दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 22 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 30 आश्विन शके 1947; तिथि : प्रतिपदा 20:16; नक्षत्र : स्वाती 25:50
- योग : प्रीती 28:04; करण : किंस्तुघ्न 07:04
- सूर्य : तुळ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:12
- पक्ष : शुक्ल; मास : कार्तिक; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
बलिप्रतिपदा
दीपावली पाडवा
विक्रम संवत 2082 प्रारंभ
गोवर्धन पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
वृषभ – आजचा दिवस आव्हानांना तोंड देण्याचा असेल. शत्रू तुमच्यावर मात करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र प्रतिभेचा वापर करून कठीण कामे देखील सहजतेने हाताळू शकाल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु दुसरीकडे खर्च देखील वाढतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. मित्रांसोबत आनंदात संध्याकाळ घालवाल.
मिथुन – दिवस शुभ आणि फलदायी असेल, भविष्याबद्दलच्या चिंता दूर करण्याचा असेल. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एखाद्या शुभ समारंभात देखील सहभागी होऊ शकता.
कर्क – दिवसभर उत्साही आणि आनंदी रहाल, ज्यामुळे काम करण्याची इच्छा निर्माण होईल. आर्थिक स्तरावरील हालचाली वाढू शकतात, ज्यामुळे नवीन करार होतील. नोकरदार जातकांची बदली होण्याची शक्यता आहे; सोबत पदोन्नती आणि पगार वाढू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबत काही दिवसांसाठी बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते.
सिंह – आजचा दिवस प्रगतीचा आणि बँक बॅलन्समध्ये वाढ करण्याचा असेल. ज्यांचे पैसे कुठेतरी अडकले आहेत, ते आज परत मिळू शकतील. काही अतिरिक्त काम मिळू शकते, ज्यामुळे खूप आनंद होईल. मात्र कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. अविवाहित लोकांना आज लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात, विवाह निश्चित होऊ शकतात.
हेही वाचा – दोन बायकांचा दादला… रंगा कारभारी
कन्या – आजचा दिवस चिंतांनी भरलेला असू शकतो. कामासाठी खूप धावपळ होईल. आरोग्य काहीसे बिघडू शकते. त्यामुळे काम करताना सावधगिरी बाळगा. नोकरदार जातकांना आज नव्या संधी मिळू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
तुळ – आजचा दिवस संमिश्र असेल. नशिबाची मोठी साथ मिळेल, ज्यामुळे प्रलंबित काम लवकर पूर्ण होईल. गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. लांबचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. कोणत्याही प्रसंगात अकडणार नाही, याची काळजी घ्या, अन्यथा वाद होऊ शकतात.
वृश्चिक – विचार न करता कोणतेही पाऊल उचलणे टाळावे. निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायात आव्हाने येऊ शकतात, म्हणून कोणताही करार करण्याआधी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते.
धनु – दिवस चांगला जाईल. कायदेशीर बाबींचा सामना करणाऱ्यांच्या अडचणींचे निराकरण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठी चिंता दूर होईल. शिवाय, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला असेल. मात्र, त्यासाठी आळस दूर करावा लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आणखी नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
मकर – कामाच्या ठिकाणी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावे लागतील. दुसरीकडे, नवीन संधीही उपलब्ध होतील. व्यावसायिकांना एखादा चांगला करार मिळू शकेल. कोणतेही आर्थिक निर्णय काळजीपूर्वक विचार करावा.
कुंभ – सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामात लक्षणीय यश मिळेल. ज्यांना कामासाठी प्रवास करायचा आहे, त्यांना चांगल्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांना चांगला करार मिळू शकतो.
हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता
मीन – दिवस संघर्षाचा असेल. कामाच्या ठिकाणी विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल, मात्र आत्मविश्वासाने आणि समजूतदारपणामुळे प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे उत्पन्न वाढेल, परंतु तुमचे खर्चही वाढतील. आज तुम्ही काही प्रभावशाली लोकांना भेटू शकता.
दिनविशेष
जहाल क्रांतिकारी अशफाक उल्ला खान
टीम अवांतर
भारतीय स्वतंत्र लढ्यातील जहाल क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1900 रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. अशफाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतल्याने नाराज झालेल्या तसेच ब्रिटिशांकडे मागून स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी लढावे लागेल, असे मानणाऱ्या तरुणांपैकी अशफाक हे एक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. सशस्त्र क्रांतीपूर्वी दोघेही मुशायर्यांना एकत्र जात असत. राम प्रसाद बिस्मिल यांनी अशफाक यांना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये (HRA) सामील केले होते. सशस्त्र क्रांतीसाठी शस्त्रे आणि शस्त्रांसाठी पैसा हवा होता. त्यामुळे क्रांतिकारकांनी काकोरी रेल्वे दरोड्याची योजना आखली. 8 ऑगस्ट 1925 रोजी शाहजहांपूर येथे क्रांतिकारकांची बैठक झाली. यामध्ये राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशन सिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाक यांच्यासह अनेक क्रांतिकारकांवर रेल्वे लुटण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दुसर्याच दिवशी शाहजहानपूरहून लखनऊला निघालेली ट्रेन काकोरीजवळ लुटण्यात आली. क्रांतिकारकांनी लुटलेल्या सरकारी तिजोरीत 4601 रुपये होते. रामप्रसाद बिस्मिल यांना पोलिसांनी 26 ऑक्टोबर 1925 रोजी अटक केली. तर, अशफाक उल्ला नेपाळला गेले आणि तेथून बनारस कानपूरमार्गे दिल्लीला एका जुन्या पठाण मित्राकडे पोहोचले. मित्रानेच त्यांची फसवणूक केली आणि त्यांची माहिती पोलिसांना दिली. 17 जुलै 1926 रोजी पोलिसांनी अशफाक यांना पकडले आणि 19 डिसेंबर 1927 रोजी फैजाबाद तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.


