प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
हा आठवडा खूप शांत आणि आरामदायी असेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील किंवा फोनवर बोलणे होऊ शकते. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरदारांची कामे सहज होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. महिलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. विद्यार्थ्यांनी रविवारी (7 सप्टेंबर) चंद्रग्रहण आहे, तेव्हा सांभाळून राहावे. वाहन जपून चालवावे.
वृषभ
या आठवड्यात घरात छान वातावरण राहील. नवीन खरेदी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे (13 तारखेला मंगळ तुळ राशीत येत आहे). त्यामुळे गरज असेल तरच आपले मत मांडावे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. महिलांना दगदग होईल. प्रवास करू नका; काळजी घ्या. विद्यार्थ्यांना छोटी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
या आठवड्यात छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. घर बदलण्याची किंवा घरासंबंधी नवीन बदल होण्याची शक्यता आहे (रवी आणि बुध 16 तारखेला कन्या राशीत प्रवेश करत आहेत). महिलांकडून स्वयंपाकघरासाठी नवीन खरेदी केली जाऊ शकते. प्रेमप्रकरण तुटण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी सांभाळून राहावे.
कर्क
हा आठवडा सामान्य आहे. जास्त घडामोडी घडणार नाहीत. शांतपणे सगळी कामे होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकाल. तथापि, घरात वाद होऊ शकतात, त्यामुळे सांभाळून बोलावे. महिलांना मदतनीस बाईमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावेत, यश तुमचेच आहे.
सिंह
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे (16 तारखेपर्यंत रवी सिंह राशीत आहे आणि 14 तारखेला शुक्र सिंह राशीत प्रवेश करत आहे). स्वतःच्या मनाप्रमाणे सगळ्यांनी वागावे, असा अट्टहास करू नये. समजूतदारपणा दाखवून कामे करून घ्यावीत. महिलांना घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. विद्यार्थ्यांनी सांभाळून बोलावे; कोणाचेही मन दुखवू नये.
कन्या
या आठवड्यात 15 तारखेपर्यंत काळजी राहील. तब्येतीची काळजी घ्यावी. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. देवदर्शन होईल. रवी-बुध युती 13 तारखेला होत आहे, तेव्हा निर्णय घेण्याचे शक्यतो टाळावे. निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. महिलांना धावपळ होईल, पण वातावरण आनंदी असेल. विद्यार्थ्यांनी कोणताही निर्णय घेताना चारही बाजूंनी विचार करावा.
हेही वाचा – तुळशीपत्र
तुळ
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. नवीन उपक्रम हाती घेऊन तो उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू उत्तम राहील. निर्णय घेताना तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्या, फायदा होईल. महिलांना नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांनी घरात वाद न घालता प्रश्न समजून घेऊन मग आपले मत नोंदवावे.
वृश्चिक
हा आठवडा सर्वसाधारण आहे. ठरवलेली सगळी कामे मार्गी लागतील. मुलांबाबत काळजी वाटू शकते. घरात नवीन खरेदी करू शकाल. मुलांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. महिलांना घरात साफसफाईची कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांनी पैसे जपून वापरावेत; वायफळ खर्च करू नये.
धनु
हा आठवडा कामाच्या बाबतीत संथ आहे. खूप मागे लागून कामे करून घ्यावी लागतील. तुम्ही कितीही परिपूर्ण असलात तरी, उपयोग नाही; सहकारी वर्गाची साथ मिळण्याची शक्यता कमी आहे. चिडचिड होण्याची शक्यता आहे. महिलांना माहेरी जाण्याचा योग येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वडिलांचा सल्ला घ्यावा, फायदा होईल.
मकर
हा आठवडा थोडा धावपळीचा तर, थोडा आरामदायी असेल. कामाचे टेन्शन कमी असेल (13 तारखेला मंगळ -राशीत प्रवेश करत आहे. म्हणजे, दशम स्थानात, तेव्हा कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. ओढाताणीची परिस्थिती असेल. महिलांना वडिलांच्या तब्येतीची काळजी राहील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होऊ शकते, कौतुक होऊ शकते.
कुंभ
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी राजकारण असल्याने मनस्ताप होण्याची शक्यता आहे. काम कमी पण चर्चा जास्त, असा अनुभव येऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्य पाळावे. परदेशी जाण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला आठवडा आहे; संधी मिळतील.
हेही वाचा – परोपकार
मीन
हा आठवडा खूप शुभ घटनांचा आहे. मनात योजलेले पूर्ण करू शकाल. सहकारी, मित्र आणि जोडीदार यांची मदत मिळू शकेल. तब्येतीची थोडी कुरबुर असू शकेल. प्रवास होऊ शकतात. देवदर्शन होईल. महिलांना मुलांची काळजी वाटेल; काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे, प्रयत्न करावेत.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.