दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 ऑक्टोबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 28 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्दशी 15:44; नक्षत्र : हस्त 20:16
- योग : वैधृति 26:34; करण : चतुष्पाद 28:47
- सूर्य : तुळ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
नरक चतुर्दशी
अभ्यंगस्नान
सोमवती अमावस्या प्रारंभ 15:44
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, परंतु खर्चही वाढू शकतात. नोकरी करणारे जातक आणि व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक जाणकारांच्या सल्ल्या घ्यावा. कुटुंबातील सदस्यांकडून एखादी आश्चर्यकारक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – आरोग्याच्या बऱ्याच काळापासून कुरबुरी सुरू असतील, पण काळजी करू नका; लवकरच आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुमच्या कार्यक्षेत्रात पाठिंबा देईल आणि तुम्हाला आर्थिक फायदाही होईल. मनातील नकारात्मकता दूर कराल, सकारात्मक गोष्टींची कदर कराल. संगीत ऐकल्याने मनाला शांती मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल.
मिथुन – उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इतरांना मदत करण्यात आनंद मिळेल. नोकरदारांना दुसऱ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत सहलींचे नियोजन करू शकता. संतती तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करतील.
कर्क – तुम्हाला यश हवे असेल तर नशिबावर अवलंबून राहू नका; कठोर परिश्रम करा. त्यानेच तुम्हाला यश मिळेल. तुमचे खर्च नियंत्रित करा आणि हुशारीने गुंतवणूक करा. व्यावसायिकांना क्लायंटसोबत काही अडचणी येऊ शकतात. विवाहोत्सुकांना आज विवाहाचे प्रस्ताव येतील.
सिंह – आज, तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. संततीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भागीदारीतील व्यवसायात असाल तर नफ्याचे प्रमाण वाढणारे असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
हेही वाचा – आता काय परिस्थिती आहे?
कन्या – अविवाहित जातकांसाठी आज विवाह प्रस्ताव येऊ शकतात. काम करणाऱ्या जातकांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक एखादा मोठा करार करू शकतात. घरी धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते.
तुळ – मित्रांसोबत सहलीची योजना आखू शकता. समाजात तुमच्याबद्दलचा प्रेम आणि आदर वाढेल. व्यवसाय फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःसाठी वेळ काढा.
वृश्चिक – जुनी कामे पूर्ण होतील. दिवस व्यग्र राहील, पण कुटुंबासाठी वेळ काढा. जोखमीचे आर्थिक व्यवहार टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
धनु – मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यावेळी अशा एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, जी तुम्हाला आयुष्यात प्रेरणा देईल. कुटुंबासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक वाद आणि संघर्ष टाळा. संध्याकाळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल.
मकर – आरोग्याकडे लक्ष द्या आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. एखादा जुना मित्र भेटू शकतो. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. नोकरी आणि व्यवसाय असणाऱ्या जातकांसाठी दिवस सामान्य राहील.
कुंभ – उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात. तुमची जीवनशैली सुधारा. संध्याकाळी कौटुंबिक गेट टू गेदर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्त कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याशी भेट होऊ शकते.
हेही वाचा – Ayurveda : शरद ऋतुचर्या आणि दसरा, दिवाळी
मीन – घरी काही खास पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. गुंतवणुकीतून नफा मिळेल. नोकरदार जातकांना नव्या नोकरीसाठी मुलाखतीचे बोलावणे येण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना नफा आणि सरकारी मदतीचा फायदा होऊ शकतो. संततीच्या आरोग्याची काळजी वाटू शकते.
दिनविशेष
प्रतिभावन गायक, नट आणि संगीतदिग्दर्शक मास्तर कृष्णराव
टीम अवांतर
कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर तथा मास्तर कृष्णराव यांचा जन्म 20 जानेवारी 1898 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. लहानपणीच त्यांच्या वडीलबंधूनी त्यांना ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ या संगीत नाटक मंडळींमध्ये भरती केले. 1911 साली हरिभाऊ आपट्यांच्या संत सखूबाई या नाटकात त्यांनी विठ्ठलाची भूमिका केली. तेथे त्यांचा सवाई गंधर्वांच्या गायकीशी परिचय झाला. तेव्हापासून त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे पट्टशिष्यत्व लाभले. मास्तर कृष्णराव यांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या शारदा, सौभद्र, एकच प्याला, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, आशा-निराशा इत्यादी नाटकांतील पदांना चाली दिल्या. ‘गंधर्व नाटक मंडळी’ सोडल्यानंतर ते 1933 मध्ये व्ही. शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून रूजू झाले. तिथे त्यांनी धर्मात्मा, अमरज्योती, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी इत्यादी मराठी-हिंदी चित्रपटांना सुमधुर संगीत दिले. 1942 मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ चित्रपटसंस्थेतर्फे निघालेल्या भक्तीचा मळा या चित्रपटात संगीतदिग्दर्शनाबरोबरच त्यांनी सावता माळ्याची प्रमुख भूमिकाही केली. त्यांनी संगीतबद्ध केलेली लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, आता कशाला उद्याची बात, धुंद मधुमती रात रे, अगा वैकुंठीच्या राया, जोहार मायबाप जोहार, पायो री मैंने रामरतन धन पायो ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मास्तर कृष्णरावांनी संगीतावर ग्रंथ निर्मितीही केली. संगीत रागदारीवरील गायनाचा समावेश असलेल्या रागसंग्रहमाला नामक ग्रंथाचे एकूण सात खंड आहेत. त्यांना शंकराचार्यांकडून ‘संगीत कलानिधी’ ही पदवी; भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार, अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीतर्फे ‘रत्न सदस्यत्व’ (फेलोशिप); ‘बालगंधर्व’ आणि ‘विष्णुदास भावे’ ही सुवर्णपदके असे अनेक मानसन्मान लाभले. एक प्रतिभावान गायक, नट आणि संगीतदिग्दर्शक असणाऱ्या मास्तर कृष्णरावांचे 20 ऑक्टोबर 1974 रोजी पुणे येथे निधन झाले.


