दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 27 मार्च 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 06 चैत्र शके 1948; तिथि : नवमी 10:06; नक्षत्र : पुनर्वसु 15:23;
- योग : अतिगंड 22:09; करण : तैतिल 21:23;
- सूर्य : मीन; चंद्र : मिथुन 09:35; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:50;
- पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
चैत्री नवरात्र समाप्ती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
मराठी कथाकार शरच्चंद्र चिरमुले
टीम अवांतर
मराठी कथाकार शरच्चंद्र चिरमुले यांचा जन्म 15 जानेवारी 1931 रोजी झाले. एम.ए. झालेले शरच्चंद्र चिरमुले पुण्याच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. कालंतराने त्यांनी तिथे प्राचार्यपदही भूषविले. कवी गिरीश हे मामा असल्यामुळे बालवयातच त्यांचा साहित्याशी संबंध जोडले गेले. मामांमुळे त्यांना कवितेचा छंद जडला. ‘अभिरुची’ मासिकातून काही कविता प्रकाशितही झाल्या.
‘कामरूपचा कलावंत’ ही त्यांची पहिली कथा आणि 1949 साली ‘वाङ्मयशोभा’मध्ये प्रसिद्ध झाली. 1966 ते 1992 या काळात त्यांचे ‘श्री शिल्लक’, ‘कॉग्ज’, ‘एका जन्मातल्या गाठी’, ‘पूल’, ‘पार्थिवाचे रंग’ असे पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘पोलोनिअसचे पिशाच’ ही पहिली विनोदी कथा त्यांनी 1986मध्ये लिहिली. तर, ‘पुनरुत्थान आणीबाणीचे’ आणि ‘सत्तावीस नक्षत्रांचे देणे’ या कथा चिं. वि.जोशी यांच्या विनोदी शैलीशी जवळीक दर्शविणाऱ्या आहेत. याशिवाय, ‘वास्तुपुरुष’ हे आत्मवृत्तात्मक आणि ‘जीवितधागे’ हे ललित निबंध लेखन केले.
हेही वाचा – Ayurveda : आहारातील चुका, वसंत ऋतूत काय खाणे टाळावे?
‘श्री शिल्लक’ या कथासंग्रहासाठी 1968 साली त्यांना ललित पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ‘कॉग्ज’ कथासंग्रह 1974-75 साली महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. 1986 साली ‘एका जन्मातल्या गाठी’ कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार तर 1988 साली ‘वास्तुपुरुष’ लेखसंग्रहासाठी कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले.
जी. ए. कुलकर्णी, चि.त्र्यं. खानोलकर, विद्याधर पुंडलिक, आनंद विनायक जातेगावकर हे चिरमुले यांचे समकालीन कथाकार होते. मराठी कथासाहित्यात साठोत्तरी कथाकारांमधील एक लक्षणीय कथाकार असलेल्या शरच्चंद्र चिरमुले यांचे 27 मार्च 1992 रोजी निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे, ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. मित्रांसोबत फिरायला जाताना विचारपूर्वक खर्च करा.
वृषभ – कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही शंभर टक्के सहकार्य मिळेल. वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यास शिका. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर द्या, भविष्यात त्याचा खूप फायदा होईल.
मिथुन – कामाचा ताण आणि घरातील वाद यामुळे त्रस्त व्हाल. असे असले तरी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत नम्रपणे वर्तन करा. अन्यथा, नोकरी धोक्यात येऊ शकते. व्यवसायामध्ये भागीदारांना गृहीत धरू नका. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे.
कर्क – आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आत्मविश्वास मिळवून देईल. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा, त्याने आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल.
सिंह – नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. गुंतवणूक करताना उतावीळपणा करू नका, पूर्ण माहिती घेऊन, विचारांती निर्णय घ्या. आवश्यक वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या कामापासून आराम घेऊन आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कन्या – उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपविली जाईल. मात्र, मेहनतीच्या जोरावर त्यात यश मिळवाल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी अंतिमत: प्राप्त होईल. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांबरोबर अथवा कुटुंबीयांबरोबर रम्य सहलीचा बेत आखाल.
तुळ – आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तब्येतीच्या लहानसहान कुरबुरी सुरू राहतील.
हेही वाचा – त्याच्या आठवणींची खोल दरी
वृश्चिक – शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. बोलण्यावर ताबा ठेवा, रागाने किंवा थट्टा मस्करीमुळे एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. बाहेरचे पदार्थ खाऊ नका, तब्येतीची काळजी घ्या.
धनु – कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल, तिथे प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. धन लाभ होऊ शकतो, मात्र रागीट स्वभावाच्या कारणाने ही संधी तुम्ही गमावू शकता.
मकर – व्यवसायातील अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल पाहायला मिळेल. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे चिंतीत व्हाल. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा त्यांना शांतपणे समजावल्यास, ते आपली मते स्वीकारतील.
कुंभ – नोकरीच्या ठिकाणी हसतखेळत कामाचा उरक दाखवाल यामुळे वरिष्ठ खूश होतील. व्यवसायात नवीन करार होतील, पण हे करताना सावधगिरी बाळगा. कागदपत्रांची योग्य प्रकारे पडताळणी करा. मान्यवर ज्येष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील.
मीन – कामाच्या ठिकाणी ज्याला प्रतिस्पर्धी समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला जाणीव होईल. आज चांगल्यापैकी पैसा मिळेल, परंतु तो वायफळ खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. कुटूंबातील तुमच्या वर्चस्ववादी दृष्टिकोना टीका होण्याची शक्यता आहे.


