दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 23 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 01 कार्तिक शके 1947; तिथि : द्वितीया 22:46; नक्षत्र : विशाखा 28:50
- योग : आयुष्मान 28:59; करण : बालव 09:30
- सूर्य : तुळ; चंद्र : तुळ 22:05; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:11
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
भाऊबीज
यमद्वितीया
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांसाठी आज सन्मान केला जाईल. ज्यामुळे कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल. निर्णय क्षमता सुधारल्याचा फायदा होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. काही कारणाने आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.
वृषभ – आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन कामासाठी घरातून बाहेर पडले तर यशच मिळेल. नोकरदार जातकांच्या ऐहिक सुखात वाढ होऊन दिवस आरामात जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक लाभ होतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
मिथुन – दिवस फारसा अनुकूल नसल्याने झटपट निर्णय घेऊ नका. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. कार्यालयातील एखाद्या प्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागू शकते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होईल आणि तुमच्या अधिकारात वाढही होईल.
कर्क – आजचा दिवस लाभदायक असून तुमची प्रगती होईल. संवादाने इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. काही कारणाने आरोग्याच्या तक्रारी असतील तर, त्याचा कामावरही परिणाम होईल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. आज निर्णय क्षमतेचा कस लागेल. रात्री मसालेदार पदार्थ खाऊ नका. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.
सिंह – आर्थिक लाभाचा दिवस आहे. तुमच्या योजना यशस्वी झाल्याचा तुम्हाला आनंद होईल. व्यावसायिक असाल तर व्यवसायात काही नवीन बदल होतील, त्यामुळे नफा वाढेल. नोकरदार जातकांचे अधिकार वाढतील. आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. आज अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील.
हेही वाचा – बनिया आणि मराठी गिऱ्हाईक
कन्या – कन्या राशीच्या जातकांसाठी आज खास दिवस आहे. उत्तरदायित्वासोबत अधिकारात वाढ होईल. स्वतःसाठी काही खर्च कराल. परंतु अनावश्यक खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. सांभाळून खर्च करा. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तुळ – तुळ राशीच्या जातकांना कोणतेही काम विचारपूर्वक करावे लागेल. अर्थात, तरीही थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे. राजकीय दंडही भरावा लागू शकतो, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. जोखमीच्या कामापासून दूर रहा आणि वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष द्या. कोणाशीही बोलताना सावध राहा.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांना भाग्याची साथ मिळेल. काहीतरी मौल्यवान वस्तू मिळाल्याने आनंद होईल, मनात सकारात्मक ऊर्जा अनुभवाल. नोकरी करत असाल तर, तुमचे पद आणि अधिकार वाढतील. कामाचे कौतुक होईल आणि सन्मान मिळेल.
धनु – दिवस आनंददायी असेल. मन प्रसन्न आणि सकारात्मक विचारांनी भारलेले असेल. हुशारीने घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तथापि, अविश्वासू लोक आणि नोकरांपासून सावध राहा, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. अचानक, काही कारणास्तव संततीला तब्येतीचा त्रास होऊ शकतो.
मकर – दिवस संमिश्र असेल, तुम्ही अधिक उत्साही असाल. परंतु असे काही खर्च उद्भवतील, जे इच्छा नसतानाही नाईलाजाने करावे लागतील. पण दुसरीकडे, काही कारणाने तुमची प्रगती थांबली असेल तर, ते अडथळे आता दूर होतील. तुमच्या हातात अनपेक्षितपणे मोठी रक्कम येईल. कार किंवा दुचाकी चालवताना काळजी घ्या.
कुंभ – कोणतेही काम विचारपूर्वक करा. आज विशेष संयमाने काम करावे लागेल, कारण घाईगडबडीने केलेले कोणतेही काम नुकसानासाठी कारणीभूत ठरू शकते. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. एखाद्या कामात पैसे गुंतवावे लागतील, मात्र त्यातून तुम्हाला फायदा होईल. मुलाची नोकरी, लग्न इत्यादी शुभकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
हेही वाचा – कुंडलीयोग अन् विधिलिखित!
मीन – दिवस फारसा शुभ नाही. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही चिंतेत असाल. कोणत्याही संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, चुकूनही तसे करू नका. नवीन योजना बनवून तिची अंमलबजावणी केल्यास तुमचाच फायदा होईल. धैर्य आणि शौर्य ठेवून काम केल्यास आत्मविश्वास वाढेल.
दिनविशेष
फुटबॉल खेळाडू एड्सन अरांतेस दो नासिमेंतो अर्थात पेले
टीम अवांतर
महान फुटबॉलपटू एड्सन अरांतेस दो नासिमेंतो अर्थात पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस, ट्रेस कोरासी येथे झाला. घरखर्च चालवण्यासाठी पेले चहाच्या दुकानात काम करत होते. त्यांना लहानपणापासून फुटबॉल खेळण्याची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांनी फुटबॉल खेळायला शिकवलं होतं. मात्र वडील फुटबॉलचा खर्च उचलू शकत नव्हते. यामुळे पेले सॉक्समध्ये पेपर भरून त्याचा फुटबॉल बनवायचे आणि खेळायचे. सुरुवातीच्या काळात म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षी सांतोस क्लब आणि नंतर 16 व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातून त्यांनी या खेळात पदार्पण केले. त्याआधी ते अनेक इमॅच्युअर टीममधून खेळले. त्यांनी 2 यूथ स्टेट चॅम्पिअनशिपमध्ये बौरू ॲथलेटिक क्लब ज्युनिअर्सचे कर्णधारपद भूषवले होते. पेले नावाच्या इतिहासाला इथूनच सुरुवात झाली. 1958, 1962 आणि 1970 मध्ये तीनदा फिफा वर्ल्डकप जिंकणारे ते जगातील एकमेव फुटबॉलपटू ठरले. 1958 साली पेले यांनी पहिला वर्ल्डकप जिंकला, तेव्हा ते फक्त 17 वर्ष 239 दिवसांचे होते. या वर्ल्डकपमध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात क्वॉर्टर फायनलमध्ये पेले यांनी स्पर्धेतील पहिला गोल केला होता आणि वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी वयात गोल करणारे ते खेळाडू ठरले होते. याशिवाय, फ्रान्सविरुद्ध त्यांनी हॅट्रिक केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकूण 1 हजार 279 गोल केले. असा विक्रम करणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते. पेले यांनी 1959 या एका वर्षात 127 तर 1961 साली 110 गोल केले होते. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव फुटबॉलपटू आहेत. पेले यांनी फुटबॉलमधून 1977 साली निवृत्ती घेतली. 1999मध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने त्यांची शतकातील सर्वात महान खेळाडू म्हणून निवड केली होती. पेले यांचे 29 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले.


