दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 सप्टेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 29 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 24.16; नक्षत्र : मघा 08:05
- योग : साध्य 20:05; करण : विष्टी 11:53
- सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
चतुर्दशी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. व्यापार उद्योगात नव्या योजना तयार करताना त्या व्यावहारिक राहतील, याकडे लक्ष द्या. सामाजिक जीवनात आदर मिळेल. कुटुंबात सुसंवाद असणे आवश्यक आहे, ज्यामुळे ताण कमी होईल.
वृषभ – प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यातील क्षमतांचे कौतुक केले जाईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. नवीन संधी निर्माण होतील, मात्र त्यासाठी सावधगिरीने निर्णय घेणे आवश्यक आहे. आहार नियंत्रित ठेवून तब्येतीकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.
मिथुन – कौटुंबिक सहकार्य वाढेल, परंतु मतभेद देखील निर्माण होतील. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. संततीच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील.
कर्क – भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात; ते विचारपूर्वक सोडवा. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्च वाढू शकतो, मात्र जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील.
सिंह – आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. नवीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी घेत असलेले कठोर परिश्रम फळ देतील. काही बाबतीत आत्मविश्वास उंचावलेला राहील. कामात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
कन्या – तुम्ही जे काम कराल त्यात दक्षता वाढवा. जुने प्रश्न सुटतील, आर्थिक व्यवहार स्थिर राहतील. त्याचवेळी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांचे सहकार्य आवश्यक असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.
तुळ – आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला, कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक होईल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा पश्चाताप करावा लागेल. जुने वाद संपतील.
वृश्चिक – नवीन संधी निर्माण होतील आणि आर्थिक बाबी फायदेशीर ठरतील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवास घडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काही फायदे देखील होतील. घरातील कामांबाबत थोडीशी निष्काळजीपणा दाखवाल.
धनु – कामे इतरांवर सोपवू नका; तुमची कर्तव्ये हुशारीने पार पाडा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. घाईघाईने आर्थिक निर्णय घेणे टाळा. भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून दुखावले जाल अशा परिस्थितीपासून दूर राहा.
मकर – कामाच्या दृष्टीने व्यग्र असला तरी, दिवस सकारात्मक असेल. कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती स्थिर असेल. सामाजिक जीवनात तुम्हाला आदर मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी राहील.
कुंभ – अतिरिक्त प्रकल्पांवर काम करण्याचा भार वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल, त्यामुळे मनोबल आज वाढेल. प्रलंबित घरगुती काम पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
मीन – आजचा दिवस प्रचंड घाईगडबडीचा असेल, ज्याचा तुमच्या कामावर आणि निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. संयम आवश्यक असेल. काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, परंतु समजूतदारपणाने सर्वकाही ठीक होईल. कुटुंबाशी तुमचे नाते अधिक दृढ होईल. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.
दिनविशेष
पत्रकार, संपादक नानासाहेब परुळेकर
टीम अवांतर
डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, तथा नानासाहेब परुळेकर यांचा जन्म 20 सप्टेंबर 1897 रोजी झाला. अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून 1929 साली नानासाहेब भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले. त्याच्याच आधारे नानासाहेबांनी 1 जानेवारी1932 रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली. दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यावर नानासाहेबांनी भर दिला. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला वेगळा तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते. 8 जानेवारी 1973 रोजी या साक्षेपी संपादकाचे निधन झाले.