दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 सप्टेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 02 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया अहोरात्र; नक्षत्र : चित्रा 16:15
- योग : ऐंद्र 21:01; करण : तैतिल 17:56
- सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:33
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. कुटुंबाशी समन्वय सुधारेल आणि जुने मतभेद दूर होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, मात्र खर्चावर लक्ष ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. त्याचवेळी मानसिक शांततेसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
वृषभ – आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक जीवनात लोकप्रियता वाढेल. नवीन कल्पना स्वीकारण्याची वेळ आली आहे.
मिथुन – आजचा दिवस उर्जेने परिपूर्ण असेल, पण विचारपूर्वक वागा. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे आनंदी रहाल. आर्थिक बाबी संतुलित राहतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी येतील, ज्या तुमच्या क्षमतांची परीक्षा घेणाऱ्या ठरतील. सामाजिक जीवनात लोकप्रियता वाढेल. कामानिमित्त काही जातकांना प्रवास करावा लागेल.
कर्क – इतरांबद्दल मनात असलेल्या भावनांमुळेच तुम्ही त्यांच्याशी जोडले जाल. सहकाऱ्यांशी समन्वय आवश्यक आहे, ज्यामुळे कामे सोपी होतील. कुटुंबात मतभेद असू शकतात, परंतु संयमाने त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे आवश्यक आहे.
सिंह – तुम्ही जे काम पूर्ण कराल, त्यामुळे तुमचे मनोबल वाढवेल. पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. सामाजिक दर्जा वाढेल. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. मात्र योजना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
कन्या – कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल. सहकारी किंवा वरिष्ठांशी असणारे जुने वाद संपतील, नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक स्थिती संतुलित राहील, मात्र खर्चाकडे लक्ष द्या. कुटुंबाशी समन्वय वाढवा. जबाबदाऱ्या वाढतील, परंतु तुमच्या समजूतदारपणाच्या वृत्तीने सर्वकाही ठीक होईल. मानसिक शांतता राखणे आवश्यक आहे.
तुळ – सामाजिक आणि कौटुंबिक संबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक होईल. आर्थिक परिस्थिती स्थिर असेल. कामाच्या निमित्ताने प्रवास शक्य आहे. नवीन मित्र बनतील. कुटुंबाशी चांगला समन्वय राहील. फक्त आज विचार सकारात्मक ठेवा.
वृश्चिक – कठोर परिश्रम कराल. कामाच्या ठिकाणी काही बदल किंवा संधी चालून येतील ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबाशी असलेले संबंध मजबूत होतील. आर्थिक बाबी सुधारतील, मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. आजची संध्याकाळ मित्रांसोबत स्मरणीय ठरू शकते.
धनु – घाईघाईने आर्थिक निर्णय घेणे टाळा. विचारपूर्वक पावले उचला, यश तुमचेच असेल. नवीन ध्येये निश्चित करा आणि त्यांचे अनुसरण करा. आज एखाद्या पार्टीत सहभागी होण्याची संधी मिळेल. परस्पर सहकार्यामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. कुटुंबाशी सुसंवाद राखा.
मकर – दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करत राहा, त्यातून यश मिळेल, शिवाय आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही काम करत असलेल्या योजनांवर पुनर्विचार करा आणि त्या कृतीत आणा. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी राहील.
कुंभ – काहीतरी वेगळे काम करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यश मिळवाल. आज कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. विचारपूर्वक पावले उचला आणि मानसिक तणाव टाळा.
हेही वाचा – भाऊबंदकी… सरांच्या जीववर आलेली!
मीन – आज मित्रांसोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे. काही कौटुंबिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगल्याने गोष्टी व्यवस्थित होण्यास मदत होईल. कुटुंबात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. शांत राहा आणि सकारात्मक मानसिकता राखा.
दिनविशेष
अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा
टीम अवांतर
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष आणि भारतामध्ये अणुकेंद्रीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 रोजी म्हैसूर येथे झाला. मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. आणि लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या त्यांनी मिळविल्या. 1949 साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. 1953 साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून 1972 ते जून 1978 या काळात ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सदस्य होते. जुलै 1978 मध्ये ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. सप्टेंबर 1983 ते फेब्रुवारी 1987 या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. 1974 साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते. याशिवाय, अणुऊर्जेचे शांततामय उपयोग, या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले. 1961 साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. 1986 साली ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे अध्यक्ष, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे रामण्णा उपाध्यक्ष होते. भारत सरकारच्या पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांचे मानकरी होते. तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे मेघनाद साहा पदक, ओम प्रकाश भसीन पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या अशा बहुमानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. रामण्णा यांना संगीताची देखील आवड होती. ते उत्तम पियानोवादक होते. रॉयल स्कूल ऑफ म्युझिकचे प्रमाणपत्र देखील त्यांना मिळालेले होते. 24 सप्टेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले.


