दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 19 जुलै 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 28 आषाढ शके 1947; तिथि : नवमी 14:42; नक्षत्र : भरणी 24:37
योग : शूल 24:54; करण : वणिज 25:28
सूर्य : कर्क; चंद्र : मेष 30:11; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. नोकरदारांना काही कामे करवून घेण्यासाठी संयम आणि हुशारी दाखवावी लागेल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. जोडीदाराची भक्कम साथ मिळेल.
वृषभ – तुमच्या कामामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी कौशल्याचा वापर करू शकता. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जोडीदाराच्या आरोग्यामुळे मन:स्थिती बिघडू शकते.
मिथुन – गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. करिअरच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळाल्याने समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे चांगले ठरेल.
कर्क – ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने सत्यात उतरू शकतात. मित्रांच्या मदतीने व्यवसायात वाढ होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.
सिंह – तुमच्या कार्यक्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावित करू शकता. एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्चामुळे मन विचलित होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कन्या – आत्मविश्वासाने कामे पार पाडाल. उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. मित्राच्या मदतीने व्यवसायात वाढ होऊ शकते. अभ्यासात रुची वाढेल. शैक्षणिक कामात यशस्वी व्हाल. लेखन आणि बौद्धिक कार्यातील व्यग्र राहाल.
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
तुळ – अविवाहित जातकाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचा प्रवेश होईल. नोकरदार जातकांना पदोन्नती मिळाल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदाराशी विविध विषयांवर चर्चा होईल.
वृश्चिक – प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायात स्थान बदलण्याचीही शक्यता आहे. पण आत्मविश्वासाचा अभाव राहील आणि मन अस्वस्थ राहील. अनावश्यक राग टाळा. कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
धनु – व्यवसायातील नफ्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल. नोकरीच्या ठिकाणी काही चांगल्या कामांमुळे सन्मान होईल. अविवाहितांचे लग्न जमण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत आनंदात वेळ घालवता येईल.
मकर – संयमाची परीक्षा घेतली जाण्याचा दिवस आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न यश मिळवून देतील. भावाच्या किंवा बहिणीच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन ठेवा, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
कुंभ – कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे दिसतील. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होऊ शकतो. मात्र जोडीदाराच्या वागणुकीमुळे मनःस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
मीन – व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ शकता. कामाच्या ठिकाणी काही जुन्या कामांमुळे कौतुक होऊ शकते. कामगिरी पाहून पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.
दिनविशेष
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर
टीम अवांतर
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. वडील विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते तर, आई सुमती संस्कृत भाषेच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे डॉ. जयंत नारळीकर यांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीलाच झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात गेले. 1972 साली ते भारतात परत आले आणि TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे 1988 साली ते आयुकाचे संचालक झाले. “हॉयल-नारळीकर सिद्धांत” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरीमुळे डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. संशोधनासोबतच मराठीत विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू केले. ‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय, नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मिथ्स प्राइज, ॲडम्स प्राइज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन यासारख्या पुरस्कारांनी तर भारत सरकारकडून पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 2010 साली महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 20 मे 2025 रोजी त्यांचे निधन झाले.