दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 मार्च 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 02 चैत्र शके 1948; तिथि : पंचमी 18:38; नक्षत्र : कृत्तिका 20:49;
- योग : विष्कंभ 12:21; करण : बव 07:57, कौलव 29:21;
- सूर्य : मीन; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:42; सूर्यास्त : 18:49;
- पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
श्री लक्ष्मी पंचमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिन विशेष
आधुनिक कन्नड कवी गोविंद पै
टीम अवांतर
आधुनिक कन्नड कवी आणि एक श्रेष्ठ संशोधक गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर गावी झाला. शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. 20पेक्षा अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक आणि हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा काळ 60 वर्षांहून अधिक होता.
सन 1900 मध्ये गोविंद पै यांची पहिली कविता ‘सुहासिनी’ प्रकाशित झाली. परंपरागत द्वितीय प्रासाचा (चरणातील दुसरे अक्षर तेच येणे) उपयोग न करता रचना करणारे गोविंद पै हे पहिले कवी होत. भावगीतांव्यतिरिक्त येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील गोल्गोथा आणि गौतम बुद्धाच्या जीवनावरील वैशाखि ही दोन खंडकाव्येही त्यांनी लिहिली. त्यांची निवडक भावगीते गिळिविंडु या संग्रहात आहेत. हेब्बेरळू आणि चित्रमानु ही त्यांची दोन नाटके आहेत. यांपैकी पहिले नाटक एकलव्याच्या कथेवर आधारित आहे, तर दुसरे 1942च्या छोडो भारत आंदोलनातील एका हुतात्याच्या जीवनावर आधारलेले आहे. काही जपानी ‘नो’ नाट्यांचाही त्यांनी कन्नड अनुवाद केलेला आहे.
हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?
गोविंद पै यांच्या संशोधनपर लेखांची संख्या 160हून अधिक आहे. त्यांत कर्नाटक आणि तुळुनाडू यांचे इतिहास, प्राचीन भारत-ग्रीस संबंध, इतिहासकालीन राजांची, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या धर्मप्रवर्तकांची आणि प्राचीन कन्नड लेखक-कवींची कालनिश्चिती इत्यादी विषयांचा समावेश होतो. धारवाड येथील ‘कन्नड संशोधन संस्थे’त दिलेली त्यांची खास व्याख्याने मुरु उपन्यासगळु या नावाने संग्रहित करण्यात आलेली आहेत.
मद्रास राज्य शासनातर्फे त्यांना 1948मध्ये ‘राष्ट्रकवी’ हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला. 1950मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 6 सप्टेंबर 1963 रोजी मंगलोर येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. नोकरीच्या ठिकाणी सहजरीत्या कामे हातावेगळी कराल. व्यवसायाच्या निमित्ताने काही नव्या ओळखी होतील. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. एखाद्या काही वर्षांपूर्वी दिलेली उधारी परत करेल. वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल.
वृषभ – पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण असेल. व्यवसायात कोणताही खंड पडणार नाही.
मिथुन – दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांसाठी स्थळ सुचविले जाईल, पण त्या स्थळाची पूर्ण माहिती घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पूरक असे वातवारण असेल. व्यवसायात क्लायंट टिकविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर, काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे, पण कागदपत्रे बारकाईने वाचून घ्या. बऱ्यापैकी पैसा हाती आला असला तरी, खर्चाही तेवढाच असेल. त्यामुळे खर्चाचे नियोजन करावे लागेल.
सिंह : गुंतवणूक आणि भविष्यातील योजनांबद्दल गुप्तता बाळगा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असला तरी, वेळेच्या आधीच ते पूर्ण करू शकाल. त्यामुळे वरिष्ठ खूश होतील. बोलताना तोंडावर ताबा ठेवा, अन्यथा, गंभीर स्थिती उद्भवू शकते. विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात लक्ष एकाग्र करण्यात समस्या येऊ शकतात
कन्या – आज दिवसभरात कोणत्या गोष्टी करायच्या, हे ठरविले असले तरी, प्रत्यक्षात सुरुवात कशापासून करायची, याबाबत संभ्रम असेल. तेव्हा जोडीदार यातून मार्ग काढून देईल. आर्थिक गुंतवणुकीबाबत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तब्येतीची काळजी घ्या. पथ्यपाणी पाळा.
तुळ – एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी सामना करू शकाल. इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. कोर्टातील एखादे प्रलंबित प्रकरण पुढे सरकेल आणि तुमच्यादृष्टीने ते अनुकूल असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांकडून मदत मिळेल. पैसा जपून वापरा, अनावश्यक खर्च टाळा.
वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी घाई गडबड करू नका, संयमाने घ्या. त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. व्यावसायिकांना नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. खासगी आणि गोपनीय माहिती उघड होणार नाही, याची काळजी घ्या.
हेही वाचा – रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…
धनु – कुटुंबीयांना नेमके काय हवे आहे, हे जाणून घ्या आणि त्यानुसार दिवसाचे नियोजन करा. पैसा खर्च करताना सावध रहा, उधळपट्टी करू नका. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा विश्रांती मिळेल.
मकर – आपले मत मांडण्यास मागेपुढे पाहू नका, तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. डसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कुंभ – घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंब किंवा आप्तांध्ये फूट पाडणारे विचार नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील, हे ध्यानी घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. व्यवसायात नवे सौदे होतील आणि याबाबत भागीदारांना विश्वासात घ्या.
मीन – व्यापारातील नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. सहकाऱ्यांशी अतिशय हुशारीने व्यवहार करा. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्यपद्धीत बदल केल्यास पायदा होऊ शकेल. नोकरी-व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.


