Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 26 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 26 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 26 डिसेंबर 2025; वार : शुक्रवार
  • भारतीय सौर : 05 पौष शके 1947; तिथि : षष्ठी 13:43; नक्षत्र : शततारका 08:59
  • योग : सिद्धी 14:00; करण : गरज 25:30
  • सूर्य : धनु; चंद्र : कुंभ 27:10; सूर्योदय : 07:08; सूर्यास्त : 18:07
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस आनंदाचा असेल. मात्र आज कागदपत्रांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. कोणताही नवीन उपक्रम हाती घेण्यापूर्वी कायदेशीर बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

वृषभ – आजची सुरुवात चांगली होईल. दिवसाच्या पूर्वार्धात व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवण्याची संधी मिळेल. एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर, आज ती जिंकू शकता. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत करावी लागेल. कौटुंबिक आघाडीवर आजचा दिवस शुभ असेल.

मिथुन – इतरांच्या भावना ओळखून त्यानुसार वागलात तर मोठे आत्म-समाधान मिळेल. अधूनमधून इतरांचेही ऐकण्यात काहीच गैर नाही. ऑफिसमध्येही, कठीण समस्या सोडवण्याची टीमवर्क ही गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा.

कर्क – आज, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. या संधी ओळखणे आणि त्या संधींचा फायदा घेणे, ही तुमची मोठी जबाबदारी आहे. तसेच, हे लक्षात ठेवा की, संधी तुमच्या दारावर वारंवार येत नाहीत. तोंडावर ताबा ठेवा, अनेक प्रश्न सुटतील.

सिंह – ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला छोटे कर्ज दिले जाऊ शकते. इतरांना आर्थिक मदत करू शकता. एखादी कठीण समस्या सोडवली जाईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला जवळच्या व्यक्तीपासून थोड्या काळासाठी दूर राहावे लागू शकते.

कन्या – आजचा दिवस अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आहे. घरातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. दिवसाच्या उत्तरार्धात, प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. व्यवसायात कोणताही धोका पत्करणे फायदेशीर ठरणार नाही, सावधगिरी बाळगा.

हेही वाचा – Love Story : एक नवी रेशीमगाठ!

तुळ – आज जुने कर्ज फेडू शकाल. काही आवश्यक वस्तूंची खरेदी करावी लागेल. तथापि, खर्चावर नियंत्रण ठेवा. उपयुक्त नसलेल्या गोष्टी खरेदी करणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

वृश्चिक – आजचा दिवस खूप व्यग्र रहाल. दिवसाच्या पूर्वार्धात  तुम्हाला काही महत्त्वाचे फोन कॉल्स आणि ईमेल्सना उत्तर द्यावे लागेल. एखादा जुना मित्र अचानक तुम्हाला सरप्राइज देऊ शकतो. एखाद्याने कर्ज मागितले तर आधी तुमच्या बचतीचा आढावा घ्या.

धनु – आज कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सर्जनशील कामातील तुमची आवड देखील वाढेल. संध्याकाळी एखादी आवश्यक वस्तू खरेदी कराल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद घालणे टाळा आणि त्यांची मते ऐकून घ्या. वेळप्रसंगी त्यांचा तुम्हाला मोठा फायदा होईल.

मकर – सकाळपासूनच तुम्हाला नवीन प्रोजेक्टसाठी नवीन ऊर्जा आणि ताकद जाणवेल. कौटुंबिक जीवनातही तुम्ही खूप उत्साहित असाल. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होईल. मात्र तुमच्या उत्साहाला लगाम घालणे आवश्यक आहे.

कुंभ – दिवसाच्या सुरुवातीला छोटासा आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, त्यामुळे आलेली संधी सोडू नका. एकदा तुम्हाला अनुभव मिळाला की, आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल.

मीन – आज तुम्ही स्वतःमध्ये पूर्णपणे मग्न असाल. विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देऊ नका. स्वतःचे काम करत रहा. यश तुम्हालाच मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल.


दिनविशेष

कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणारे बाबा आमटे

टीम अवांतर

कुष्ठरोग्यांच्या सुश्रूषेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार होते. खानदानी श्रीमंती घराण्यात चालत आलेली होती. त्यामुळे बाबांचे बालपण ऐश्वर्यात गेले. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काही काळ वकिलीही केली. मात्र त्यात ते फार काळ रमलेच नाहीत. पुढे त्यांची ओळख साधनाताईंशी झाली आणि घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केले. एका कुष्ठरोग्याला बघून बाबांना आपल्या जीवनाचे ध्येय मिळाले आणि 1952 साली वरोऱ्याजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली.

आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्यांची केवळ सुश्रुषाच नाही, तर या रुग्णांना आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडचणींवर, आव्हानांवर मात करत केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंध, मूकबधिरांसाठी त्यांनी विशेष शाळा निर्माण केल्या. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण आणि  पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालये तसेच अन्य प्रकल्पांची उभारणी केली. कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली. प्रौढ अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम यांसारखे व्यवसाय प्रशिक्षण सुरू केले; त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती आणि शेतीला जोड म्हणून दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन असे कुटिरोद्योग सुरू केले.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे हा प्रकल्प सांभाळत आहेत. तर आनंदवनचे कामकाज त्यांचे पुत्र विकास आमटे पुढे चालवत आहेत.

हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…

बाबांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. त्यामुळे रॅमन मॅगसेसे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार, आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा रोल ऑफ ऑनर, पर्यावरणासंदर्भातील ग्लोबल 500 पुरस्कार, पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार, राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबांना सन्मानित करण्यात आले. भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मविभूषण, अपंग कल्याण पुरस्कार, तर महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार, जस्टिस के. एस. हेगडे पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार, राष्ट्रीय भूषण पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, एन. डी. दिवाण पुरस्कार, राजा राम मोहन राय पुरस्कार, भरतवास पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी बाबा आमटे यांना गौरविण्यात आले. 9 फेब्रुवारी 2008 रोजी आधुनिक काळातील या महात्म्याचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!