दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 07 आश्विन शके 1947; तिथि : सप्तमी 16:30; नक्षत्र : मूळ 30:16
- योग : सौभाग्य 24:59; करण : विष्टी 29:22
- सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
सरस्वती आवाहन
महालक्ष्मी पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या संदर्भात काही योजना आखली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज परत मिळण्याची मोठी शक्यता आहे. त्रासदायक ठरलेल्या कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल.
वृषभ – आजचा दिवस अति खर्चाचा असेल. वैयक्तिकदृष्ट्या नुकसान पोहोचू शकेल अशा कोणत्याही कामापासून लांब रहा. कुटुंबासाठी विचारपूर्वक एखादा निर्णय घ्यावा लागेल. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. कोणताही भागीदारी उपक्रम टाळा, अन्यथा नंतर पश्चात्तापाची वेळ येईल.
मिथुन – आजच्या दिवसात एकामागून एक आनंदाच्या बातम्या मिळतील. घरातील आणि बाहेरील कामात संतुलन राखावे लागेल. जोडीदार खांद्याला खांदा लावून काम करेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे कदाचित धावपळ होण्याची शक्यता आहे. एखाद्या आध्यात्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता.
कर्क – सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. भूतकाळात तुम्ही केलेल्या चुका कुटुंबातील सदस्यांना कळतील. मात्र त्यातून मिळालेला अनुभव कसा होता, याची परिवाराला माहिती करून द्याल. जवळचे नातेवाईक एखाद्या गोष्टीत विश्वासघात करू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खटला जिंकण्याची शक्यता आहे.
सिंह – आज कोणत्याही कामात कळत नकळत निष्काळजीपणा होणार नाही, याची काळजी घ्या. सरकारी योजनांचा पूर्ण फायदा मिळेल. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची चांगली शक्यता आहे. काही कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप करू शकते, त्यामुळे सांभाळून रहा.
हेही वाचा – इतिहासाशी जडले नाते…
कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. काही नवीन संपर्कांमुळे फायदा होईल. आजच्या दिवशी कोणतेही धोकादायक उपक्रम टाळावेत. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मात्र तो वाद वगळला तर आज जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि साथ मिळेल. लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता, जी फायदेशीर ठरेल.
तुळ – एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या मनमानी वागण्याचा तुम्हालाच थोडा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला कामात पाठिंबा मिळेल.
वृश्चिक – आजच्या दिवशी निर्णयक्षमता चांगली असेल. आजची कामे उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. भावंडांकडून महत्त्वाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा मिळेल. या कामात काही अडथळे येऊ शकतात, परंतु त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. एखादा जुना आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.
धनु – आज कामाच्याबाबतीत भरपूर मेहनत घ्याल. एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. पालकांशी संवाद साधल्यावर काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. गुंतवणुकीतून आज चांगली प्राप्ती होईल. सरकारी नोकरीशी संबंधित परीक्षेसाठी कठोर परिश्रम करावेत.
मकर – छंद जोपासण्यासाठी विशेष वेळ काढाल, त्यामुळे मनाला होणारा आनंद वाढेल. प्रेमात पडलेल्यांचे लग्नाच्या दिशेने प्रयत्न सुरू होतील. एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाची मिळालेली जबाबदारी पूर्ण कराल. त्यासाठी कामाचे नियोजन करावे लागेल. नवीन घर, दुकान किंवा इतर मालमत्ता खरेदीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील.
कुंभ – आजचा दिवस आनंदाचा असेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखावे लागेल. अल्पमुदतीत मिळणाऱ्या नफ्याचे नियोजन करण्यासाठी त्यावर बारकाईने काम करावे लागेल. संततीच्या आरोग्याबाबत आज सावध असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या ताणासाठी आवश्यक औषधोपचार किंवा समुपदेशन करणे गरजेचे असेल.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…
मीन – इच्छापूर्तीसाठी आजचा दिवस उत्तम असेल. विद्यार्थी अभ्यासात पूर्णपणे व्यग्र असतील. काही स्पर्धांमध्येही ते भाग घेऊ शकतात. अविवाहित जातकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. कौटुंबिक संघर्ष आज पुन्हा उद्भवतील, परंतु वडीलधाऱ्यांच्या मदतीने ते सहजपणे सोडवू शकाल. घरातील कामांमध्ये काही बदल करण्याचा विचार कराल.
दिनविशेष
पंचांगकर्ते दाते
टीम अवांतर
सोलापूरचे दाते पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचा जन्म 29 सप्टेंबर 1890 रोजी झाला. पंचांगकर्ते म्हणून ‘दाते’ हे नाव प्रसिद्ध आहेच, पण सोलापूरचे पंचांगकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे लक्ष्मणशास्त्री दाते. यांना ल. गो. किंवा नानाशास्त्री दाते असेही म्हटले जायचे. पंचांगांच्या दुनियेतलं ‘दाते पंचांग’ हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. 1916-17 साली पहिले दाते पंचांग प्रसिद्ध झाले होते! ज्या काळात पंचांगांमध्ये एकवाक्यता नव्हती, मतभिन्नता होती, त्या काळात दाते पंचांगाचा खप दिवसेंदिवस वाढतच चालला होता. दाते पंचांग मराठी भाषेत असले, तरी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांतील तसेच परदेशातील मराठी भाषिक आवर्जून दाते पंचांग विकत घेतो. नानाशास्त्री यांनी पहिलं पंचांग काढलं आणि ते कोल्हापूरमधल्या अर्यभूषण प्रेस मधून छापून घेतलं. पंचांगामधील इतकी सारी गणितं सोडवताना नानाशास्त्री यांची मान आणि कंबर दुखत असे. गणितातील उत्तरासोबत या दुखण्यावरही नानाशास्त्रींनी जालीम उत्तर शोधून काढले. त्यांनी भिंतीवर गणिते सोडवायला सुरुवात केली. भिंतींची पाटी करत तिच्यावर पंचांगाचे धडे गिरवले. दाते पंचांग हे ज्योतिषांना संदर्भग्रंथासारखे कामी येते. कोणत्याही गोष्टीचा संदर्भ दाते पंचांगातून मिळतो. ज्योतिष शास्त्र, पंचांग याचा अभ्यास करणाऱ्यांना दाते पंचांग विश्वासार्ह वाटते. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वी वाटचाल करणारे हे एकमेव पंचांग आहे. नाना शास्त्रींनंतर धुंडीराजशास्त्री, श्रीधर लक्ष्मण दाते यांनीही दाते पंचांग लोकप्रिय करण्यास हातभार लावला. दाते पंचांगाची लोकप्रियता आणखी वाढवण्याचे काम नानाशास्त्री यांचे नातू आणि धुंडीराज शास्त्रींचे पुत्र मोहन दाते यांनीही केले असून आता चौथी पिढीही पंचांग जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी काम करत आहे. लक्ष्मणशास्त्री दाते यांचे 25 जानेवारी 1980 रोजी निधन झाले.


