतील. नोकरी मिळवण्यासाठी मध्यस्ती किंवा ओळखीचा उपयोग होईल. नोकरदारांची सगळी कामे वेळेवर होतील; वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील; कर्ज फेडू शकाल; आर्थिक स्थिती उत्तम राहील; नवीन संधी मिळतील. विवाह इच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल; जीवनात आनंदी–उत्साही वातावरण राहील. विद्यार्थी शिक्षणात चांगली प्रगती करू शकतील; गुरूजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल.
हेही वाचा – चंद्र आहे साक्षीला…
मीन
या आठवड्यात आर्थिक प्रगती होईल. नोकरदारांना पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल; शेअर मार्केटमध्ये लाभ संभवतो. व्यावसायिक वर्गाला भागीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल; उत्पन्नात वाढ आणि व्यवसायात तेजी अनुभवता येईल. महिलांकरिता स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य कालावधी आहे. विद्यार्थ्यांना सुवार्ता समजतील; स्पर्धा परीक्षा चांगल्या देऊ शकाल; यश मिळेल.


