दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 24 ऑगस्ट 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 02 भाद्रपद शके 1947; तिथि : प्रतिपदा 11:48; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 26:05
योग : शिव 12:28; करण : बालव 24:06
सूर्य : सिंह; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
दिनविशेष
निसर्गदत्त प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी
टीम अवांतर
निरक्षर असूनही ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे हे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी ज्यांच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता, त्या बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगाव जिल्ह्यातील असोदे गावी झाला. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाईंचा जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. बहिणाबाईंचा संपूर्ण दिवस हा घरकाम आणि शेती कामात जायचा. ही कामं करत असताना त्यांचं नातं घरसंसार, निसर्ग, ऊन, वारा, पाऊस, पशू-पक्षी अशा अनेक गोष्टींशी जोडलं गेलं. त्यामुळे कामं करता करता त्यांना कविता, ओव्या, गाणी सुचू लागली. बहिणाबाईंचा मुलगा प्रसिद्ध कवी सोपान चौधरी आणि त्यांच्या मावसभावाने बहिणाबाईंच्या कविता तिथल्या तिथे जमतील तशा टिपून ठेवल्या, जपण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही अनेक कविता या काळाच्या ओघात नामशेष झाल्या. खान्देशी भाषेतील या अस्सल ग्रामीण बाजातील कविता संसाराबद्दल, निसर्गाबद्दल अनेक गोष्टी सांगून जाणाऱ्या आहेत. सूक्ष्म निरीक्षण शक्तीमुळे ‘अरे संसार, संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर’ असं म्हणाणाऱ्या बहिणाबाई ‘मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर…’ असं तत्वज्ञानही सांगताना दिसतात. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इत्यादी कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती असे असल्याचे दिसून येते. अशा या महान कवयित्रीचे 3 डिसेंबर 1951 रोजी निधन झाले.
हेही वाचा – शोध अज्ञात रहस्याचा…