मेष
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांचा उत्साह खूप वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. आर्थिक प्रश्न सुटतील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. 18 तारखेला रवीने तुळ राशीत प्रवेश केला असून, त्याची दृष्टी मेष राशीवर आहे, त्यामुळे तब्येत उत्तम राहील. महिलांना नातेवाईक भेटू शकतात. नवीन खरेदी होईल, आनंदात राहाल. विद्यार्थी ज्या क्षेत्रात काम करतील, त्यात यश मिळू शकेल.
वृषभ
आनंदी आठवडा आहे. या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन संपर्क उपयोगी ठरतील. व्यवसायात प्रगती होईल. कामानिमित्त छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. पण आहार आणि पथ्यांबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांचा सहवास मिळेल. महिलांनी संयम आणि सकारात्मक विचार ठेवावा, आनंदी राहाल. विद्यार्थ्यांच्या नवीन ओळखी होतील, इतरांना मदत कराल.
मिथुन
या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे. धन स्थानात गुरू महाराज आले आहेत (19 तारखेला). लग्नाच्या मुला-मुलींचे लग्न जमेल. कुटुंबात नवीन पाहुण्याचे स्वागत कराल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत जबाबदारीची कामे मिळतील, त्याचबरोबर आर्थिक लाभ मिळू शकेल. महिलांच्या दृष्टीने कुटुंबात लाभदायक घटना घडतील. आनंदी आठवडा आहे. विद्यार्थ्यांना नोकरी किंवा छोट्या व्यवसायाचे मार्ग मिळतील, संधीचा फायदा घ्या.
कर्क
या आठवड्यात गुरु महाराज 19 तारखेला तुमच्या राशीत उच्चीचा होत आहेत. त्याची दृष्टी पंचम स्थानावर आहे. मुलांच्या बाबतीतील प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुलांकडून आनंददायक बातम्या मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत, व्यवसायात उत्तम, समाधानकारक यश मिळू शकेल. घरात पाहुणे येतील, महिला त्यांचे आगतस्वागत करतील, नातेसंबंध चांगले बहरतील. विद्यार्थी मित्र परिवारात वेळ घालवतील. नवीन कल्पना सुचतील, त्यादृष्टीने प्रयत्न कराल.
सिंह
या आठवड्यात नवे प्रकल्प, योजना पूर्णत्वाला नेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदार मिळू शकतील. नोकरीत समाधान मिळेल, आर्थिक लाभ होईल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल. महिलांना घरातील व्यक्तींकडून छान भेटवस्तू मिळेल. विद्यार्थ्यांचे छोटे प्रवास होतील, नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
कन्या
या आठवड्यात खूप विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा. तुमच्या लाभ स्थानी गुरु महाराज येत आहेत. काळजीचे कारण नाही, पण सावधानता ठेवावी लागेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पथ्य पाळावी. नातेवाईक भेटतील,, आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करून ध्येय ठरवण्यासाठी योग्य आठवडा आहे.
तुळ
या आठवड्यात रवी तुळ राशीत आणि गुरू महाराज कर्क राशीत आलेले आहेत. या आठवड्यात खूप आत्मविश्वास वाढेल. सगळी कामे जास्त कष्ट न घेता मार्गी लागतील. दशम (कर्म) स्थानी गुरू आहेत. तुम्हाला पसंतीच्या क्षेत्रात काम करायला मिळेल. कामात समाधान मिळेल. आर्थिक उन्नती होईल. महिलांच्या कामाचे कौतुक होईल. छान खरेदी करू शकाल. कला क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होईल. नवीन संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक
हा आठवडा खूप भाग्यदायक आहे. तुमच्या नवव्या (भाग्य) स्थानात गुरू महाराज आहेत. या आठवड्यात तुमचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन योजना अमलात येतील. अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. महत्त्वाच्या निर्णयामुळे यश मिळू शकेल. महिलांना नातेसंबंधात ताण जाणवेल, संवादाने प्रश्न सोडवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, धीर धरावा; यश नक्की मिळेल.
धनु
हा आठवडा खूप धावपळीचा असेल. तुमच्या लाभ स्थानी रवी आहेत आणि अष्टमात गुरू महाराज आहेत. वडिलोपार्जित संपत्तीविषयीची कामे पूर्ण होतील आणि त्यातून लाभ मिळेल. मिळालेल्या पैशांतून थोडे सत्पात्री दान करा. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल. महिलांचे आरोग्य चांगले राहील. इतरांना मदत करू शकाल. विद्यार्थ्यांना आव्हाने धैर्याने पार पाडता येतील, नवीन स्वप्ने साकार होतील.
मकर
या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये पाळा. गुरू महाराज सप्तम स्थानी आहेत आणि रवी दशमात आहेत. अकस्मात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत, व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ खूश राहतील. वर्चस्व प्रस्थापित होऊ शकते. तुमच्याशिवाय कामे अडतील. महिलांनी आर्थिक निर्णय घेताना घरातील मोठ्यांना विश्वासात घ्यावे. विद्यार्थ्यांनी कामात शिस्त पाळावी, केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
कुंभ
या आठवड्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही आखलेल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक लाभ होतील. ही दिवाळी सुख-समृद्धी घेऊन येईल. व्यावसायिकांनी हाताखालील लोकांना खूश ठेवावे. सढळ हाताने भेटवस्तू द्याव्यात. महिलांनी सत्पात्री दान करावे, हाताखालील घरकाम करणाऱ्या तसेच सफाई कामगारांना मदत करा. विद्यार्थ्यांनी मित्रांशी मतभेद टाळावेत, नीट ऐकून, विचार करून स्वतःचे मत मांडावे.
हेही वाचा – समाज मोठा की कर्तृत्व?
मीन
या आठवड्यात गुरू महाराजांची नववी दृष्टी मीन राशीवर आहे. तुमच्या राशीत आधीच शनी महाराज आहेत. शुभ ग्रहांची साथ आहे. सगळी अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. नातेसंबंध समाधानकारक ठरतील. नवीन संधी आणि कामे हाती घ्याल आणि ती आत्मविश्वासाने करू शकाल. घरात पाहुणे येतील, त्यांच्या आदरतिथ्यात महिलांचा वेळ जाईल. विद्यार्थ्यांना कामात यश मिळेल, नवीन ओळखी होतील.


