प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक स्पर्धेला वा संघर्षाला तोंड द्यावे लागू शकते. तरीही न डगमगता पुढे जात रहा. वादग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काम विलंबाने होऊ शकतात. तुम्ही आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून यश मिळवू शकता. आजूबाजूच्या लोकांना या राशीच्या महिलांचे महत्त्व कळेल. तथापि, कोणाशी वाद घालू नका. कामे उशिराने होतील म्हणून विद्यार्थ्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा, यश मिळेल.
वृषभ
या आठवड्यात वरिष्ठांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मात्र, स्वतःच्या मतावर ठाम रहा. कुटुंबातील व्यक्तीवर खर्च होण्याची शक्यता आहे. तुमची शिस्त, निरीक्षण यांचा उपयोग फायदेशीर ठरणार आहे. महिलांनी कुणाबद्दलही अंदाज बांधू नये. तसेच, आंधळेपणाने विश्वास ठेवणे जाचक ठरू शकेल. विद्यार्थ्यांच्या कल्पना सत्यात उतरू शकतात, आत्मविश्वास वाढेल.
मिथुन
हा आठवडा चांगला आहे. कामे मार्गी लागतील. जमीन, स्थावर संपत्ती आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यातून चांगला लाभ होईल. सहकुटुंब प्रवास करू शकाल. महिलांची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील सर्व बाबतीत त्यांना सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास सगळी कामे सुरळीत होतील.
कर्क
या आठवड्यात कामात सातत्य राहील. सोपविलेली कामे मेहनतीने पूर्ण करू शकाल. कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागू शकते. मानसिकदृष्ट्या कणखर राहावे लागेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांना कुटुंबातील लोकांशी जुळवून घ्यावे लागेल. त्यांना प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. नवीन मित्र भेटतील.
सिंह
हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. चैनीच्या महागड्या वस्तू खरेदी करू शकाल. घरात इंटेरिअर करू शकाल. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करू शकाल. तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकाल. जमिनीच्या व्यवहारात लाभ संभवतो. महिलांना नवीन ओळखीतून लाभ मिळेल, मनाप्रमाणे खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना मित्र / मैत्रिणीबरोबरच्या नात्यात सांभाळून राहावे लागेल.
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
कन्या
या आठवड्यात तुम्ही कामे उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्याचबरोबर बेकायदेशीर कामे करणे टाळा. नोकरीत मनाप्रमाणे गोष्टी घडतील. सरकारी साहाय्य आणि कामगारांची मदत मिळण्यास अडचण येणार नाही. तुमच्या क्षेत्रात तुम्ही जोरदार काम करू शकाल. महिलांनी शॉर्टकट वापरू नये, अन्यथा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक मान-सन्मान मिळेल.
तूळ
भेडसावत असलेली समस्या या आठवड्यात सुटू शकेल. तुमची कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या सकारात्मक विचारामुळे चांगले परिणाम दिसतील. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. महिलांना कौटुंबिक सुख मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात समंजसपणा वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल कालावधी आहे.
वृश्चिक
या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन गोष्टी खरेदी करू शकाल. कार्यक्षेत्रात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. रोजच्या जीवनमानात बदल होईल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण असेल. जीवनात नवीन आकांक्षा निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाची संधी मिळेल.
धनु
या आठवड्यात नव्या उमेदीने कार्य हाती घ्याल. कोणताही निर्णय पूर्ण विचाराने घ्या. व्यवसायात प्रगती होईल. कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. सरकारी कायद्याचे कसोशीने पालन करा. महिलांचे जोडीदाराशी किरकोळ कारणांनी मतभेद होऊ शकतात. तथापि, वाद वाढवू नका. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.
मकर
या आठवड्यात नोकरीत आपल्या जबाबदारीबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. इतरांच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. खर्चात वाढ संभवते. कामात कुटुंबाचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महिलांचे कामात मन रमणार नाही, उदास वाटेल. विद्यार्थ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा मित्रांमध्ये गैरसमज होऊ शकतात.
कुंभ
या आठवड्यात कुटुंबातील व्यक्ती तसेच सहकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात. समंजसपणाने प्रकरण हाताळा. काही घटना अचानक घडतील, त्याला सामोरे जावे लागेल. नियोजनात बदल करावे लागतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी वादविवाद होऊ शकतात. महिलांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, वाद घालू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, विशेषत: कला क्षेत्रात.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
मीन
या आठवड्यात व्यवसायातील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. स्वतःचे घर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. सहकाऱ्यांनी कायदे पाळणे आवश्यक आहे. ओळखी तसेच मध्यस्थी उपयोगी पडतील. महिलांची स्वप्ने पूर्ण होतील. वास्तू योग आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने परीक्षेची तयारी करावी, यश मिळेल.