Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeअवांतर…अशांना 21 तोफांची सलामी !

…अशांना 21 तोफांची सलामी !

मयुरेश गोखले

सन 1500 ते 1700 या दरम्यानच्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे तसेच काही चांगली बातमी मिळाली किंवा कोणी खूप मोठे कार्य केले तर त्याचा सन्मान म्हणून 21 तोफांची सलामी देत असत. आजच्या जगातही मला असे काही थोर पुरुष सापडले आहेत जे 21 तोफांची सलामी घेण्यास पात्र आहेत. आपल्यालाही या थोर पुरुषांची मी ओळख करून देतो. तुम्हाला कधी ते भेटले तर त्यांचे अभिनंदन करायला विसरू नका!

पहिला थोर पुरुष म्हणजे आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून आपली बायको, पोरं यांना गाडीपाशी उभं करून हे महाशय जवळच्या पानटपरीवर सिगरेट, गुटखा खायला जातात. लगेच परत न येता काही वेळ तिथेच देशोपयोगी चर्चा करतात. एक लाल पिचकारी जवळपास सोडून मग मर्दासारखे गाडीपाशी येऊन बायका-पोरांना घेऊन निघतात. लहान वयात पोरांना उत्तम संस्कार देणाऱ्या आणि आपल्या बायकोचा नेहमी मान राखणाऱ्या या थोर पुरुषाच्या कर्तुत्वाला 21 तोफांची सलामी! धडाम…l

दुसरा थोर पुरुष म्हणजे गर्दीच्या रस्त्यामध्ये पार्किंगची कुठलीही जागा नसताना सामान्य वाहतुकीला अडचण होईल, अशा ठिकाणी हा मनुष्य गाडी पार्क करतो आणि निघून जातो. अहो, ते व्हील जामर, चलान वगैरेला मध्यमवर्गीय घाबरतात. या शूर पुरुषाच्या गाडीच्या मागे ‘अमक्या संघटनेचा अध्यक्ष’ वगैरे लिहिलेले असतेच. मग ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ अशा ऐटीत सार्वजनिक ठिकाणी हे लोक असेच धाडस करतात. वेळ आली तर थोडी मारामारी पण करून घेतात. या शूर सरदाराला 21 तोफांची सलामी! धडाम…l

हेही वाचा – Social Media : डॅड से नो लेट नाइट पार्टी!

तिसरी थोर व्यक्ती म्हणजे, त्याचे महत्कार्य त्याच्याच शब्दात सांगतो – “भाई कल रात को चार ‘बम्पर’ खतम किये, फिर घर जाके एक नीप मारी… फिर भी अपुन पुरे होश में थे, जरासा भी हिला नहीं मैं“

असा थोर देशभक्त जो हलाहल स्वतः पिऊन देशाचे रक्षण करतो त्याला 21 तोफांची सलामी! धडाम…l

चौथा थोर पुरुष जो दुचाकी चालवताना आपल्या पवित्र थुंकीचा छिडकावा तुमच्यावर करतो. गाडी चालवताना तुम्ही ‘अखंड असावे सावधान’ म्हणून थुंकून थुंकून तो तुम्हाला सतत सावधान करीत असतो आणि अपघातापासून वाचवतो. अशा थोर पुरुषाला 21 तोफांची सलामी! धडाम…l

पाचवा थोर पुरुष म्हणजे, आपली समाजकार्ये लोकांपर्यंत पोचावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात तो मोठमोठ्या रॅली काढतो. आपले फोटो फ्लेक्स लावतो. डीजेचा पैसा स्वतः खर्च करतो. कार्यकर्त्यांचा ‘खाण्या-पिण्याचा’ भार स्वतः उचलतो… अशी लोकोपयोगी कामे करणाऱ्या थोर व्यक्तीला 21 तोफांची सलामी! धडाम…l

हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…

असे आणखी बरेच ‘थोर’ आहेत. तुम्हालाही काही आठवले असतील… अशा सर्वांना 21 तोफांची सलामी! धडाम…

छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर, त्यांनी पण या थोर लोकांना 21 तोफांची सलामी दिली असती. फक्त फरक इतकाच की, या सर्व लोकांना सलामीच्या वेळेस तोफेच्या तोंडाच्या बाजूला उभे केले असते. 21 वेळा तोफेचा आवाज इतक्या जवळून ऐकून भीतीने गाळण उडाली असती… परत कधी असे वागायची हिम्मत नसती केली या ‘थोर’ पुरुषांनी!

असो, बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा!

मोबाइल – 9423100151

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!