Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नजर नजर की बात हैं!
    ललित

    नजर नजर की बात हैं!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 30, 20251 Comment3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, ईश्वरी, तृतीयपंथी, किन्नर, मानवता
    जवळपास आठ वर्षांपूर्वीेचे छायाचित्र
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मनोज जोशी

    भाग -1

    किन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत:, बायकांची! किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पाहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं त्या केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळत होतो. एखादा तृतीयपंथी समोर आला की, सरळ मान हलवून पुढे जा सांगत असे किंवा इथं-तिथं पाहात रहायचो. पण एक अनुभव असा आला की, त्यांच्याकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला!

    वृत्तपत्रात काम करत असताना ऑफिसला जाण्यासाठी मी दुपारी विरारहून दादर लोकल पकडत असे. एक किन्नर रोज माझ्या खिडकीजवळ काहीतरी पुटपुटत पुढे जात असे. सुरुवातीला मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस चिडून दरवाजातच जाऊन उभा राहिलो. ती आली आणि म्हणाली, ‘क्या सेठ, कैसा है? मैं हमेशा बुलाती, तो तुम देखते नहीं.’

    ‘ठीक हूँ,’ असं सांगून मी तिला पैसे दिले. नंतर नंतर हे रोजच झालं. जवळपास वर्ष-दोन वर्षं सुरू होतं. आम्ही दररोज गप्पा मारत होतो. आता नोकरी बदलली आणि वेळही बदलली. त्यामुळे क्वचितच आमची भेट होते.

    ती मूळची आंध्र प्रदेशची अन् नाव ईश्वरी! भेटली की, ती माझी आणि कुटुंबीयांची आवर्जून चौकशी करते. एक दिवस तिनं सांगितलं की, ‘आम्ही काही जणांनी मिळून आता दर गुरुवारी जिवदानीच्या पायऱ्यांजवळ गरीब निराधार वृद्धांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. कधी तरी नुसतेच येऊन जा.’ मी म्हणालो, ‘हो, येईन नक्की.’ अर्थात, माझं काही जाणं झालं नाही. शिवाय, विरार पश्चिमेला एका अनाथ आश्रमात ती महिन्यातून एकदा, पण दोनही वेळचं जेवण‍ देत होती.

    साधारणपणे आठ एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिने जे काही सांगितलं, त्याने मी चकितच झालो. तिनं एका लहान मुलाचं पालकत्व स्वीकारलं अन् तेही कायदेशीररीत्या! हे पालकत्व घेतलं त्यावेळी ते अगदी दोन दिवसांचं अर्भक होतं. पण मला जेव्हा समजलं, तेव्हा तो मुलगा तीन वर्षांचा होता. (साधारणपणे आठ वर्षांपूर्वी)

    ईश्वरीला लिहिता-वाचता येत नाही. पण ईश्वरीने पालकत्व घेतलेला मुलगा आंध्र प्रदेशातील एका शाळेत शिकतो. ईश्वरीने आपल्या आईकडे त्याची जबबादारी दिली होती. त्याचा वाढदिवसही जोरदार साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ईश्वरीने काहींना जेवण दिलं तर, स्त्रियांना साडी-चोळी दिली. असं काही ऐकल्यानंतर काही बोलायला शब्दच नसतात. या मुलाला मायेची ऊब देणाऱ्या ‘तिनं’ मनात खूप आदराचं स्थान निर्माण केलंय.

    आता गेली तीन एक वर्षं झाली, ईश्वरीची फारशी भेट होत नाही. ऑफिसला सकाळी लवकर जात असल्याने तो योग जुळून येत नाही. केव्हातरी सुट्टीच्या दिवशी दुपारी ट्रेनने कुठे जायला निघालो तर, ती कधीतरी भेटते.


    या ईश्वरीप्रमाणेच आणखी एक किन्नर परिचयाची झाली. विरारलाच भेट झाली. आता फार कमी भेटते.

    या दोघींची खासियत अशी की, त्या शांतपणे समोर येऊन उभ्या राहतात. ‘जे दे उसका भला और जो ना दे उसका भी भला’ अशी त्यांची वृत्ती आहे. समोर आल्यानंतर हाती काही पडलं नाही तरी, आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला जातोच. दोन रुपयांचं नाणं दिलंत तर, इमानेइतबारे एक रुपया परत करतात. पाच रुपये दिले तर, चार रुपये परत करतात.

    ही दुसरी किन्नर ग्रॅज्युएट आहे. दक्षिणेकडचीच आहे. भाऊ शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर. ‘आई आणि कुटुंबीय मला परत बोलावतात. पण मी अशी आहे, म्हणून परत जात नाही. त्यांना मी सांगितलं की, मी येणार नाही. माझं व्यवस्थित चाललंय,’ असं तिनं एकदा सांगितलं होतं.

    रविवारी लोकलमध्ये नियमित प्रवासी नसतात. दुपारच्या वेळेस गाडीत अनेक जण जिवदानी देवीचं दर्शन घेऊन परत जाणारे असतात. त्यामुळे ही किन्नर डब्यात शिरल्यावर पहिल्यांदा ही गाडी कुठून कुठे जाणार आहे, कुठल्या स्थानकांवर थांबणार आहे, याची ओरडून माहिती देते आणि नंतर पैसे मागते.

    आपल्या समोर येणारे किन्नर असेही असू शकतात, हा विचार अनेकदा आपल्या मनाला शिवत देखील नाही. ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ असं म्हटलं जातं. पण अशा किन्नरांच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणता येईल – ‘दिसतं तसं नसतं’!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित

    1 Comment

    1. pramod kamble on April 2, 2025 9:54 am

      अतिशय छान ….

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn