दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 25 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार
भारतीय सौर : 03 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 07:05; नक्षत्र : स्वाती 19:07
योग : वैधृती 21:52; करण : वणिज 20:17
सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32
पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि घरातील वातावरण आनंददायी असेल. एखादा महत्त्वाचा प्रवास दौरा होण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील. खर्च करताना हुशारीने करा. सामाजिक जीवनात आदर मिळेल.
वृषभ – एखाद्या कामासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील आणि संबंध सुधारतील. विद्यार्थ्यांनी त्यांचे कठोर परिश्रम सुरू ठेवावेत, त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल.
मिथुन – ऊर्जा आणि उत्साहाने दिवस परिपूर्ण असाल. व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सामाजिक संबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील.
कर्क – सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा. जर काही वाद होत असतील पुढील संघर्ष टाळणे चांगले. शांतपणे संवाद साधा. शैक्षणिक उपक्रमांसाठी आजचा दिवस खर्ची करावा लागेल, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मित्रांसोबत धावाधाव करणे, या घटनेचाही समावेश आहे.
सिंह – मनोबल उंचावलेले राहील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. संतती अभ्यासात चांगली कामगिरी करतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, मात्र तरीही यावेळी कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सामाजिक दर्जाही वाढेल.
ङेही वाचा – ताईत… अंधश्रद्धेचा पगडा
कन्या – आज काळजीपूर्वक काम करा. भावंडांशी समन्वय ठेवा. प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात, परंतु प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्यातून सामाजिक संबंध सुधारतील.
तुळ – कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद वाढेल. प्रवास शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी त्यांचे कठोर परिश्रम सुरू ठेवावेत, त्याचे परिणाम चांगले मिळतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु खर्च करताना नीट काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक होईल. सामाजिक जीवनात आदर वाढेल.
वृश्चिक – करत असलेल्या कामांबाबतचे प्रयत्न यशस्वी होतील, मात्र त्यात उशीर होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध दृढ होतील. नवीन व्यवसाय करार होऊ शकतात, ज्यातून अनपेक्षित नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
धनु – सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवून त्यानुसार काम करा. काही अनपेक्षित गोष्टी तुमच्या ऑफिसमधील कामावर परिणाम करू शकतात, त्यामुळे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. कामाच्या दृष्टीने नवीन नातेसंबंध जोडले जातील. त्याशिवाय प्रवासही होण्याची शक्यता आहे. आज कठोर परिश्रम करा, त्यातून उत्तम यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या बचतीचा काही भाग खर्च होण्याची शक्यता आहे.
मकर – वडीलधाऱ्यांशी संबंध सुधारतील. प्रवासाच्या संधी आहेत, ज्यातून काही शुभ कार्ये ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे चांगले निकाल बघायला मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न फळ देतील.
कुंभ – आज कामाशी संबंधित योजना राबवण्यात विलंब होऊ शकतो. मित्रांसोबत किंवा कामासाठी प्रवास करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, त्यात त्यांना हमखास यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एखाद्या घरगुती कामानिमित्ताने परिवारात तुमचे कौतुक होईल.
हेही वाचा – मृत्यूपत्र… भाऊ आणि आईला कोर्टात खेचण्याची तयारी
मीन – आजची परिस्थिती काहीशी अनुकूल तर काहीशी प्रतिकूल असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिली. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि संतती तुमच्याशी संवाद साधतील, त्यामुळे संबंध आणखी दृढ होतील. प्रवासाच्या संधी फायदेशीर ठरतील. काही बाहेरील लोकांमुळे तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे, मात्र समजूतदारपणामुळे सर्व काही ठीक होईल.
दिनविशेष
व्यासंगी पत्रकार माधव गडकरी
टीम अवांतर
एक झुंझार पत्रकार, संपादक, सिद्धहस्त लेखक, फर्डे वक्ते अशी माधव गडकरी यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1928 रोजी मुंबईत झाला. राम नारायण रुईया महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन त्यांनी बी.ए. (ऑनर्स) केलं. शिक्षण पूर्ण केल्यावर, 1953 साली त्यांच्या संपादकत्वाखाली ‘निर्धार’ हे साप्ताहिक सुरू झालं. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या मुख्यालयात संदर्भ आणि संशोधन अधिकारी म्हणून कामही पाहिलं. 1962च्या सुरुवातीस ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समूहाने मराठी वृत्तपत्र काढण्याचं ठरवलं, तेव्हा गडकरी यांची निवड मुख्य उपसंपादक म्हणून करण्यात आली. तिकडे पाच वर्षं काम केल्यावर ‘दैनिक गोमंतक’चे ते संपादक झाले. ‘रविवारचा दृष्टीक्षेप’ हे एक महत्त्वाचे सदर माधवरावांनी ‘रविवार गोमंतक’ मध्ये 1967मध्ये सुरू केले. तेच पुढे ‘मुंबई सकाळ’ आणि ‘लोकसत्ता’ मध्येही चालू ठेवले. या सदरातील लेखात आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रातील विषयांना ते स्पर्श करीत. (यापैकी ‘रविवार गोमंतक’मधील लेखांची एकूण संख्या 320 आहे.) यातील निवडक लेख ‘दृष्टीक्षेप’ च्या तीन खंडात प्रसिद्ध झाले. 2 एप्रिल 1984 रोजी माधव गडकरी ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून रुजू झाले आणि 24 सप्टेंबर 1992 पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षं त्यांनी ‘लोकसत्ता’चे संपादकपद सांभाळले. गडकरी ‘लोकसत्ता’ चे संपादक असताना त्यांनी पुढाकार घेऊन दोन महत्त्वाचे उपक्रम यशस्वी केले. त्यातील पहिला म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या ‘सामाजिक परिषद’ या संस्थेचे पुनरुज्जीवन आणि दुसरा म्हणजे, जागतिक मराठी परिषदेची स्थापना आणि तिची पहिली दोन अधिवेशने. देश- विदेशात अखंड भ्रमंती हा माधवरावांचा आणखी एक स्वभावविशेषच होता. त्यांनी या भ्रमंतीवर आधारित विपुल लेखन केलं असून चरित्रलेखनही केलं आहे. याशिवाय, त्यांच्या लेखांचे-अग्रलेखांचे खंडही प्रकाशित झाले आहेत. 1 जून 2006 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी माधवरावांचे निधन झाले.


