दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 ऑक्टोबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 27 आश्विन शके 1947; तिथि : त्रयोदशी 13:51; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 17:48
- योग : ऐंद्र 26:03; करण : विष्टी 26:45
- सूर्य : तुळ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:14
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
शिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रा महत्त्वाची आणि आवश्यक
दिनविशेष
मराठी लघुकथाकार दिवाकर कृष्ण
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी कथाकार दिवाकर कृष्ण केळकर म्हणजेच दिवाकर कृष्ण यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1902 रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल (गुनमटकल) येथे झाला. पुढे मुंबई, पुणे आणि सांगली येथे राहून एम्. ए., एल्एल्. बी. झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे वकिलीचा व्यवसाय करायला सुरुवात केली. 1922मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकात ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘समाधी व इतर सहा गोष्टी’ या नावाने 1927 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर 1941 साली रूपगर्विता आणि सहा गोष्टी तर 1955 मध्ये महाराणी आणि इतर कथा हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. याखेरीज, किशोरीचे हृदय (1934) आणि विद्या आणि वारुणी (1944) या कादंबऱ्या तर तोड ही माळ (1934) हे नाटकही त्यांनी लिहिले. खरंतर, दिवाकर कृष्ण यांनी फारच थोड्या कथा लिहिल्या असल्या तरी मराठी लघुकथेचे एक शिल्पकार म्हणून त्यांची ओळख बनली आहे. कथानकाच्या चमत्कृतीपूर्ण गुंफणीपेक्षा हळुवारपणे घडविलेल्या भावनाविष्काराने लघुकथेत अधिक सखोलपणा आणि सामर्थ्य येते, हे दिवाकर कृष्णांनी आपल्या कथांतून प्रत्ययकारीपणे दाखवून दिले. त्यांच्या कथा अवतरताच मराठी ‘गोष्टी’चे मराठी ‘लघुकथे’त रूपांतर झाले. एका स्वायत्त साहित्यप्रकाराची प्रतिष्ठा मराठी कथेस मिळवून देण्यास त्यांचे कथालेखन जसे कारणीभूत झाले, तसेच मराठी कथेच्या कक्षा रुंदावून तिच्या ठायी दडलेल्या सामर्थ्याचा त्यांनी प्रभावी प्रत्यय दिला. समाधी… हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे मराठी कथेच्या उत्क्रांतिमार्गावरील एक महत्त्वपूर्ण टप्पा होय, असे मानले जाते ते याच कारणांसाठी. मुंबई येथे 1950 साली भरलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’च्या अधिवेशनात कथा शाखासंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1954 मध्ये लातूर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सामान्यतः, अतिशय अबोल आणि सामाजिक जीवनात फारसे न मिसळणारे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. 31 मे 1973 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – Ayurveda : शरद ऋतुचर्या आणि दसरा, दिवाळी
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


