दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 26 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 04 भाद्रपद शके 1947; तिथि : तृतीया 13:54; नक्षत्र : हस्त 30:03
योग : साध्य 12:07; करण : वणिज 26:45
सूर्य : सिंह; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:58
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
- हरतालिका तृतीया
- स्वर्णगौरी व्रत
- सामश्रावणी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस आयुष्यात काही मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल. सर्जनशीलतेने भरलेला दिवस असेल. पैशाच्या बाबी हुशारीने हाताळा. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही नातेसंबंधांबाबत जरा सबुरीने वागा. दोन्ही नात्यांमध्ये संवाद महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
वृषभ – खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या परीक्षेत तुम्ही उत्तम कामगिरी कराल किंवा आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. कल्पना आणि प्रकल्प पुढे नेण्यास तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा, उत्साह प्रेरित करेल.
मिथुन – आज पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. आरोग्याच्या समस्या असतील तर बाहेरचे अन्न खाणे टाळा. आजचा दिवस आनंदाचा असेल. विवाहित जातक जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात.
कर्क – आजचा दिवस आव्हाने आणि संधी दोन्ही एकदम घेऊन येऊ शकतो. काही जातकांसाठी दिवस धावपळीचा राहील. अडचणींवर मात करू शकाल, त्यामुळे दिवसाखेर आनंदी असाल. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोडीदाराचे मत विचारात घेणे फायदेशीर ठरेल.
सिंह – आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. बदल स्वीकारा आणि स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. तुमचे मन उत्तम मार्गदर्शक असेल. वैयक्तिक प्रगती आणि व्यावसायिक संधींसाठी उत्तम दिवस आहे.
कन्या – आजचा दिवस वैयक्तिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात काम आणि इच्छा यांचे संतुलन साधण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक असेल. मात्र यासोबतच वैयक्तिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा देखील आहे. सकारात्मक ऊर्जा असेल. खुल्या मनाने संधी स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
तुळ – आजचा दिवस फलदायी ठरणारा आहे. परीक्षांनी भरलेला दिवस, पण तितकेच फायदेशीर निकालही देणारा असा दिवस. आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड द्या. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा, सतत कार्यमग्न रहा. फायदा होईल.
वृश्चिक – आज महत्त्वाचे बदल होतील. ते बदल स्वीकारा. हा दिवस प्रगतीच्या संधींकडे लक्ष वेधणारा आहे. भावनिक आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.
धनु – आज कामाच्या निमित्ताने खूप धावपळ होऊ शकते. काही जातकांना कार्यालयात वरिष्ठांकडून शाब्दिक फटकार सहन करावे लागतील. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. जितके सकारात्मक असाल तितके चांगले. मेजवानीचा योग आहे.
मकर – प्रेमाच्या बाबतीत नशीबाची जोरदार साथ मिळेल. त्याचवेळी ‘अडचणी येत राहतात, परीक्षा घेतात आणि जातात’ हे सूत्र लक्षात ठेवा. पैशाची आवक नक्कीच वाढेल, पण खर्चही वाढतील. काही जातकांसाठी दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो.
कुंभ – नातेसंबंधांमध्ये संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित करा. गैरसमजांमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले विचार आणि त्यामागचा हेतू स्पष्ट करावा लागेल. आजच्या दिवशी स्वतःकडेही थोडे लक्ष द्या. कामाचा जास्त ताण घेऊ नका.
मीन – आजचा दिवस सर्जनशील असेल. नवीन आव्हाने खुल्या मनाने स्वीकारा. वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीला चालना देणारा हा दिवस आहे. नवीन संधी चालत येतील, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या.
हेही वाचा – एका संपाची कहाणी
दिनविशेष
अवलिया अनिल अवचट
टीम अवांतर
ओरिगामी, लाकडातील शिल्प-कोरीव काम, फोटोग्राफी, चित्रकला अशा कलांचा छंद तर बासरीचा नाद. वाचनाचं, भ्रमंतीचं वेड असणारे अनिल अवचट यांचा जन्म 26 ऑगस्ट 1944 रोजी पुणे जिल्ह्यातील ओतुर येथे झाला. वडीलांच्या इच्छेनुसार ते पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले. मात्र समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन करायला त्यांनी सुरूवात केली. वेध, हमीद, अंधेरनगरी, निपाणी, छेद, माणसं, संभ्रम, वाघ्यामुरळी, कोंडमारा, गर्द, धागे आडवे उभे, धार्मिक, स्वत:विषयी, अमेरिका, कार्यरत, आप्त, छंदाविषयी, प्रश्न आणि प्रश्न, जगण्यातले काही आणि मजेदार ओरिगामी, पुणे हवेसे, लाकूड कोरताना, सरल–तरल, बहर शिशिराचा, अमेरिकेतील फॉल सीझन असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. भोवतालच्या घटनांकडे, वृत्तीप्रवृत्तीकडे बघण्याची चौकस, शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, पांढरपेशा, बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, त्यांच्या लेखनातून वेळोवेळी नेमकेपणाने व्यक्त झालेली दिसते. अवचट यांचा जीवनविषयक दृष्टिकोन गंभीर, बांधिलकी हे मूल्य मानणारा होता. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टिकोन व्यक्त होत असे. विषय गंभीर असले तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय, लोकप्रिय झाले. पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या पुढाकाराने ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी सुरू केले. व्यसनाधीन पुरुष, महिला, व्यसनाधीन पुरुषांच्या पत्नींसाठीचे कार्य तसेच विविध गट, कंपन्या, पोलीस दल यांचे जनजागरण यासारखी अनेक कामे मुक्तांगणतर्फे केली जात आहेत. फाय फाउंडेशन पुरस्कार, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार, महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचे देखील ते मानकरी होते. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल 26 जून 2013 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 27 जानेवारी 2022 रोजी त्यांचे निधन झाले.