दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 01 भाद्रपद शके 1947; तिथि : अमावास्या 11:35; नक्षत्र : मघा 24:54
योग : परिघ 13:18; करण : किंस्तुघ्न 23:37
सूर्य : सिंह; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
अश्वथमारुती पूजन
अमावस्या (समाप्ती सकाळी 11:35)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – भौतिक सुख आणि संपत्तीत वाढ होईल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. मात्र तरीही घरगुती कलह होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने लांबचे प्रवास टाळा. व्यवसाय वृद्धीचे योग आहेत. सूर्याला जल अर्पण करणे शुभ राहील.
वृषभ – व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. कुटुंबाची भक्कम साथ मिळेल. मित्र, नातेवाईक हे देखील खांद्याला खांदा लावून चालतील. आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय या सगळ्याच आघाड्यांवर मोठी प्रगती होईल. जवळ हिरव्या रंगाची एखादी वस्तू ठेवणे शुभ राहील.
मिथुन – पैशाची आवक वाढेल. आरोग्य पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल. प्रेमाच्या आघाडीवर मोठे यश मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम आहे. काली मातेची प्रार्थना करत राहा.
कर्क – समाजात आकर्षणाचे केंद्र बनाल. दिवसभर उत्साही असाल. आरोग्य पूर्वीपेक्षा खूपच चांगले असेल. व्यवसायात देखील खूप चांगली प्रगती साधता येईल. जवळ लाल वस्तू ठेवणे आणि हनुमानाची प्रार्थना करणे शुभदायक असेल.
सिंह – वाढता खर्च त्रासदायक ठरू शकेल. डोकेदुखी, डोळे दुखणे, कसली तरी अज्ञात भीती वाटणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल. संततीच्या समाधानकारक प्रगतीमुळे आनंद वाटेल. व्यवसायही चांगला राहील. गणपतीची पूजा करणे फलदायी ठरेल.
कन्या – प्रवासाचा योग आहे. व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. प्रेमाच्या आघाडीवर उत्तम प्रगती होईल. संततीकडून तुम्हाला एखाद्या कामात मोठा पाठिंबा मिळेल. शुभ काळ सुरू होणार आहे. शनिदेवाची प्रार्थना करत राहा.
हेही वाचा – रंग हरवलेलं पेंटिंग
तुळ – राजकीय क्षेत्रातील जातकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रकरणाची न्यायालयीन कारवाई सुरू असेल तर, त्यात विजय होईल. एखाद्या मोठ्या कामासाठी वडिलधाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात बऱ्याच संधी उपलब्ध होतील. शनिदेवाची प्रार्थना करत राहा.
वृश्चिक – भाग्याची मोठी साथ मिळेल. लहान प्रवास घडण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवन सामान्य असेल. व्यवसायाची भरभराट होईल. भगवान विष्णूची प्रार्थना करत राहा.
धनु – दुखापत होण्याची शक्यता आहे. याशिवाय, एखाद्या अडचणीत सापडू शकता. परिस्थिती प्रतिकूल आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक स्तरावर मानसिक समाधान मिळेल. व्यवसायही चांगला सुरू राहील. मारुतीची उपासना करत राहा.
मकर – आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असेल. विवाहोत्सुकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि संतती या दोन्ही ठिकाणी मनाला आनंद देणाऱ्या घटना घडतील. काली मातेची प्रार्थना लाभदायक ठरेल.
कुंभ – शत्रूही मित्रांप्रमाणे वागतील. वडीलधाऱ्यांकडून महत्त्वाच्या गोष्टींवर उत्तम ज्ञान मिळेल, त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतील. आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. व्यवसायही चांगला सुरू राहील. गणपतीची प्रार्थना करा. शुभ फल प्राप्त होईल.
मीन – विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ असेल. लेखक आणि कवी यांना नवनवीन कल्पना सुचतील, त्या कल्पनांवर काम करता येईल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन सामान्य असेल. व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. भगवान शंकराला जल अर्पण करावे.
हेही वाचा – रंग हरवलेले चित्र : बालपणीचा मित्र भेटला पण…
दिनविशेष
अभिनेत्री हंसा वाडकर
टीम अवांतर
मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका अशी ओळख असणाऱ्या हंसा वाडकर यांचा जन्म 24 जानेवारी 1923 साली मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. त्यांच्या तालमीत हंसाबाईंचे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकर यांचं हंसा वाडकर असं नामकरण झालं. हंसाबाई अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नावारुपाला आल्या त्या प्रभातच्या संत सखू चित्रपटामुळे. यातील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. याच्या अगदी विपरीत भूमिका त्यांना व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या लोकशाहीर राम जोशी या चित्रपटामध्ये मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरिणीची व्यक्तिरेखा वठवली. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी याच्यामुळे त्या मराठी चित्रपटसृष्टीत अप्सरा मानल्या जायच्या. मात्र काही अप्सरांना जसा शाप असतो तसेच काहीसे हंसाबाईंच्या आयुष्यात घडले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी लग्न झालेल्या हंसाबाई पतीबरोबरील मतभेदांमुळे एका क्षणी घर सोडून बाहेर पडल्या आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर देखील झाला. आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. परिणामी, एकेकाळी व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम केलेल्या हंसाबाईंच्या कारकीर्दला ग्रहण लागले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं त्यांना गाठलं. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्राद्वारे त्यांनी जगासमोर आणली आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर खळबळ उडवून दिली होती. ‘अभिनेत्री की आपबीती’ या शीर्षकानं ते हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला ‘भूमिका’ चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला. 23 ऑगस्ट 1971 रोजी त्यांचे निधन झाले.