मेष : वरिष्ठांची मर्जी सांभाळा
- राशी स्वामी मंगळ सिंह राशीत आला आहे. गुरू आणि केतू देखील सिंह राशीत आहेत. नोकरदारांना नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा, त्यांच्या मताला प्राधान्य द्या. व्यावसायिकांचा व्यवसाय जोरात चालेल. नवीन ऑर्डर पूर्ण करताना धावपळ होईल. वेळेचे आणि पैशांचे योग्य नियोजन करा. महिलांनी घरात काम करताना सांभाळून करावे. भाजणे किंवा कापणे असे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथमोपचार साहित्य घरात ठेवा. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील, त्यांना चांगल्या संधी मिळतील.
वृषभ : छोट्या गोष्टींवरून वाद
- राशी स्वामी शुक्र कन्या राशीत आहे. नोकरदार जातकांच्या कामाच्या ठिकाणचे वातावरण या आठवड्यात छान असेल. घरात ताण जाणवेल, छोट्या गोष्टींवरून वाद होईल. व्यावसायिकांनी भागीदार तसेच इतर स्टाफच्या सूचनांचा विचार करावा. काही गोष्टी विचारविनिमय करून अमलात आणा, त्याने फायदाच होईल. महिलांना कुटुंबासमवेत बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
मिथुन : नवीन संधी मिळतील
- राशी स्वामी बुध 14 तारखेपासून तुळ राशीत मार्गी होत आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. नवीन आव्हाने जबाबदारीने पार पाडाल. मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकाल. व्यावसायिक नवीन संकल्पना अमलात आणू शकतील. त्याचा व्यवसाय वाढीसाठी चांगला फायदा होईल. आपल्या छंदातून महिला एखादा नवीन, छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून लक्ष ढळू देऊ नये.
कर्क : घरात आनंदी वातावरण
- या आठवड्यात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी कामाची दगदग जाणवेल. कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे चिडचिड होईल. याउलट व्यावसायिकांची कामे पटापट होतील. मात्र कामे हातावेगळी करताना घाईगडबड करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. महिला वर्गाला संततीकडून छान, आनंद द्विगुणित करणाऱ्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील, प्रसिद्धी मिळेल.
सिंह : वाद घालू नका
- राशी स्वामी रवी 17 तारखेला वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. नोकरदारांची घरासंबंधित कामे मार्गी लागतील. घरात नवीन वस्तू खरेदी करू शकाल, कामे पटापट पूर्ण होतील. व्यावसायिक व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करू शकतील, त्यासाठी त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्य पाळावे. विद्यार्थ्यांनी गटबाजीपासून लांब राहावे. मंगळ गुरु एकत्र असल्याने वाद घालू नका, माघार घ्या, शांत रहा.
हेही वाचा – दक्षिण-पश्चिम (South-West) प्रवेशद्वार असलेला फ्लॅट आणि वास्तुशास्त्र
कन्या : खर्चावर नियंत्रण ठेवा
- राशी स्वामी बुध शुक्राबरोबर तुळ राशीत आहे. नोकरदारांना काम करताना कंटाळा येईल. मनाप्रमाणे कुठलेच काम होणार नाही म्हणून चिडचिड होईल. व्यावसायिकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. व्यवसायाच्या ठिकाणी असणारी आग विझविण्याची उपकरणे तसेच विजेची उपकरणे तपासून घ्या, सतर्क रहा. महिलांनी सांभाळून चालावे, व्यायाम करताना सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी वाहने जपून वापरावीत, वेगावर नियंत्रण ठेवावे.
तुळ : कामाचा ताण नसेल
- राशी स्वामी शुक्र स्वराशीत बुधाबरोबर आहे. नोकरदारांना कामाचा ताण नसेल. कामात विविधता येईल, नवीन आव्हाने स्वीकाराल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिक ग्राहकांसाठी नवीन प्रॉडक्ट बाजारात आणू शकतील, त्यासाठी केलेल्या जाहिरातींचा फायदा होईल. महिलांनी कामे वेळेत पूर्ण करावीत, स्वतःची कामे स्वतः करावीत, इतरांवर अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टबद्दलची माहिती कोणाला सांगू नये, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वृश्चिक : कायद्याचे पालन करा
- राशी स्वामी मंगळ सिंह राशीत गुरू आणि केतूबरोबर आहे. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून लांब राहावे. अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेऊ नका, तसेच, कोणालाही सल्ले देऊ नका. व्यवसायवाढीसाठी व्यावसायिकांना हा आठवडा योग्य आहे. मात्र कायद्याचे काटेकोर पालन करा. भागीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. महिलांची तब्येत उत्तम राहील, कामाच्या ठिकाणी त्यांचे वर्चस्व राहील. विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर जॉब करू शकतील.
धनु : वरिष्ठांची मदत मिळेल
- राशी स्वामी गुरू सिंह राशीत मंगळाबरोबर आहे. नोकरदारांना कामात आराम मिळेल. काही कामे, न सांगताही सहकाऱ्यांकडून पटापट हातावेगळी केली जातील. त्यासाठी वरिष्ठांचीही मदत मिळेल. व्यावसायिकांचा उद्योग सध्या साधारण गतीने सुरू राहील, त्यामुळे त्यांनी जाहिरातीवर भर देण्याची गरज आहे. महिलांनी कामाच्या वेळा पाळाव्यात, नियोजन करावे. विद्यार्थी मित्रांबरोबर पार्टी करू शकतील, आनंदी राहतील.
मकर : कामाचा अधिक ताण
- राशी स्वामी शनी मीन राशीत आहे. नोकरदारांना कामाचा ताण जास्त जाणवेल. घरात देखील जास्त काम करावे लागेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी राहील. व्यावसायिकांनी कामाचे आणि पैशाचे नियोजन करावे. कुणालाही पैसे उधार देऊ नका. पण देण्याची वेळ आलीच आणि रक्कम मोठी असेल तर, त्याची कागदपत्रे करा. महिला मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाऊ शकतील. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जायचे मार्ग मिळतील.
कुंभ : कामाचा कंटाळा
- राशी स्वामी शनी मीन राशीत आहे. नोकरदारांना काम करण्याचा कंटाळा येईल. त्याच त्याच रुटीनचा त्रास होईल. यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबीयांबरोबर बाहेरगावी फिरून या. व्यावसायिकांची जुनी येणी वसूल होतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. व्यवसाय वाढीबद्दल विचार कराल. महिला घरगुती व्यापार करण्याचा प्रयत्न करू शकतील. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील, त्यांचे कौतुक होईल.
हेही वाचा – पंचतत्त्वांची कुंडलीतील तर्कशुद्ध मांडणी
मीन : सरकारी कामांमध्ये यश
- राशी स्वामी गुरू सिंह राशीत आला आहे. नोकरदारांची अडकलेली सगळी कामे होतील. सरकारी कामे पाठपुरावा करून पूर्ण करून घ्या. व्यावसायिकांचा एखाद्या कामात भरपूर वेळ जाईल. छोटी छोटी वेळ खाऊ कामे करण्याच्या नादात महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी घरातील रोजची कामे थोडीशी बाजूला ठेवून जरा वैचारिक गोष्टी वाचाव्यात, ऐकाव्यात. विद्यार्थी सुट्टीत मिळवलेल्या पैशांचा कुटुंबासोबत आनंद घेऊ शकतील.
ईमेल – prajaktakathe3970@gmail.com


