दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 05 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 12.03; नक्षत्र : अनुराधा 25:07
योग : प्रीति 23:44; करण : कौलव 25:16
सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30
पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज शुभ संयोग घडून येतील. मध्यरात्रीनंतर होणारा चंद्राचा वृश्चिक राशीतला प्रवेश तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी देईल, तसेच एखाद्या शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देईल. दुपारनंतर व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर किंवा उच्चपदस्थांकडून विशेष सन्मान मिळू शकेल.
वृषभ – वृषभ राशीचे जातक नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करतील. आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. एखाद्या कायदेशीर वादातही यश मिळू शकते. दिवसभरात एखाद्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागू शकते. ऑफिसचे वातावरण अनुकूल असेल आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.
मिथुन – आजचा दिवस सर्जनशील कामांसाठी उत्तम आहे. तुम्हाला मनःशांती मिळेल आणि आवडती कामे पूर्ण करण्याची भरपूर संधी मिळेल. आज नवीन सकारात्मक कल्पनाही मनात येऊ शकतात. एखाद्या समस्येबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेणे शहाणपणाचे ठरेल.
कर्क – प्रत्येक काम समर्पण आणि कठोर परिश्रमाने करण्याचा दिवस आहे. याचे तत्काळ परिणाम दिसू शकतात. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील आणि काही महत्त्वाच्या बाबींवर वरिष्ठांशी चांगली चर्चा होऊ शकते. कार्यालयामध्ये दिवस चांगला जाईल. दिवसाच्या अखेरीस एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह – आजचा दिवस व्यग्र राहील. तरीही, आध्यात्मिक सराव आणि अभ्यासासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही अडचणी येऊ शकतात, ते तुमच्या कामात काही अडथळे निर्माण करू शकतात, परंतु तुम्ही धीर धरला पाहिजे. संध्याकाळ एखाद्या शुभ कार्यात घालवली जाईल.
हेही वाचा – ताडोबा आणि वाघोबा…
कन्या – कन्या राशीच्या जातकांना संभाषण करताना संयम आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आजूबाजूच्या लोकांशी काही वाद होऊ शकतात, म्हणून जास्त काळजीपूर्वक शब्दांचा वापर करा. काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. आज नशीब तुमच्या बाजूने असू शकते. काही दीर्घकाळ प्रलंबित कामांमध्येही प्रगती होऊ शकते.
तुळ – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी जुने वाद मिटू शकतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित बाबी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्य किंवा शेजारी यांच्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून शहाणपणाने वागण्याची आवश्यकता असेल.
वृश्चिक – आज देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ राहील. आज दिवसभर नफा मिळवण्याच्या संधी मिळत राहतील. कौटुंबिक स्तरावर आनंद आणि स्थिरता असेल. व्यवसायात किंवा नोकरीत काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकेल.
धनु – आज सावधगिरी आणि विवेकाने वागावे लागेल. कमी जोखीम असलेल्या व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम राबवणे फायदेशीर ठरू शकते. जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागण्याची शक्यता आहे. आज एक सर्वोत्तम संधी समोर येणार आहे, मात्र ती तुम्ही ओळखली पाहिजे.
मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. भागीदारीतील व्यवसाय नफा मिळवून देऊ शकतो. आजच्या दिवसात दैनंदिन घरकामाशी निगडीत बाकीची कामे पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढच्या आठवड्यातील दगदग कमी होईल. कायदेशीर नियमांचे पालन करा आणि कामात प्रामाणिक रहा. तुमच्या मल्टीटास्किंग स्वभावामुळे चिंता वाढू शकते.
कुंभ – आज आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बदलत्या हवामानामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे खाण्याच्या सवयींबाबतचा निष्काळजीपणा टाळा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला राहील. घाईघाईने घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे विचार न करता कोणताही निर्णय घेणे टाळा.
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
मीन – मीन राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. संयमाने आणि नम्रतेने कोणतीही समस्या सोडवू शकता. आज, असे काही साध्य करू शकता जे तुम्ही यापूर्वी कधीही साध्य केले नसेल. गरजू व्यक्तीला मदत करणे शुभ ठरेल.
दिनविशेष
ठुमरी गायिका शोभा गुर्टू
टीम अवांतर
प्रसिद्ध ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1925 रोजी शिरोडकर या सांगीतिक परंपरा असणाऱ्या घराण्यात बेळगाव (कर्नाटक) येथे झाला. आई मेनकाबाई शिरोडकर या नृत्य आणि गायन करीत. त्यांनी उस्ताद भूर्जीखाँ यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याचे संगीताचे धडे घेतले. शिवाय, त्या ठुमरी गायकही होत्या, त्यामुळे भानुमतींना (शोभा गुर्टू यांचे माहेरचे नाव) लहानपणापासून आईकडून गाण्याचे बाळकडू मिळाले. पुढे जयपूर घराण्याचे नत्थनखाँ यांच्याकडे ख्यालाचे तर, घम्मनखा यांच्याकडे ठुमरी, दादरा, गझल आणि अन्य उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण भानुमतींनी घेतले. त्यांचा विवाह बेळगाव पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संगीतातील विद्वान आणि सतारवादक नारायणराव गुर्टू यांचा मुलगा विश्वनाथ गुर्टू यांच्याशी झाला. विवाहानंतर त्या शोभा गुर्टू झाल्या. ठुमरी, दादरा, कजरी, सावन, झुला, चैती, फाग, होरी, बारामासा, मांड असे विविध संगीतप्रकार त्या कुशलतेने गात. तसेच, गझल आणि भजन हे गानप्रकारही त्या अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर करीत. सुरुवातीला त्या रागदारीमधील एखादी बंदिशही गात असत. बेगम अख्तर यांच्या गायनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ‘छोटी अख्तरी’ असेही त्यांना संबोधले गेले. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तांबडी माती, सहकार सम्राट, धन्य ते संताजी धनाजी, कलावंतीण आणि झाकोळ या मराठी चित्रपटांकरिता त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदीमध्ये त्यांनी पाकीजा या चित्रपटाकरिता पहिल्यांदा पार्श्वगायन केले. याशिवाय ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटात गायलेली ‘सैय्याँ रूठ गये में मनाऊँ कैसे’ ही ठुमरी विशेष प्रसिद्ध झाली. या गाण्यास फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी ठुमरीचे कार्यक्रम सादर केले. त्यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्वाला अनेक मानसन्मान लाभले. त्यापैकी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी सन्मान उल्लेखनीय. पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर त्यांनी गायनाचे अनेक कार्यक्रम केले. सरला भिडे, शुभा जोशी, धनश्री पंडित, बिरेश्वर गौतम ही त्यांची शिष्यमंडळी त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. शोभा गुर्टू यांचे मुंबई येथे 27 सप्टेंबर 2004 रोजी निधन झाले.


