Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 26, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 26 ऑगस्ट 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 04 भाद्रपद शके 1948; तिथि : त्रयोदशी 07:58 ; नक्षत्र : श्रवण 24:47;
    • योग : सौभाग्य 07:58; करण : गरज 20:37;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    बुधपूजन

    ऋक् श्रावणी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान

    टीम अवांतर

    समाजवादी विचारवंत, राजकारणी आणि लेखक गणेश प्रभाकर म्हणजेच ग.प्र.प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1922 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच ते ना.ग.गोरे आणि एस. एम. जोशी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यासाठी 13 महिन्यांच्या येरवड्यातील तुरुंगवासाही त्यांना सामोरे जावे लागले. पुढे त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष आणि राष्ट्र सेवादलासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.

    1975 च्या आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते. 1945 पासून पुढे 20 वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयांत ते इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळेच ते प्रधान मास्तर या नावाने अधिक प्रसिद्ध झाले.

    हेही वाचा – गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    प्रधान यांनी मराठी तसेच इंग्रजी भाषेत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले. त्यांनी एकंदर 14 ग्रंथ लिहिले. यात आगरकर, टिळक, आंबेडकर, गांधीजी, ना.ग. गोरे यांच्यावर जसे लेखन आहे तसेच इंग्रजीतील प्रसिद्ध लेखक टॉलस्टॉय यांच्याशी पत्रव्यवहार करून संवाद साधल्यास तो कसा असेल याची कल्पना करत ‘लेटर्स टू टॉलस्टॉय’ या ग्रंथाची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत’ हे प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे ठरले आहे. डॉ. आंबेडकर हयात असून त्यांची एक तरुण पत्रकार मुलाखत घेत आहे, अशी कल्पना करून प्रा. प्रधान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच हे पुस्तक वरकरणी साधे, सोपे, सरळ वाटते; पण जरा खोलात उतरल्यावर ते अवघड असल्याचे जाणवते.

    ग्रंथ लेखनाशिवाय ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक म्हणून देखील कार्यरत होते. साने गुरुजींचे सच्चे वारसदार म्हणून प्रधान सर ओळखले जायचे. विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा कायम सक्रिय सहभाग असे.

    प्रजासमाजवादी पक्षातर्फे 1966 साली ते पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे ते 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते, यातील काही काळ त्यांनी विरोधी पक्षनेतेपद तसेच हंगामी सभापती पदही भूषवले. ‘लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक’ या ग्रंथासाठी त्यांना 2009 सालचा राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला. समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधान यांच्या जीवनकार्याचा आणि समाजसेवेचा परिचय देणाऱ्या लघुपटाची निर्मिती केली आहे. 29 मे 2010 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज तुम्हाला सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. नवीन घर खरेदी करण्याचा विचार पुढे येईल. याशिवाय स्वतःची जीवनशैली सुधारण्यासाठी खर्च करण्याची इच्छाही तुम्हाला होऊ शकते. अर्थात खर्च आणि बचत यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि पाठिंबा तुम्हाला अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करू शकतात. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, कारण अगदी किरकोळ समस्याही गंभीर रूप धारण करू शकतात.

    वृषभ – संयम आणि शांत स्वभाव ही तुमची आज सर्वात मोठी ताकद असेल. प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करणे आवश्यक नाही. उलट अति बोलण्यामुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही सहलीची किंवा प्रवासाची योजना आखत असाल, तर ती काही काळासाठी पुढे ढकलणे उत्तम राहील. कुटुंबात सलोखा राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. एका लहानशा मुद्द्याचे मोठ्या भांडणात रूपांतर  होऊ शकते, म्हणून विचारपूर्वक वागा.

    मिथुन – आज घाईने घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो, म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता, त्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मात्र, जुने आर्थिक व्यवहार किंवा समस्या पुन्हा उद्भवू शकतात. अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतःच्या आर्थिक कागदपत्रांची कसून तपासणी करा.

