लीना जोशी परुळेकर
मागच्या लेखात आपण कुठल्या त्वचा प्रकारासाठी कुठली उत्पादने वापरावीत, ते पाहिले. आता आपण पारंपरिक घरगुती उपाय बघूया, जे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.
आपल्याकडे नवजात बालकाला आंघोळ घालताना बेसन पीठात दूध मिसळून ते त्या बालकाच्या अंगाला चोळतात. तसेच, साबणाचा शोध लागण्यापूर्वी स्त्री, पुरुष आंघोळीसाठी उटण्याचा वापर करायचे. ती परंपरा पुढे नेत आपण अजूनही दिवाळीत का होईना, पण उटणे लावून आंघोळ करतो. आपल्याकडे आयुर्वेदात विविध प्रकारची उटणी बनवायच्या प्रक्रिया लिहिलेल्या आढळतात.
घरगुती साहित्य वापरून बनवलेले Mask हे आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. काही Maskमुळे त्वचेवर Cleansing effect होतो; म्हणजेच त्वचा स्वच्छ होते. काहींमुळे वाफ घेतल्यावर रंध्रे खुली व्हावीत, तसा परिणाम दिसून येतो. काही Mask nourishing effect म्हणजेच त्वचेला पोषक ठरतात. काही Mask whitening effect म्हणजेच त्वचेला उजळपणा देतात. काही Mask moisturizing effect, म्हणजेच त्वचेला बाष्प पुरवायचे काम करतात.
सामान्यतः विविध पीठांपासून बनवलेले Mask हे Cleansingचे काम करतात. जसे चण्याच्या डाळीचे पीठ, मसूर डाळीचे पीठ, मक्याचे पीठ, मेथ्यांचे पीठ, ओटचे पीठ… या पीठांमध्ये पाणी, दूध, मध, तेल इत्यादी घालून mask बनवता येतात. कधी कधी सायीचा, तूपाचा सुद्धा वापर करता येतो.
संत्र, मोसंब, लिंबू यांच्या साली फेकून न देता, त्याचे पांढरे धागे काढून टाकावेत. या साली उन्हात पूर्णपणे वाळवाव्यात, नंतर त्या मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करावी. ही पावडर mask बनवताना त्यात टाकावी. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते.
हेही वाचा – Skin Care : मिश्र, संवेदनशील त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने
Mask बनवताना आपण जशी पीठं वापरतो तसेच आपण काही फळे आणि काही भाज्या यांचा सुद्धा उपयोग करू शकतो. फळांमध्ये पपईचा उपयोग हा जास्त फायदेशीर ठरतो. पपईमध्ये Papain नावाचे enzyme असते. ज्यामुळे त्वचा सहजपणे exfoliate (त्वचेची सर्वात वरची मृत त्वचा सहजपणे निघून जाणे) होते आणि त्वचा तजेलदार दिसते. पिकलेल्या पपईचा गर काढून, तो एकदम मऊ करून चेहऱ्यावर लावल्याने तेलकट त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. तसेच जंतूनाशक म्हणूनही पपईच्या maskचा उपयोग होतो. ज्यांच्या चेहऱ्यावर मुरमे आहेत, त्यांनी कच्च्या / तयार पपईचा गर, त्याच्या अर्धी पुदिन्याची पाने घ्यावीत. त्याच्या तिप्पट पाणी घेऊन ते उकळवावे, त्यात थोडी चहा पावडर घालावी. हे चहाचे पाणी उकळल्यावर गॅस बंद करून त्यात लगेच पपईचा गर, पुदिन्याची पाने घालावीत आणि थोडावेळ झाकून ठेवावे. हे पाणी, जेवढा गरमपणा त्वचेला सहन होईल, तेवढे गरम वापरता येते. कापसाची किंवा कापडाची घडी या पाण्यात बुडवून चेहऱ्यावर दाबावी. हे पाणी चेहऱ्यावर सुकले की, चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. त्यामुळे मुरुमे controlमध्ये रहायला मदत होते. तसेच, संपूर्ण पिकलेली Strawberry, केळी, द्राक्षं, पेर इत्यादी फळांचा गर चेहऱ्यावर लावता येतो. तसेच या फळांच्या गरांमध्ये दूध / साय / मध / तूप इत्यादी मिसळून लावले तर, कोरड्या त्वचेला मुलायमपणा येतो.
हेही वाचा – Skin Care : कोरडी त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने
आपल्याकडे Bread बनवताना जे Yeast वापरतात, त्या Yeastचा उपयोग mask बनवण्यासाठी करता येतो. Yeastमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. Yeastमुळे त्वचेला Cleansing आणि nourishing असा दुहेरी फायदा मिळू शकतो. थोड्या कोमट दुधात पाव चमचा Yeast टाकावे. Yeast activate व्हायला 10 ते 15 मिनिटे लागतात. त्यामुळे अंदाजे 10/15 मिनिटांनंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हा mask कोरडा झाला की हलक्या हाताने चोळून धुऊन टाकावा. या maskचा scrub सारखा उपयोग करता येतो, ज्यामुळे Exfoliation होऊन त्वचा तजेलदार दिसते. तसेच, जायफळ किसून त्यात थोडी साय / दूध मिसळून तेलकट / मिश्र त्वचेवर लावल्यावर ते granulated scrubचे काम करते. हेच जायफळ दूधात / सायीत / मधात / तूपात उगाळून कोरड्या त्वचेवर लावल्यास non-granulated scrubचे काम करते. त्यामुळे त्वचेला तजेला मिळतो.
पुढच्या भागात आपण अजून पारंपरिक घरगुती उपाय बघू.
क्रमश: