Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 22 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 22 मे 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 22 मे 2025

भारतीय सौर : 1 ज्येष्ठ शके 1947

तिथि : दशमी 25:12

वार : गुरुवार

नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा 17:46

योग : विश्कंभ 21:48

करण : वणिज 14:21

सूर्य : वृषभ

चंद्र : कुंभ 12:07

सूर्योदय : 06:01

सूर्यास्त : 19:08

पक्ष : कृष्ण पक्ष

मास : वैशाख

ऋतू : वसंत

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127


जैव वैविध्य दिवस

जागतिक जैविक विविधता दिन (International Day for Biological Diversity) म्हणून 22 मे ओळखला जातो. जैवविविधतेबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी या दिनाची घोषणा केली आहे. त्यामुळ 2001पासून हा दिवस साजरा केला जातो. जगातील विविध वनस्पती तसेच प्राण्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व या जागतिक जैविक विविधता दिनामुळे अधोरेखित होते. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमअंतर्गत (UNEP) 1988मध्ये जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या आवश्यकतेविषयी एक कार्यगट नेमला. 1992मध्ये नैरोबी परिषदेमध्ये जैवविविधता कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला. 5 जून 1992 रोजी रियो दि जानेरो या शहरात यूएन आयोजित पर्यावरण आणि विकास या वसुंधरा परिषदेत हा करार हस्ताक्षरासाठी आला. जून 1993पर्यंत 168 देशांनी यावर सह्या केल्या. तर, 29 डिसेंबर 1993 रोजी हा करार अंमलात आला.

संत मुक्ताबाई पुण्यतिथी

संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इ.स. 1279 साली झाला. ‘मुक्ताई’ या नावाने त्या ओळखल्या जातात. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन ही भावंडे जन्माला आली. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना ‘पासष्टी’चा अर्थ उलगडून दाखविला तसेच, मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरुपाची प्राप्ती झाली. निवृत्तीनाथ आणि नामदेव तसेच इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान ‘ज्ञानबोध’ ग्रंथाची निर्मिती झाली. आणि नंतर वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या. मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे.


वेद कन्सल्टन्सी \ 9987433660

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!