    कर्क – आज नशीबाची मोठी साथ तुम्हाला मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराला करिअरमध्ये एखादी मोठी बढती मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाणे फायदेशीर ठरेल. केवळ मौजमजेच्या नादात महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामुळे नंतर दबाव वाढू शकतो.

    सिंह – आज आर्थिक समस्या निर्माण होतील, त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादी चांगली बातमी कौटुंबिक वातावरण बदलून टाकेल. नोकरी शोधणाऱ्या जातकांना चांगली संधी मिळू शकते. स्वतःच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा. अयोग्य मार्गांनी किंवा शॉर्टकटने फायदा मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे नंतर महागात पडू शकते.

    कन्या – आज दिवसभर तुमची धावपळ होऊ शकते, तसेच काही कामांमध्ये किरकोळ अडथळे होऊ शकतात. प्रकृतीतील चढ-उतारामुळे थकवा जाणवेल, म्हणून विश्रांतीसाठी वेळ काढा. पाहुण्यांच्या आगमनाने उत्साह वाढेल, पण एखाद्या जुन्या मुद्द्यावरून तुमच्यात वाद होण्याचीही शक्यता आहे. परिस्थिती चिघळवण्याऐवजी शांत राहणेच उत्तम. संततीकडून आलेल्या चांगल्या बातमीमुळे तुमचा मूड सुधारेल. धार्मिक कार्यांकडे आज तुमचा कल असेल.

    तुळ – सकारात्मक ऊर्जा आज तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नवीन लोकांशी जोडले जाल आणि तुमच्या ओळखीचे वर्तुळ विस्तारू शकते. मात्र प्रत्येकजण तुमचा हितचिंतक आहे असे समजण्याची चूक करू नका. कोणाहीकडून पैसे उधार घेणे टाळणेच उत्तम, कारण नंतर ते परत करण्याच्या दबावामुळे निराशा येऊ शकते. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. वडील तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज असू शकतात, म्हणून त्यांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.

    वृश्चिक – आज आर्थिक लाभाची प्रबळ चिन्हे आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. एखादे कायदेशीर प्रकरण सोडवण्यासाठी तुम्हाला योग्य सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. तुमची मेहनत आणि प्रतिभा तुम्हाला कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल. प्रवास, पर्यटन किंवा वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

    हेही वाचा – केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    धनु – आज प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. घरातील महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका, कारण लहान चुकांमुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी किंवा करिअरशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेतही आखू शकता.

    मकर – आज तुम्ही महत्त्वाच्या कामांमध्ये खूप व्यस्त असाल, पण तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न कराल. संततीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते.  कुटुंबासोबत एखाद्या शुभ किंवा मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमध्ये जवळीक निर्माण होईल आणि घरात आनंदी वातावरण नांदेल.

    कुंभ – राजकारण आणि सार्वजनिक जीवनात सहभागी असलेल्यांसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण यश घेऊन येऊ शकतो. तुमची ओळख, प्रभाव आणि सार्वजनिक प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. जोडीदार नवीन नोकरी किंवा करिअरच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकेल. कौटुंबिक बाबींवर चर्चा करताना संयम बाळगा, कारण चुकीच्या शब्दांमुळे तणाव वाढू शकतो. गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्ती किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल.

    मीन – आज काही समस्यांमुळे कामाचा वेग मंदावू शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याची घाई करू नका. दिखाव्यासाठी पैसे खर्च करणे टाळा. स्वतःच्या आरोग्याबाबत काळजी घ्या, कारण जुन्या शारीरिक समस्या पुन्हा उद्भवू शकतात. कार्यालयातील जबाबदाऱ्या इतरांवर सोपवण्याऐवजी स्वतःच सांभाळणे चांगले. कागदपत्रे आणि अटींची सखोल तपासणी केल्याशिवाय मालमत्तेसंबंधी कोणत्याही बाबीत पुढे जाऊ नका.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 03…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 408
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 550
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 876
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.