मेष
या आठवड्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. 9 तारखेला भाग्य स्थानात (धनु राशीत) मंगळ येत आहे, त्यामुळे धाडसी निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल; मनाप्रमाणे मोबदला मिळेल. व्यावसायिक वर्गाची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. वादविवाद होतील, पण निर्णय तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. महिलांना कामांचा उरक राहील. तथापि, योग्य वेळी बोलावे लागेल म्हणजे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांचे परदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
वृषभ
या आठवड्यात घरात धार्मिक कार्यक्रम ठरवाल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला कोर्ट-कचेरीची कामे मागे लागतील; त्यात वेळ आणि पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. शांत राहून निर्णय घ्या. घरात पाहुणे येतील, महिलांना त्यांचे आगतस्वागत करावे लागेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावीत. त्यांनी इतरांची (मित्र-मैत्रिणींची) वाहने चालवू नये.
मिथुन
या आठवड्यात 5 तारखेला गुरु मिथुन राशीत (वक्री) आला आहे आणि राशी स्वामी बुध 6 तारखेला वृश्चिक राशीत आला आहे. नोकरी बदलायची असल्यास नोकरदारांनी प्रयत्न करावेत. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला काळ आहे. व्यावसायिक वर्गाच्या नवीन ओळखी होतील. हाताखाली काम करणारे बदलतील; त्यांना ट्रेनिंग द्यावे लागू शकेल. महिलांनी नवीन खरेदी नीट बघून करावी, वस्तू परत बदलवून आणायची वेळ येऊ शकते. विद्यार्थ्यांनी महत्वाचे निर्णय या आठवड्यात घेऊ नयेत.
कर्क
या आठवड्यात धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. नोकरदारांना कामाचा ताण पडेल. समोरील व्यक्ती समजून घेणार नाही; वाद घालू नका. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासात नवीन ओळखी होतील; त्याचा फायदा होईल. महिलांना माहेरची माणसे भेटतील; छान निसर्गरम्य स्थळाला भेट द्याल. विद्यार्थी मित्र-मैत्रिणीसोबत पिकनिकचा बेत ठरवतील.
सिंह
या आठवड्यात कामाचा कंटाळा येईल. रोज सकाळी फिरायला जा; फ्रेश वाटेल. नोकरदारांनी आलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. वरिष्ठांच्या कामाला प्राधान्य द्या. पैसे उसने देऊ नका. व्यावसायिक वर्गाने हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवावे. महिलांचे घरात वाद होण्याची शक्यता आहे; शांत राहून परिस्थिती हाताळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, मित्रांसोबत वेळ फुकट घालवू नका.
हेही वाचा – ॲडिक्शनचा ‘गेम’!
कन्या
हा आठवडा खूप धावपळीचा असणार आहे. नोकरदारांवर कामाचा ताण असेल; वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाने कामे सांगितलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा म्हणजे नुकसान होणार नाही. महिलांसाठी धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा छान योग आहे. विद्यार्थ्यांनी कोणावरही अवलंबून राहू नये, स्वतःची कामे स्वतः करा.
तुळ
या आठवड्यात सगळी कामे सुरळीत होतील. नोकरदारांना आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. तसेच, वरिष्ठ वर्गाला तुमचे विचार पटवून द्यावे लागतील. व्यावसायिक वर्गाने निर्णय घेताना शांतपणे सखोल विचार करावा. व्यावसायिक जोडीदाराबरोबर संवाद साधून एकत्र निर्णय घ्यावा. महिलांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना मनाविरुद्ध काम करावे लागू शकते. जुने मित्र भेटतील.
वृश्चिक
या आठवड्यात बुध तुमच्या राशीत आला आहे. जवळच्या लोकांचे तुमच्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतील. कुठलेही काम करताना नोकरदारांची द्विधा मन:स्थिती होण्याची शक्यता आहे; कामे करताना योग्य निर्णय घ्या. व्यावसायिक वर्गाने कामाची जास्त घाई करू नये; समोरील व्यक्तीला वेळ द्यावा. महिलांनी गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घ्यावे; घरात विचारविनिमय करावा. विद्यार्थ्यांचा मित्रांबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.
धनु
या आठवड्यात खूप छान, मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांना सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. काम आणि मजा एकत्र करू शकाल. पिकनिकचा बेत आखाल. व्यावसायिक वर्गाला नवीन काम मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. स्वतःला सिद्ध करावे लागेल. सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी; जुने आजार परत उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांनी स्वतःच निर्णय घ्यावेत; ज्यात ते चुकण्याची शक्यता नाही. इतरांवर अवलंबून राहू नका.
मकर
या आठवड्यात घरातील छोट्या कामांवर पैसे खर्च होतील. नोकरदारांना कामाचा ताण राहील. रखडलेली कामे पूर्ण करण्यात वेळ जाईल. सामाजिक कार्य कराल, पण त्याची कदर होणार नाही. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पना पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकेल. खर्च करण्यासाठी हात मोकळे ठेवावे लागतील (काटकसर करू नका). महिलांसाठी धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग आहे. मात्र, प्रवासात त्रास संभवतो; जास्त वेळ आणि पैसाही खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबाबतचे निर्णय विचार करून घ्यावेत; घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
कुंभ
हा आठवडा खूप शांत आणि मनाप्रमाणे जाईल. नोकरदारांना हवी तशी सुट्टी मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत छान वेळ घालवू शकाल. आनंदी वातावरण राहील. व्यावसायिक वर्ग कामानिमित्त प्रवास करेल. नवीन करारावर सही होण्याची शक्यता आहे. महिलांना नवीन ओळखीतून कामे मिळतील, आर्थिक आवक मनाप्रमाणे असेल. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल; त्याचा उपयोग करून घ्या.
हेही वाचा – यामिनी आणि 8 अन्-नोन कॉल्स…
मीन
हा आठवडा फार ताणतणावाविना आरामात घालवू शकाल. नोकरदारांचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहील; जास्त अडचणी येणार नाहीत. दशम स्थानी बुध येत असल्याने व्यावसायिक वर्गाची महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होण्याची शक्यता आहे. माध्यमापासून त्रास होण्याची शक्यता आहे; काळजी घ्या. महिलांच्या दृष्टीने घरातील वातावरण शांत राहील. मुलांची काळजी वाटेल.
Email – prajaktakathe3970@gmail.com


