Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 27 डिसेंबर 2025; वार : शनिवार
  • भारतीय सौर : 06 पौष शके 1947; तिथि : सप्तमी 13:09; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 09:09
  • योग : व्यतिपात 12:20; करण : विष्टी 24:39
  • सूर्य : धनु; चंद्र : मीन; सूर्योदय : 07:08; सूर्यास्त : 18:07
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – काही अपूर्ण कामे आज पूर्ण होतील. अनावश्यक धावपळ टाळणे चांगले. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. कामात योग्य सोयीसुविधा मिळाल्याने वातावरण सकारात्मक राहील. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये योग्य सल्ला आणि पर्याय यांचा समावेशही असेल.

वृषभ – कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आशा आणि उत्साह यामुळे कामाचा उरक वाढेल. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे गिफ्ट म्हणून मिळू शकतात. हा आनंदाचा आणि उत्साहाचा काळ असेल.

मिथुन – कामातून लहान-मोठा नफा मिळाल्याचा आनंद होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुमची घाई होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिणामही पाहायला मिळतील. आनंदाची भावना संबंध दिवस कायम असेल. मनोरंजनाचा खर्च वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात रस निर्माण होईल.

कर्क – भूतकाळातील काही समस्या पुन्हा उद्भवू शकतात. प्रियजनांना आर्थिकदृष्ट्या आधार द्यावा लागेल. आज दिवसभर आपल्या संघर्षात आपण एकटेच आहोत, इतर कोणाचीही साथ नाही, ही भावना प्रबळ असेल. अपवादात्मक इच्छित कामे केवळ परिश्रमानेच पूर्ण होतील. कामाचा ताण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करेल, काळजी घ्या.

सिंह – आधी केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळू शकतो. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. शुभ कार्याचे आयोजन कराल. आज  तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणाकडूनही काहीही नकारात्मक ऐकू येऊ नये, याची काळजी घ्या. फायदेशीर कामांमध्ये सक्रिय राहाल.

कन्या – कामाबद्दल वाटाघाटी करणे ही फारशी चांगली कल्पना ठरणार नाही. हा काळ नकारात्मक परिणामांचा  आहे. कामाच्या प्रगतीत तुम्हाला अडथळे जाणवतील. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या दूरच्या व्यावसायिक भेटीगाठी पुढे ढकला. सुरू असणारे काम काळजीपूर्वक हाताळा.

तुळ – विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नकारात्मक विचारांनी काम करणे, योग्य ठरणार नाही. हा काळ नकारात्मक परिणामांचा काळ आहे. चांगल्या प्रयत्नांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहा.  कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाद किंवा टोकाची भांडणे होण्याचा धोका आहे.

हेही वाचा – आराध्या या जंगलात का आली होती?

वृश्चिक – काही प्रमाणात आर्थिक चिंता कमी होतील. नियोजित निधीतून नफा मिळू लागेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील आणि आर्थिक अडचणींपासून थोडीशी सुटका होईल. वाढत्या नफ्यातून काही प्रमाणात दिलासा मिळेल. हातात असलेल्या वेळेचा योग्य वापर करा.

धनु – आधी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे आज फायदा होईल. त्यामुळे आता आळस सोडून द्या. परिश्रमपूर्वक कठोर परिश्रम केल्याने फायदा होईल. इतरांच्या प्रश्नांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. ओळखीचे वर्तुळ विस्तारेल. संपत्तीत वाढ होईल.

मकर – जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले. उत्पन्न आणि खर्च स्थिर राहील. कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला सहकाऱ्यांकडून आणि कुटुंबीयांकडून सतत पाठिंबा मिळेल. गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ – आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक दर्जा वाढेल. शैक्षणिकाशी संबंधित काम सहज पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित करा, यश मिळेल. नोकरीत मात्र सावधगिरी बाळगा.

मीन – तुम्ही घेतलेल्या निर्णयाला प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. जोडीदार आणि संततीबद्दल थोडी चिंता असेल. शैक्षणिक परिस्थिती उत्तम असेल. खाण्याच्या सवयींबद्दल मात्र  काळजी घ्या. व्यवसायात प्रगती होईल. आज सहकाऱ्यांकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे हातातील कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.


दिनविशेष

भावगीत गायिका मालती पांडे बर्वे

टीम अवांतर

मराठीतील सुप्रसिद्ध भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचा जन्म 19 एप्रिल 1930 रोजी झाला. आपल्या अवीट गायनामुळे मालती पांडे यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवले. मालतीबाईंना शास्त्रीय गायनाची तालीम त्रिवेदी मास्तर, भास्करराव घोडके, विलायत हुसेन खाँ, भोलानाथजी घट्ट, पद्माकर बर्वे, जगन्नाथबुवा पुरोहित, हिराबाई बडोदेकर, विनायकबुवा पटवर्धन या गुरूंकडे मिळाली. मूळच्या विदर्भातील वर्ध्याच्या या गायिकेने भावगीतांच्या दुनियेत प्रवेश केला. आपल्या सुमधुर स्वरात पुढे काही वर्षे उत्तमोत्तम गाणी गायली आणि संगीतप्रेमींना अपार आनंद दिला.

हेही वाचा – रेल्वे म्हणजे सरकारमान्य मृत्यूचा सापळा!

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा आकाशवाणी मुंबई केंद्रावर सुगम गायनाचा पहिला कार्यक्रम झाला. त्याआधी महाविद्यालय असताना ‘घराबाहेर’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यामुळे प्रभातच्या ‘आगे बढो’ या चित्रपटासाठी संगीतकार सुधीर फडके यांनी मालतीबाईंना बोलावून घेतले. ‘वेद मंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम’, पुढचे पाऊल पुढेच टाका, त्या तिथे पलीकडे यासारखी त्यांनी गायलेली चित्रपट गीते प्रचंड गाजली. गजानन वाटवे यांनी संगीतबद्ध केलेली ‘ये पिकवू अपुले शेत मंजुळे’, आला स्वप्नांचा मधुमास, कुणीही पाय नका वाजवू, वळणावरून वळली गाडी यासारखी गीते लोकप्रिय ठरली.

याशिवाय मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली, खेड्यामधले घर कौलारू आणि या कातर वेळी, या गाण्यांनी रसिकांची मोठी दाद मिळवली.  प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गदिमांच्या गाण्याला मालतीबाईंचा चढलेला स्वरसाज 1960 साली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. अशा या गायिकेचे 27 डिसेंबर 1997 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!