प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
हा आठवडा आपल्यासाठी खूप धावपळीचा आहे. घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी लागू शकते. कामाचे नियोजन केले तरी, तुम्हाला आयत्या वेळी नवीन प्रश्न सोडवावे लागू शकतात. कामाचा ताण वाढू शकतो. शांत राहून प्रयत्न करावा. महिलांना घरामध्ये कधी न केलेली काम करावी लागतील. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षक एखादी जबाबदारी देऊ शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करू शकाल.
वृषभ
हा आठवडा खूप आनंददायी आहे. या आठवड्यात आवडीचे पाहुणे घरी येतील. त्यांच्याबरोबर प्रवास घडू शकतो. पावसाळी सहलीचा आनंद घेऊ शकता. नोकरदार लोकांना हा आठवडा साधारण आहे. जास्त धावपळ करावी लागणार नाही. मनाप्रमाणे कामे होऊ शकतात. महिलांना मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवता येईल. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे वेळ घालवता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळू शकतात.
मिथुन
या आठवड्यात घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नोकरदार जातकांना कामे खूप असतील. मात्र, तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील. महिलांना या आठवड्यात अचानक बहीण-भावंडांची भेट होऊ शकते. त्यामुळे वेळ छान, आनंदात जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या निर्णयावर ठाम रहावे. नवीन संधी मिळतील.
कर्क
या आठवड्यात नोकरीसंदर्भात नवीन संधी समोर येतील, त्याचा फायदा करून घेऊ शकता. तीर्थक्षेत्री प्रवास घडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रश्न सुटू शकतील. घरासाठी नवीन खरेदी करू शकता. महिलांना नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता आहे. आनंदी रहाल. विद्यार्थ्यांना छोटे प्रवास घडू शकतात. अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करा.
सिंह
या आठवड्यात घरात वडिलधारी माणसं येतील. त्यांच्याबरोबर वेळ चांगला जाईल. नोकरदारांनी अतिस्पष्ट बोलणे टाळावे. सहकारी, मित्रांना सांभाळून घ्यावे लागेल. वादविवाद टाळा. कामाचा सपाटा राहील. सगळी महत्त्वाची कामे पूर्ण होतील. महिलांचा घरकामात खूप वेळ जाईल. माहेरच्या मंडळींची भेट होईस, त्यामुळे आनंदी रहाल. विद्यार्थ्यांची महत्त्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात.
कन्या
हा आठवडा खूपच धावपळीचा असला तरी, मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे आनंदी रहाल. नोकरदार जातकांच्या अंगावर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. वाद घालू नका. सहकारी, मित्र मदत करू शकतात. धार्मिककार्यात महिला मन रमवू शकतील. नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही. प्रवास होतील.
हेही वाचा –Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका
तुळ
या आठवड्यात नोकरीच्या नवीन संधी मिळतील. स्वतःच्या मनाप्रमाणे, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्यावा. दुसऱ्याच्या मताचा विचार करावा, पण निर्णय स्वतःला पटेल तसा घ्यावा. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते. जागेत बदल संभवतो. महिलांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतील. नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील.
वृश्चिक
या आठवड्यात महत्त्वाचे काम करण्यास उशीर करू नका. कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. नवमस्थानात रवी, बुध युतीमुळे एक काम दोन वेळेला करावे लागू शकते. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण राहील. पाहुणे येतील त्यांचा छान पाहुणचार करू शकाल. विद्यार्थी मित्रांबरोबर पावसाळी सहलीचा आनंद घेऊ शकतील.
धनु
या आठवड्यात घरात क्षुल्लक कारणाने वाद होऊ शकतो. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना काम सहजपणे पूर्ण करता येईल. वडिलोपार्जित संपत्तीबाबतची कामे होऊ शकतात. महिलांच्या नवीन ओळखी होतील. त्याचा त्यांना पुढे फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत रहावे. भावाबहिणीची भेट होऊ शकते.
मकर
या आठवड्यात कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. नोकरदार नवीन काम आवडीने आणि जबाबदारीने पार पडतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. महिलांची घरातील रेंगाळलेली कामे होऊ शकतात. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
कुंभ
या आठवड्यात नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरदारांनी केलेले काम वरिष्ठांना न पटल्यामुळे ते परत करावे लागू शकते. या आठवड्यात आईबरोबर वेळ घालवाल. महिलांना कुटुंबातील सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करावा लागेल. माहेरी जाता येईल. विद्यार्थ्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते.
हेही वाचा – Nakshatra Gatha : मूळ नक्षत्रासह पूर्वाषाढा अन् उत्तराषाढा
मीन
या आठवड्यात घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकाल. मुलांकडून आनंददायी बातम्या मिळू शकतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. नोकरदारांनी स्वतःची कामे स्वतःच करावी, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. महिलांसाठी घरात कामे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. विद्यार्थ्यांना या आठवड्यात छोटे प्रवास घडू शकतील. मित्रांबरोबर मजा करू शकाल.