Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 23 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 23 मे 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 2 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 23 मे 2025

वार : शुक्रवार

तिथि : एकादशी 22:30

नक्षत्र : उत्तराभाद्रपदा 16:02

योग : प्रीति 18:36

करण : बव 11:54

सूर्य : वृषभ

चंद्र : मीन

सूर्योदय : 06:01

सूर्यास्त : 19:08

पक्ष : कृष्ण पक्ष

मास : वैशाख

ऋतू : वसंत

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

अपरा : एकादशी


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

केशवराव भोळे जयंती

मराठी रंगभूमीवर आपल्या संगीताची मोहिनी घालणाऱ्या केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896 रोजी अमरावती येथे झाला. केशवरावांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. 1933 मध्ये गोविंदराव टेंबे यांच्यानंतर केशवरावांनी ‘प्रभात’ या सिनेमा कंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून प्रवेश केला.  अमृतमंथन, कुंकू, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा अशा प्रसिद्ध चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे केशवराव भोळे यांना अफाट लौकिक लाभला. उच्च शिक्षणाचे आणि अभिजात वाड्मयचे संस्कार लाभलेल्या आणि कर्तृत्वावर अविचल निष्ठा असणाऱ्या या संगीत दिग्दर्शकाने आकाशवाणीतही आपले कर्तृत्व गाजवले. नोव्हेंबर 1967 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

आनंद मोडक स्मृतीदिन

मराठी चित्रपट तसेच मराठी नाटकांचे संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म 13 मे 1951 रोजी झाला. अकोल्यात शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि त्यावेळच्या पुण्यातील समृद्ध कलाविश्वाचा ते एक हिस्सा बनले. वास्तविक 1972च्या सुमारास आपल्या कलाजीवनाची सुरुवात करणाऱ्या आनंद मोडक यांनी ‘महानिर्वाण’ (1974) या नाटकाला पहिल्यांदाच संगीत दिले. 1976मध्ये त्यांनी आकाशवाणीसाठी ‘बदकाचं गुपित’ ही संगीतिका केली. ती इतकी गाजली, की त्याचे स्वतंत्र 75 प्रयोग राज्यभरात झाले. तर, ‘महापूर’, ‘खेळिया’, ‘मृगया’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘चाफा बोलेना’, ‘वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा’, ‘उत्तररात्र’, ‘प्रेमाची गोष्ट..’ या सार्‍या नाट्यकृती त्यांच्या संगीतामुळे आणखी आशयघन झाल्या. वीस वर्षांच्या अवधीत त्यांनी ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘दिशा’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘तू तिथे मी’, ‘राजू’, ‘उरूस’, ‘फकिरा’, ‘बाईमाणूस’ अशा तब्बल 53 मराठी तसेच हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. अशा या श्रेष्ठ संगीतकाराचे 23 मे 2014 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!