दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 नोव्हेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 30 कार्तिक शके 1947; तिथि : प्रतिपदा 14:46; नक्षत्र : अनुराधा 13:55
- योग : अतिगंड 10:42; करण : बालव 28:00
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:47; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
मार्गशीर्ष मासारंभ
देव दीपावली
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाचा ताण वाढेल. थोडी हुशारी दाखविली तर, हा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी झालेल्या वादविवादामुळे त्यांची नाराजी वाढू शकते. वरिष्ठांकडून स्पर्धक निर्माण केले जाऊ शकतात. अशा स्थितीत नकारात्मक विचारांना मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
वृषभ – आजचा दिवस एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देणारा असेल. नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही. मात्र कठोर परिश्रम तुम्हाला नवीन काम लवकर पूर्ण करण्यास मदत करतील. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.
मिथुन – आजचा दिवस चांगला जाईल. कठोर परिश्रमांमुळे यश मिळेल. आज तुम्ही उत्साह आणि सकारात्मक उर्जेने भारलेले असाल. विकास प्रकल्प यशस्वी होतील. कार्यालयातील अधिकारी सहकार्य करतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात वाढ अनुभवायला मिळेल. एखादी मोठी व्यक्ती काहीतरी मौल्यवान सल्ला देईल.
कर्क – एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ही बातमी एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण करणारी असेल. कामात यश आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च देखील वाढू शकतात. एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा.
सिंह – आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मात्र आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी तात्विक विचार ऐकल्याने मन शांत आणि निश्चिंत होईल.
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
कन्या – दिवस चांगला जाईल. कामात यश मिळाल्याने मनोबल वाढेल. आर्थिक यश आणि प्रतिष्ठा मिळेल. जमीन, घर, वाहने इत्यादींमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहणे लाभदायक ठरणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ – दिवस शुभ आणि फलदायी असेल. राजकीय क्षेत्रात प्रगती शक्य आहे, एखाद्या मोठ्या संघटनेत सामील होण्याची शक्यता आहे. जीवनातील ध्येये आणि लाभ पूर्ण करण्याच्या संधी तुमची वाट बघत आहेत. मानसिकदृष्ट्या शांत वाटेल. भविष्यातील योजनांबाबत जोडीदाराशी चर्चा करू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
वृश्चिक – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्याच प्रयत्नांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय योजना यशस्वी होतील. नवीन काम सुरू करणे पुढे ढकला. तुम्ही सहलीला जाऊ शकता. यात कुटुंबातील सदस्य आणि मित्र सहभागी होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळता येतील. आरोग्याची काळजी घ्या.
धनु – मालमत्तेशी संबंधित कार्यवाही पूर्ण होईल. कामाबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. हा निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा. वरिष्ठ तुम्हाला पाठिंबा देतील. प्रियजनांसोबतच्या भेटी आनंददायी असतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते, आज एक नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.
मकर – आर्थिक स्तरावर थोडी निराशा येऊ शकते. मात्र स्वतःच्या तत्वांना चिकटून राहा, कामाच्या ठिकाणी स्वतःच्या अटींवर काम करा. समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा. गाडी चालवताना काळजी घ्या.
कुंभ – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबतच्या भेटी आनंद देतील. सामाजिक कार्य आणि व्यवसायात फायदा होईल. कुटुंबात आनंद असेल, मात्र कुटुंबातील एखादा सदस्य तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू शकतो. घरी पाहुणे देखील येऊ शकतात. अशी एखादी वस्तू खरेदी कराल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा – धुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!
मीन – दिवस चांगला जाईल. महत्त्वाची कामे पूर्ण केल्याने फायदेशीर संधी मिळतील. अडकलेला निधी परत मिळू शकेल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आणि घरातील ज्येष्ठ सहकार्य करतील. सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होताना दिसतील. तथापि, प्रवास टाळा, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
दिनविशेष
हलक्याफुलक्या विनोदाचे गारुड घालणारे शं.ना.नवरे
टीम अवांतर
खुसखुशीत शैली, कथा, कादंबरीमधील विविधरंगी पण ठसठशीत व्यक्तिरेखा हे वैशिष्ट्य असणाऱ्या शंकर नारायण नवरे म्हणजेच शन्ना यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1927 रोजी डोंबिवली येथे झाला. अस्सल डोंबिवलीकर असलेल्या शन्नांनी ठाणे, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा माणसांच्या दैनंदिन समस्या जवळून पाहिल्या, अनुभवल्या होत्या. त्याचेच यथार्थ चित्रण त्यांच्या लेखनातून झाल्याचे बघायला मिळते. त्यांनी केवळ विनोदनिर्मिती केली नाही, तर मानवी जीवनातील साधेपणा, नातेसंबंधांचा गोडवा आणि दैनंदिन जीवनातील विरोधाभास अत्यंत सहजतेने मांडला. शन्नांच्या लेखनात जीवनाकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी कायम बघायला मिळायची. त्यांच्या मते प्रत्येक परिस्थितीत हास्य शोधता येऊ शकतं! फक्त त्यासाठी थोडं हलकं व्हावं, छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घ्यावा… ही त्यांची शैली वाचकांना कायम आपलीशी वाटली. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय तसेच नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात. 1951 नंतर नवकथेच्या बहराच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्षं, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. याखेरीज एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, गुंतता हृदय हे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो ही त्यांची नाटकेही प्रसिद्ध आहेत. घरकुल, बाजीरावचा बेटा, बिरबल माय ब्रदर (इंग्रजी), कैवारी, हेच माझं माहेर, असंभव (हिंदी), कळत नकळत, जन्मदाता, निवडुंग, सवत माझी लाडकी, तू तिथं मी, झंझावात यासारख्या चित्रपटांच्या कथा त्यांच्या होत्या. तू तिथं मी या चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिका देखील साकार केली होती. पु. भा. भावे पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, डोंबिवली भूषण पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले. 2004 मध्ये कऱ्हाड येथे झालेल्या 84व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अशा या प्रतिभावान लेखकाचे 25 सप्टेंबर 2013 रोजी निधन झाले.


