दर्शन कुलकर्णी
आज भारतीय सौर : 07 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 28 जून 2025, वार : शनिवार, तिथी : तृतीया 09:53, नक्षत्र : पुष्य 06:35
योग : हर्षण 19:14, करण : वणीज 21:28
सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यावसायिक जीवनात बरेच चढ-उतार येतील. त्यामुळे कामात निष्काळजीपणा नको. करिअरच्या वाढीसाठी नवीन संधींचा पूर्ण लाभ घ्या. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. समाजात आदर वाढेल. व्यावसायिक जीवनात यश मिळवाल. मात्र, कामाचा दबावही वाढेल.
वृषभ – आर्थिक बाबींसाठी उत्तम दिवस. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. कार्यालयातील कामांची अतिरिक्त जबाबदारी मिळेल. मात्र, तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन – आज पैसे कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार मंडळींचे वरिष्ठ कामाने प्रभावित होतील. व्यवस्थापनात चांगली प्रतिमा कायम राहील. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. कुटुंबासमवेत सहलीचे नियोजन कराल. नकारात्मकतेपासून दूर रहा.
कर्क – जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. करिअर वाढीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा. व्यावसायिक जीवनातील समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. नातेसंबंधातील समस्या हुशारीने हाताळा.
सिंह – जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. पैशाचा ओघ वाढेल. करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. कारकिर्दीची उद्दिष्टे साध्य करण्याबाबत महत्त्वाकांक्षी असाल. कुटुंबातील सदस्यांसह कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रवासाच्या योजना मार्गी लागतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकाल.
कन्या – व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे यशस्वी होतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी फिरण्याचा बेत आखू शकता. काही जातकांचा विवाह ठरण्याचा योग आहे.
तुळ – व्यावसायिक जीवनात भाग्य साथ देईल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. यशाची शिडी चढाल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी नवीन योजना बनवाल.
वृश्चिक – नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणुकीचे निर्णय हुशारीने घ्या. कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
धनु – करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील. व्यवसायात नफा होईल. व्यावसायिक जीवनातील आव्हाने आत्मविश्वासाने हाताळा. कार्यालयातील संपर्कजाळे वाढेल. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा.
मकर – प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. उत्पन्न वाढेल. कठोर परिश्रम आणि मन लावून केलेले काम अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देईल. यश पायाशी असेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. काहींना वारसाहक्काने संपत्ती मिळेल. सामाजिक कार्यात रस वाढेल. नात्यांमधील प्रेम आणि विश्वास वाढेल.
कुंभ – व्यवसायात उत्तम नफा होईल. व्यवसायवाढीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार मंडळींना पदोन्नती मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवासाची शक्यता आहे. नवीन लोकांशी भेट होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. समाजात मानसन्मान मिळतील.
मीन – प्रत्येक कामात नशीबाची साथ मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येईल. कुटुंबाच्या पाठिंब्याने आकाशाला गवसणी घालाल. जुनी मालमत्ता विकून किंवा भाड्याने देऊन आर्थिक फायदा होईल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल.
दिनविशेष
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव
भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे पांमुलापर्थी वेंकट अर्थात पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात झाले. त्यांना तेलुगू, इंग्रजी, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी या भाषा अवगत होत्या. त्यामुळे भाषा कोविद म्हणून ते प्रसिद्ध होते. भारतीय संस्कृती, साहित्य, कला यांचे ते गाढे अभ्यासक होते. म्हणूनच कऱ्हाड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो किंवा जागतिक मराठी साहित्य संमेलन असो, त्या व्यासपीठांवरून अस्खलित मराठीत त्यांनी केलेले भाषण विचार प्रवर्तक होते. 1991 ते 1996 या काळात त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याआधी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांसाठी त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपदही भूषवले. मात्र हा कार्यकाळ अत्यंत वादळी ठरला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये आधी परराष्ट्रमंत्री आणि नंतर गृहमंत्री या नात्याने त्यांनी जबाबदारी पार पाडली. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमध्येही ते संरक्षणमंत्री बनले. 1991ची निवडणूक लढवायची नाही हा निर्णय घेतलेल्या नरसिंह राव यांना राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाची जबाबदारी स्वीकारावी लागली. नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी, अल्पमतातील सरकार पंतप्रधान नरसिंह राव यांनी पूर्ण पाच वर्षे चालवले. अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना देशाचे अर्थमंत्रीपद देऊ केले आणि त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. मात्र याच्या जोडीला अनेक वादग्रस्त घटनाही त्यांच्याच कार्यकाळात झाल्या. 1996मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर राजकीय जीवनात ते विजनवासात गेल्यासारखे झाले. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले.