प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष राशी
या आठवड्यात आपल्या बोलण्यातून, वागण्यातून इतरांवर प्रभाव पडेल. रवी तृतीय स्थानी 16 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे छोटे प्रवास घडू शकतील. रवी ग्रह हा गुरू ग्रहाबरोबर आहे. म्हणून तीर्थक्षेत्री प्रवास घडू शकेल आणि सकारात्मक उर्जा मिळेल. या आठवड्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. मुलांच्या बावतील काळजी राहील. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही.
वृषभ राशी
या आठवड्यात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळू शकेल. तथापि, योग्य सल्ला घेऊनच त्याची पुन्हा गुंतवणूक करावी. मनाप्रमाणे नवीन खरेदी करू शकाल. अनपेक्षित प्रवास घडू शकतील. वाहने जपून चालवा. नोकरदारांनी नवीन योजना वापरल्यास त्यांचा त्यांना लाभ मिळू शकतो. विद्यार्थी वर्गाला स्पर्धेला तोंड द्यावे लागेल आणि त्यात अपेक्षित यश मिळेल.
मिथुन राशी
या आठवडयात चांगले अनुभव मिळू शकतील. तुमच्या कामातील चिकाटीमुळे यश मिळू शकेल. सुरुवातीला मानसिक अस्वस्थता राहील, पण नंतर ती हळूहळू कमी होईल. या आठवड्यात कुटुंबसौख्य मिळेल. स्वतःचे कर्तव्य पूर्ण करा. जोडीदाराची साथ मिळेल. लांबचे प्रवास टाळता आले तर उत्तमच. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी प्रेमळपणाने आणि जपून संवाद साधावा. विद्यार्थांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. शिक्षकांशी किंवा सीनिअर मुलांबरोबर वाद होऊ शकतात.
कर्क राशी
या आठवडयात आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. नोकरदारांना उसंत मिळणार नाही, सतत काम करावे लागेल. नोकरदारांच्या कामात बदल होण्याची शक्यता आहे. सगळ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्याकडे काम करत असलेले लोक अचानक बदलतील, त्याचा फायदा होईल. विद्यार्थाना आपले गुण दाखवण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला फायदा करून घ्यावा.
सिंह राशी
या आठवड्यात नकारात्मक विचार मनात येत असले तरी, संयमाने वागा. स्वतःवरच चिडचिड होईल. मनाप्रमाणे काम होणार नाही. रवी आणि गुरू लाभात असल्यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही. 13 जुलैला शनी मीन राशीत वक्री होत आहे. कोर्टातील कामे, कायदेशीर कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंड लागण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
या आठवड्यात कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे. सर्व कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील आणि कामाचे कौतुक होईल. तरीही, अपेक्षित यश मिळण्यासाठी थांबावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. विवाहेच्छुक तरुण-तरुणींना विवाहाचे प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
तुळ राशी
या आठवड्यात नव्या आव्हानांना सामारे जावे लागेल. त्यासाठी मनाची चंचल वृत्ती सोडून स्थिर मनोवृत्ती तसेच बुद्धीमत्तेचा योग्य वापर आणि त्याचप्रमाणे लोकसंग्रहाचा योग्य उपयोग करून घ्यावा, त्याचा फायदा होईल. या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पण ते निर्णय विचारपूर्वक घ्यावेत तरच, ते लाभदायक ठरू शकतील. आपली स्वतःची कामे आत्मविश्वासाने करावी. मित्रापासून सावध रहा, सगळ्या गोष्टी मित्रांना सांगू नका. विवाहासंदर्भातील प्रस्तावाची विवाहेच्छुकांनी नीटपणे चौकशी करावी. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे.
वृश्चिक राशी
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. त्यामुळे यश मिळाले तरी, हुरळून जाऊ नये आणि नुकसान झाले किंवा मनाप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत तरी खेद करू नये. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतो. कुटुंबासोबत प्रवास घडेल, पण प्रवासादरम्यान पैशांचे पाकिट आणि कागदपत्रे सांभाळा. नोकरदारांना सहकारी, मित्र आणि वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्यच राहील.
धनु राशी
हा आठवडा आपल्यासाठी शुभ घटनांचा आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. आत्मविश्वासाने आणि योग्य संवादाने समोरच्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करू शकाल. व्यवसायिकांना या महिन्यात खूप काम असेल. आधी केलेल्या तयारीचा फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकेल.
मकर राशी
या आठवड्यात काही अनपेक्षित खर्च करावा लागेल. त्याचा त्रास होऊ शकतो. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी संमिश्र वातावरण राहील. संदिग्ध वा वर्मी लागणारे बोलणे टाळावे. नोकरीत नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील. विद्यार्थी वर्गाने नियोजनात लवचिकता ठेवावी. कुठल्या कामाला आणि अभ्यासाला कधी आणि कसे प्राधान्य द्यावे, याचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा.
कुंभ राशी
हा आठवडा आपल्यासाठी आनंददायक आहे. कामानिमित्त लांबचे प्रवास होतील. व्यावसायिक भागीदार आणि आयुष्यातील जोडीदार यांची उत्तम साथ मिळेल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम कालावधी आहे. योग्य आणि अनुरूप जोडीदार मिळू शकतो. विद्यार्थ्यांना आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल.
मीन राशी
हा आठवडा संमिश्र फलदायी आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरचे ताजे अन्न खा. पथ्य सांभाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील, तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरदारांना आपल्या अनुभवाचा, तसेच उत्तम संवादाचा उपयोग करून घेता येईल. विद्यार्थीना आजोळी जाण्याचा योग आहे, तिथे कोडकौतुक होईल.
prajaktakathe3970@gmail.com
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!