प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
या आठवड्यात ठरवलेली कामे अजून काही दिवस रेंगाळतील. तब्येतीच्या कुरबुरी राहतील. साडेसाती सुरू असताना आपली खरी माणसे कोण आहेत, ते समजू शकेल. अडचणी आल्या तरी स्वतः प्रयत्न करणे सोडू नका. काम मार्गी लागण्याचे संकेत मिळू शकतील. वाहन सौख्य चांगले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागू शकते. महिलांनी संततीशी बोलताना जपून बोलावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारावीत. अडचणी येतील पण मार्ग निघू शकेल.
वृषभ
या आठवड्यात कामाचे नियोजन न केल्याने धावपळ होऊ शकते. वरिष्ठ खूश राहतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते, त्या निमित्ताने पाहुणे येतील. घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. पाहुणे आल्याने महिलांचे घरातील काम वाढेल. विद्यार्थ्यांना मित्रांबरोबर फिरायला जाण्याची संधी मिळेल.
मिथुन
या आठवड्यात पैशांची चणचण भासू शकते. पैसे सांभाळून खर्च करावेत. या आठवड्यात कामे पटापट होऊ शकतात. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास होऊ शकतात. महिलांच्या नवीन ओळखी होतील आणि कामाशी संबधित नवीन कल्पना मिळू शकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी सुटू शकतात.
कर्क
या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरदारांनी संयम वाढवण्याची गरज आहे. स्पष्ट बोलावे गैरसमज होऊ देऊ नका. कामात खूप व्यग्र राहावे लागेल. विवाहेच्छुकांना मनासारखे विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. महिलांना मदतनीस बायका त्रास देऊ शकतात. त्यामुळे सांभाळून वागावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते, त्याचा उपयोग करून घ्यावा
सिंह
या आठवड्यात आधी केलेल्या कामाचा उत्तम परतावा मिळेल. पैसे जपून वापरावे लागतील. कामात नवीन संकल्पना राबवू शकाल. नोकरदारांना मोबदल्याव्यतिरिक्त काही फायदा होण्याची शक्यता आहे. संवादातून नातेसंबंध सुधारू शकाल. जोडीदाराशी किरकोळ कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. वास्तूविषयी गोष्टी मार्गी लागतील. महिलांना संततीकडून काही सुखदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवास घडतील आणि नवीन ओळखीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
या आठवड्यात भाग्याची साथ मिळू शकेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा छान अनुभव मिळू शकेल. अनपेक्षित आनंददायी घटना घडतील. स्वभावानुसार अतिचिकित्सा करत बसू नका, यशाचा आनंद घ्या. महिलांनी मदतीची गरज ओळखून इतरांना पटकन मदत करावी, समाधान मिळेल. विद्यार्थ्यांनी आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
हेही वाचा – 7/12 : मोह आणि लालसा
तुळ
या आठवड्यात आनंदी रहाल. तुमची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. केलेल्या नियोजनाचा फायदा मिळू शकेल. कामाचा आनंद घेऊ शकाल. अपेक्षित लाभ मिळू शकेल. पण, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दक्ष रहा. महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी घाई न करता सावधपणे निर्णय घ्यावेत.
वृश्चिक
या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात. खूप दिवसांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही आधी केलेल्या कामाचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. कामाच्या पद्धतीचे कौतुक होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिकबाबतीत जोडीदाराला विश्वासात घेऊन महिलांनी निर्णय घावेत. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी घरचा आहार घ्यावा.
धनु
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. घरच्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. कामाच्या बाबतीत तडजोड करावी लागू शकते. अशी तडजोड स्वीकारून पुढे जाणे हितावह ठरेल. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून सही करावी. महिला मैत्रिणीबरोबर काही वेळ आनंदाने घालवू शकतील. विद्यार्थीवर्गाच्या दृष्टीने मनाचा कौल महत्त्वाचा आहे, पटत असेल तरच कामात पुढे जावे.
मकर
या आठवड्यात सामाजिक कार्यात तुमच्या मनाची उर्मी आणि इतरांचा प्रतिसाद याचा ताळमेळ जमणार नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटू शकेल. मित्रपरिवाराबरोबर आनंदाने वेळ घालवू शकाल. मित्रांचे सल्ले खुल्या मनाने स्वीकारा. आर्थिक बाजू उत्तम राहील. महिलांनी जोडीदाराबरोबर वाद घालू नये. मुलांसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
या आठवड्यात लाभदायी गोष्टी घडू शकतात. कौटुंबिक सुख उत्तम मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी होत असलेले राजकारण समजून घेताना त्रास होऊ शकतो. काही अपेक्षित कामे, व्यवहार पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आणि नात्यात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. महिलांना संततीबाबत सुखद बातमी ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांची खूप दिवसांपासून राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा – गोलू आणि गोदाकाठची रथयात्रा
मीन
या आठवड्यात नोकरदारांना चांगल्या संधी मिळू शकतात. स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान मोठे असू शकते. पण, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे काम करत रहा. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतः कडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. नकारात्मक विचार बाजूला सारून महिलांनी पुढे जात रहावे. ध्यानधारणा करावी. विद्यार्थ्यांना अनेक आव्हान स्वीकारून पुढे जावे लागेल. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा.