दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 25 ऑगस्ट 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 03 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वितीया 12:34; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 27:49
योग : सिद्ध 12:05; करण : तैतिल 25:10
सूर्य : सिंह; चंद्र : सिंह 08:28; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 18:59
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस सामान्य असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु प्रत्येक अडचणीतून आयुष्यात काहीतरी नवीन शिकाल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यामुळे यशाची शिडी चढण्यास मदत होईल.
वृषभ – आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. त्यामुळे आव्हानांवर मात करू शकाल. सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. आयुष्यात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाहता राहील. यामुळे भविष्यात यशाचा मार्ग सोपा होईल.
मिथुन – जीवनाच्या सर्व पैलूंकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. वादविवादामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे धीर धरा, संभाषणाद्वारे समस्या सोडवा. विचारात स्पष्टता ठेवा. भावनिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेऊ नका. नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न करा.
कर्क – वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्व काही चांगले राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. जीवनात नवीन सकारात्मक बदल होतील. नात्यांमध्ये गोडवा वाढेल
सिंह – संयम राखण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक आव्हानावर मात कराल. आज नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीत यश मिळेल, त्यामुळे अपयशांना घाबरू नका. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा. ताणतणाव टाळा, ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
कन्या – नातेसंबंधांमध्ये आपलेपणा आणि प्रेमाचा अभाव असू शकतो. प्रेमजीवन सुधारण्यासाठी केलेले छोटे छोटे प्रयत्न देखील उपयुक्त ठरतील. त्यामुळे नात्यांमधला गोडवा वाढेल. अविवाहित जातकांसाठी नवीन सुरुवात करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मात्र, नातेसंबंधात घाई करू नका, एकमेकांना चांगले समजून घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’
तुळ – व्यावसायिक जीवनात स्पर्धेचे वातावरण असेल. विरोधकाच्या कोणत्याही कृतीमुळे कारकिर्दीत अडथळे येऊ शकतात. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आव्हानांवर मात करू शकाल. मात्र स्वभाव काहीसा चिडचिडा होईल. संयम ठेवा आणि शांत मनाने निर्णय घ्या.
वृश्चिक – स्वप्ने सत्यात उतरतील. दीर्घकाळापासून असलेल्या समस्या दूर होतील. मन आनंदी राहील. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील आणि नवीन बदल स्वीकारण्यास तयार राहा. नवीन छंद जोपासण्यासाठी हा चांगला काळ आहे.
धनु – आर्थिक स्थिती चांगली राहील. शहाणपणाने केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनाचे ऐका त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. आज आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकाल.
मकर – वादविवाद टाळा, यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. भावनिकतेने कोणताही निर्णय घेऊ नका. दैनंदिन दिनचर्येतून ब्रेक घ्या आणि जीवनात नवीन गोष्टींचा शोध घ्या. नवीन जीवनशैली स्वीकारा. आव्हानांना तोंड देणे काहीसे कठीण वाटू शकते, परंतु प्रयत्नातील सातत्य यशाकडे घेऊन जाईल.
कुंभ – आयुष्यात भरपूर सकारात्मकता निर्माण होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील.
मीन – आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरच्या वाढीसाठी नवीन संधी मिळतील, परंतु मानसिक आणि शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यायामाची एक नवीन दिनचर्या पाळा. दररोज योग आणि ध्यान करा. यामुळे निरोगी आणि उत्साही राहण्यास मदत होईल. आरोग्य सुधारेल.
हेही वाचा – Homeopathy : शरीर आणि मन जुळले, तरच आरोग्य फुलले…
दिनविशेष
नवकथेचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ
टीम अवांतर
आधुनिक मराठी साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 रोजी मुंबईत झाला. अर्थशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन एम्.ए. झाले. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. महाविद्यालयात शिकत असतानाच कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. मानसचित्रे (1946), कडू आणि गोड (1948), नव्या वाटा (1950), तलावातील चांदणे (1954), पाळणा (1961) हे त्यांचे काही उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळे जग, गाडगीळांच्या कथा आणि गुणाकार हे त्यांच्या निवडक कथांचे संग्रह आहेत. मराठी कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले आहे. मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा 1945पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. लिलीचे फूल (1955) ही त्यांची पहिली कादंबरी तर, लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील दुर्दम्य (खंड 1, 1970 आणि खंड 2, 1972) ही त्यांची कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरीलेखनाचा मराठीतील एक महत्त्वाचा प्रयोग मानला जातो. खरं सांगायचे म्हणजे (1954) आणि बंडू (1961) ही पुस्तकेही त्यांच्या उपहासप्रचुर, खुसखुशीत आणि हलक्याफुलक्या विनोदनिर्मितीचा प्रत्यय देतात. गोपुरांच्या प्रदेशात (1952) आणि सातासमुद्रांपलीकडे (1959) ही अनुक्रमे दक्षिण भारत आणि यूरोप येथील प्रवासवृत्ते लक्षणीय ठरलेली आहेत. खडक आणि पाणी (1960) आणि साहित्याचे मानदंड (1962) ही त्यांची पुस्तके साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात मान्यता पावली आहेत. लखूची रोजनिशी (1948), मार्क ट्वेनच्या टॉम सॉयर या कादंबरीवरून लिहिलेले धाडसी चंदू (1951), आम्ही आपले थोर पुरुष होणार (1957) यासारखी मुलांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकेही लोकप्रिय झाली आहेत. आर्थिक प्रश्न व अर्थरचना (1953), नियोजन आणि समृद्धी (1961) ही त्यांची काही अर्थशास्त्रविषयक पुस्तके होत. 1981मध्ये मध्य प्रदेशच्या रायपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1996 साली त्यांच्या ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मकथेला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. 15 सप्टेंबर 2008 रोजी त्यांचा मृत्यू झाला.