दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 19 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 28 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 15:32; नक्षत्र : आर्द्रा 25:07
योग : वज्र 20:29; करण : कौलव 26:43
सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
मंगळागौरी पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस अतिशय उत्तम आणि समाधानकारक जाईल. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणीही पगारवाढ होण्याचे शुभ संकेत आहेत. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात एखाद्या गोष्टीवरून चिंताग्रस्त व्हाल, ज्याचा परिणाम स्वभावात दिसेल.
वृषभ – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. नफा कमावण्याच्या सुवर्ण संधी मिळतील, ज्यामुळे संपत्तीत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांची बदली होईल, मात्र त्यातून प्रगतीचा मार्ग निघेल. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.
मिथुन – दिवस अतिशय उत्तम जाईल. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते, ज्यामुळे मन आनंदी होईल. सहकाऱ्यांचा देखील पूर्ण पाठिंबा मिळेल. त्याच वेळी, व्यवसायात भागीदारी आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कपडे खरेदीसाठी कुटुंबीयांसह बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.
कर्क – व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल, त्यातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मित्रांच्या मदतीने कठीण कामे देखील सहजपणे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होईल.
सिंह – काही मित्रांच्या मदतीने व्यवसायात नवीन स्रोत येतील. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मन आनंदी असेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. या सगळ्या गडबडीत आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.
कन्या – कामाच्या ठिकाणी काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. अपेक्षेनुसार उत्पन्नात देखील वाढ होईल. परंतु प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बौद्धिक कार्य आणि लेखनातून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात आर्थिक फायदा होऊ शकतो.
हेही वाचा – ऋणानुबंध… विमान ते फायटर विमान
तुळ – कामाच्या ठिकाणी मनाविरुद्ध एखादे काम करावे लागू शकते. यामुळे काही काळ अस्वस्थ वाटेल. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने आर्थिक बाबींसंदर्भात काळजी घ्या. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकते. कुटुंबाच्या दृष्टीने दिवस शुभ राहील, घरात सुख-शांती राहील.
वृश्चिक – आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील तर, ते आता परत मिळू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. व्यवसायात नफा मिळविण्याच्या संधी मिळतील. शिक्षण क्षेत्रात मुलांच्या बाजूने आनंददायी निकाल मिळाल्याने प्रतिष्ठा वाढेल.
धनु – महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला लागेल. शिवाय, त्यात काही अडचणींनाही तोंड द्यावे लागू शकते. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास संयम राखणे आणि कठोर शब्द टाळणे महत्त्वाचे असेल. कामाच्या संदर्भात प्रवासाला जावे लागू शकते. कुटुंबात मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता आहे.
मकर – आर्थिक बाबतीत नशीबाची उत्तम साथ मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी विरोधक कामात अडथळा आणू शकणार नाहीत, त्यामुळे यश तुमचेच असेल. संपूर्ण दिवस चांगला जाईल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. त्यामुळे, दिवस धावपळीचा असण्याची शक्यता आहे. मालमत्तेचा विस्तार आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात टोकाचा राग टाळावा लागेल, अन्यथा जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरी करणारे जातक त्यांची कामे पूर्ण करण्यात अधिक व्यग्र राहू शकतात.
मीन – संमिश्र परिणाम देणारा दिवस असेल. मालमत्तेच्या संदर्भात काही पैसे खर्च करावे लागू शकतात. मात्र त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. राजकारणाच्या क्षेत्रात संपर्क वाढल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – गोलू आणि गोदाकाठची रथयात्रा
दिनविशेष
लेखिका सुधा मूर्ती
टीम अवांतर
कर्नाटकातील शिगगाव येथील सर्जन डॉ. आर. एच. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी विमला कुलकर्णी यांच्या घरी 19 ऑगस्ट 1950 रोजी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या प्रमुख सुधा कुलकर्णी – मूर्ती यांचा जन्म झाला. घरातील साधेपणा आणि चांगले विचारांचे बीज लहान असतानाच त्यांच्या मनात रूजले. त्यांचा जन्म कर्नाटकातील असला तरी बालपण महाराष्ट्रातील कुरुंदवाड येथे गेले. मराठी शाळेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे मराठीसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. सुधा मूर्ती यांनी बी.व्ही.बी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीमधून बी. ई. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यावेळी इंजिनीअरींगला प्रवेश घेणाऱ्या 150 विद्यार्थ्यांमध्ये त्या एकमेव विद्यार्थिनी होत्या. तिथेही त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण, त्या मागे हटल्या नाहीत. 1974 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमई पूर्ण केले. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी (TELCO) टाटा इंजिनीअरिंग ॲण्ड लोकोमोटिव्ह कंपनीमध्ये नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला इंजिनीअर ठरल्या. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि जमशेदपूर येथे काही काळ काम केलं. पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये वरिष्ठ सिस्टम्स ॲनालिस्ट म्हणूनही देखील त्या कार्यरत होत्या. टेल्को कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची ओळख एन. आर. नारायण मूर्ती यांच्याशी झाली. भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. 1981 साली सुरू झालेल्या इन्फोसिसच्या व्यापात 1996 मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना मूर्ती दाम्पत्याने केली. या ट्रस्टच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी अनेक समाजोपयोगी काम केली आहेत. सुधा मूर्ती या उत्तम लेखिका देखील आहेत. आतापर्यंत त्यांचे एकूण 21 कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्यातील काही साहित्यकृतींचा मराठीत देखील अनुवाद झाले आहेत. 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची निवड केली आहे. भारत सरकारने 2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार तर 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.