मेष
या आठवड्यात ग्रह बदल बरेच आहेत. 16 तारखेला रवी धनु राशीत जात आहे. 20 तारखेला रवी–मंगळ युती तुमच्या भाग्यस्थानात होत आहे. सगळी अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील; सगळ्यांच्या तुलनेत सरस ठराल. व्यावसायिक वर्गाला सगळ्यांना सामावून पुढे जा; यश नक्की तुमचेच आहे. महिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यांना आनंदात वेळ घालवता येईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षा द्याव्यात; शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर होतील.
वृषभ
या आठवड्यात तुमच्या अष्टमात रवी येत आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलता येत असतील तर ढकला; काम अर्धवट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. नोकरदारांच्या बाबतीत नवीन समस्या उद्भवतील; तथापि, त्याला सामोरे जा, टाळू नका. व्यावसायिक वर्गाला जुन्या निर्णयामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. घरात खूप पाहुणे येण्याची शक्यता असल्याने महिलांना आदरातिथ्य करावे लागेल. माहेरी जाण्याचा योगही आहे. विद्यार्थ्यांना आजोळकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन
या आठवड्यात बुध ग्रहाबरोबर असलेला शुक्र ग्रह 14 तारखेपासून अस्त होत आहे. नोकरदारांनी कामे प्रामाणिकपणे करावीत. कोणाच्याही बोलण्यात अडकू नका; मोहाला बळी पडू नका. व्यावसायिक वर्गाला नवीन कामे मिळू शकतील; अडकलेले पैसे मिळू शकतात. महिलांनी इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होणार नाही, याकडे लक्ष द्यावे; आनंदी रहा. विद्यार्थ्यांनी पॉकेटमनी जपून वापरावा; कला क्षेत्रात प्रगती करू शकाल.
कर्क
रवी–मंगळ युती 20 तारखेला होत आहे, त्यामुळे नोकरदारांचे वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. व्यावसायिक वर्गाने निर्णय घेताना चारी बाजूने विचार करावा; इतरांचे मत विचारून मग स्वतःचे मत द्यावे. महिलांना मुलांची काळजी राहील; मुलांना प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
या आठवड्यात राशी स्वामी रवी 16 तारखेला धनु राशीत येत आहे. तिथे आधीच मंगळ ग्रह आहे आणि त्याची 20 तारखेला युती होत आहे. नोकरदारांना आत्मविश्वासाने कामे पूर्ण करता येतील. व्यावसायिक वर्गाला लहान व्यक्तीपासून लाभ होण्याची शक्यता आहे. महिलांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल; इकडच्या गोष्टी तिकडे होणार नाही, याची काळजी घ्या. विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्रगती करतील; स्पर्धा जिंकू शकतील.
हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!
कन्या
या आठवड्यात चतुर्थ स्थानात रवी येत आहे; तुमची घरासंबंधीची कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना कामाचा ताण राहील; वेळेचे बंधन राहील, पण कामे व्यवस्थित पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला नातेवाईकांची मदत मिळण्याची शक्यता आहे; त्यांच्याकडून काम मिळू शकेल; आर्थिक लाभ होईल. महिलांनी वेळ वाया न दवडता कामे पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांना सतत शिकण्याची आवड असल्यामुळे या आठवड्यात फारसे काही न शिकल्याने मन खट्टू होईल.
तुळ
या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शुक्र 20 तारखेला अस्त होत आहे. नोकरदारांना तेच तेच काम करून कंटाळा येऊ शकतो; सुट्टी घेऊन फिरायला जायचा योग आहे. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे; नवीन ओळखी होतील; तुमचा प्रभाव पडू शकेल. महिलांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे; घरात पाहुणे येतील. विद्यार्थ्यांनी मित्र–मैत्रिणींबरोबर पैशाचे व्यवहार करू नयेत; केले तर ऑनलाइन करा, कॅशमध्ये करू नका.
वृश्चिक
या आठवड्यात नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. सहकारी आणि वरिष्ठ वर्गाची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. स्वतःचे निर्णय घेऊन पुढे जा. व्यावसायिक वर्गाला हातात असलेले काम जाण्याची शक्यता आहे; खचून न जाता आणि असे का घडले याचा विचार न करता, नव्याने नियोजन करा आणि पुढे जा. महिलांच्या बाबतीत घरात दुरुस्तीची कामे निघतील; नवीन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम जॉब मिळण्याची शक्यता आहे; इतरांना मदत करू शकाल.
धनु
या आठवड्यात रवी तुमच्या राशीत प्रवेश करत आहे; तब्येत उत्तम राहील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील; कामे झपाट्याने पूर्ण करू शकाल; वरिष्ठ खूश राहतील; सहकारी वर्ग सहकार्य करेल. व्यावसायिक वर्गाला नवीन कामे मिळतील; कायदेशीर कामे पूर्ण होतील; कोर्ट–कचेरीतील प्रश्न सुटतील. महिलांचे कामाच्या ठिकाणी वर्चस्व राहील; बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्रगती करू शकतील; मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा.
मकर
या आठवड्यात नोकरदारांना कामाचा ताण असला तरी, कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नवीन प्रोजेक्टमधील कामाचा कंटाळा येईल; पण सवयीने कामे पूर्णत्वास जातील. व्यावसायिक वर्गाला अडकलेले पैसे मिळतील; पुढील गुंतवणूक योग्य मार्गदर्शन घेऊन करा. कामाच्या ठिकाणी मनोरंजक घटना घडेल, त्यामुळे महिलांना कामाचा ताण जाणवणार नाही. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींबरोबर पिकनिक ठरवूतील, त्यानिमित्त प्रवास घडेल.
कुंभ
या आठवड्यात नोकरदारांना काम कमी असेल, मीटिंग आणि सेमिनार यात जास्त वेळ जाईल; नवीन गोष्टी शिकायला मिळतील; नवीन ओळखी होतील. व्यावसायिक वर्गाचा व्यवसाय उत्तम होईल; टार्गेट पूर्ण करू शकाल; लाभ होईल; नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील; वेळ छान घालवू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत करावी लागेल; मोठ्यांचे मार्गदर्शन मिळू शकेल.
हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!
मीन
या आठवड्यात नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान–सन्मान मिळेल; तुमच्या मताचा आदर होईल; वर्चस्व राहील. व्यावसायिक वर्ग व्यवसायात प्रगती करू शकेल; प्रतिस्पर्धी मागे राहतील; यश मिळेल. महिलांनी जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नये; पुढे जा. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावीत; कागदपत्रे सांभाळून ठेवा.


