Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 नोव्हेंबर 2025

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेNovember 9, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात तब्येतीच्या छोट्या कुरबुरी जाणवतील. हलका आहार घ्या आणि पथ्ये पाळा. सकारात्मक विचार ठेवा. कामाचा ताण राहील, पण सहकार्य मिळेल. वरिष्ठ समजून घेतील. नवीन ओळखी होतील. महिलांना नवीन खरेदी करता येईल, घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना बालपणीचे जुने मित्र भेटतील, छान वेळ घालवाल.

    वृषभ

    या आठवड्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदार किंवा ग्राहकांशी सांभाळून बोला. कोणाला वचन देताना, सगळ्या बाजूने विचार करून मगच द्या. नोकरदारांनी आपले काम चांगले ठेवावे आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करावे. कोणतेही काम करताना महिलांना द्विधा मनःस्थितीला सामोरे जावे लागेल, त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दुसरी व्यक्ती घेऊन जाईल, त्यामुळे सजग राहा.

    मिथुन

    या आठवड्यात काम कमी असेल, पण वरिष्ठांचा जाच जाणवेल. मीटिंग, प्रवास आणि इतर कामांत वेळ जाईल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदारी येईल. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्टवर काम करावे लागेल, छान अनुभव येईल. महिलांना प्रवासाचा त्रास होईल, दगदग जाणवेल. विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्यांशी वाद घालू नये, आदराने बोलावे.

    कर्क

    या आठवड्यात सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. 10 तारखेला गुरु-चंद्र युती होत आहे. जोडीदाराला आर्थिक लाभ किंवा छान भेट मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना समाधान आणि कामाचे श्रेय मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल, घरात कौतुक होईल. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करता येईल.

    सिंह

    या आठवड्यात आईबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना घरातून सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. महिला घरात धार्मिक कार्यक्रम ठरवतील, त्यानिमित्त पाहुणे येतील. विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा विश्वास संपादन करावा.

    हेही वाचा – सासू, सून अन् लेक…

    कन्या

    या आठवड्यात देवदर्शनाचा योग आहे. 12 तारखेला बुध-मंगळ युती होत आहे. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे उष्णतेचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या. नोकरदारांना कामांचा ताण जाणवणार नाही, कामे आरामात पूर्ण करता येतील. व्यावसायिकांनी बोलण्यात संयम ठेवावा. महिलांना मैत्रिणींबरोबर प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावे, तसेच बोलताना विचार करून बोलावे.

    तुळ

    या आठवड्यात खूप काम असेल, त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. 13 तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आणि चंद्र मनाचा कारक ग्रह असल्याने मनाप्रमाणे गोष्टी घडतील. महिलांना मैत्रिणींबरोबर फिरायला जाता येईल, भिशीही लागू शकते. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक

    या आठवड्यात 12 तारखेला मंगळ-बुध वृश्चिक राशीत युतीत येत आहेत. मंगळ स्वराशीत आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यावसायिकांना तुमचे कामातील वर्चस्व मान्य राहील. तुमचे मत विचारले जाईल. कामात प्रगती होईल, अडकलेली कामे पूर्ण करता येतील. महिलांना घरात आणि बाहेर मनाप्रमाणे वागता येईल; कामात स्वतःची छाप पाडाल. विद्यार्थ्यांना वादविवाद स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.

    धनु

    या आठवड्यात काम करण्याचा कंटाळा येईल. नवीन काम शोधण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे विलंबाने होतील. नोकरदारांना, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सांभाळून घ्यावे लागेल. व्यावसायिकांना नवीन कामांसाठी प्रयत्न करावे लागतील. महिलांना घरातील मदतनीस बायकांचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, कष्टाशिवाय फळ मिळत नाही.

    मकर

    या आठवड्यात सगळी कामे सुरळीत पार पडतील. तब्येतीची काळजी घ्या आणि पथ्ये पाळा. घराच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांना नवीन जबाबदारीची कामे मिळतील. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. तथापि, कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. महिलांनी सावधगिरीने घरातील कामे करावीत आणि सकारात्मक विचार ठेवावा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाभदायक घटना घडतील; पार्ट-टाइम नोकरी मिळेल.

    कुंभ

    या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. बँक आणि सरकारी कामांना उशीर होईल. नोकरदारांना नवीन कामांच्या योजना करण्यात वेळ लागेल. व्यावसायिकांना कामात यश मिळेल. घरात नवीन खरेदी होईल, त्यामुळे महिलांसाठी आनंदाचा आठवडा असेल. विद्यार्थ्यांनी वडिलांशी मतभेद टाळावेत आणि आदराने बोलावे.

    हेही वाचा – बॅटन रिलेचा प्रवास : तेरा दिवसांतील काही आठवणी

    मीन

    या आठवड्यात मुलांची चिंता सतावेल. 10 तारखेला गुरु-चंद्र युती होत आहे. मीन राशीचा स्वामी गुरू असल्याने मनासारखी कामे होतील. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. महिलांनी मुलांना जास्त सूट देऊ नये, सजग राहून काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी बोलण्यावर संयम ठेवावा आणि मोठ्यांशी आदराने बोलावे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn