Tuesday, March 17, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 17 मार्च 2026; वार : मंगळवार
  • भारतीय सौर : 26 फाल्गुन शके 1947; तिथि : त्रयोदशी 09:22; नक्षत्र : शततारका 30:08
  • योग : सिद्ध 08:14; साध्य 30:21; करण : विष्टी 20:58;
  • सूर्य : मीन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:47; सूर्यास्त : 18:48;
  • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : विश्वावसू;
  • शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

शिवरात्री

मधुकृष्ण त्रयोदशी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ

टीम अवांतर

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1920 रोजी पुणे येथे झाला. 1923 साली वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला; परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यामुळे पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव त्यांनी लावले.

मराठी सातवी झाल्यावर 1929मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीला एका खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्या पुण्यातील हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन 1937मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्या ग्रामीण भागात सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यांत मग्न झाल्या. 1945 साली ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. त्या शाळेत अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर पुढची 47 वर्षे म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अविरत, निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य केले. हे कार्य चालू असतानाच 1961 साली मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची बी. ए. परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.

हेही वाचा – पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; मात्र बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. या परिसरात त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली. त्यातून बोर्डी आणि नंतर कोसबाड या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली.

अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फुटलेख आणि पुस्तकांद्वारे केली. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांत अनुवादही झाले. त्यांच्या विधायक आणि भरीव कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने 1972 साली ‘आदर्श शिक्षिका’ तर 1975 साली ‘दलित मित्र’ हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना ‘फाय फाऊंडेशन पुरस्कार’, ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ आणि ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इत्यादींनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 1985 साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 27 सप्टेंबर 1992 रोजी त्यांचे बोर्डी येथे निधन झाले.


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस संपत्तीत वाढ करणारा आहे. व्यवसायातील कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. कामासाठी सुरू असणारे प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. व्यवहारांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. उपलब्ध संधींचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता सुधारेल. कौटुंबिक कामांमध्ये तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल.

वृषभ – घरातील वातावरण खूप आल्हाददायक राहील. तुमची कीर्ती आणि संपत्ती वाढेल, तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. तुमची प्रशासकीय बाजू मजबूत राहील. आज, व्यवस्थापकीय कामांमध्ये उत्तम कार्यक्षमता दाखवाल आणि सर्वत्र सक्रिय राहाल. महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केल्याने उत्साह वाढेल.

मिथुन – आज नशीब तुमच्या बाजूने आहे. तुमची सर्व कामे क्षमतेने पूर्ण होतील आणि यशाचा मार्ग सुकर होईल. तुमच्या पुढाकाराने आणि धैर्याने विविध योजना फलदायी ठरतील. व्यवसाय वाढीच्या संधी वाढतील आणि आर्थिक नफ्यात सुधारणा होईल. मात्र, अनावश्यक खर्च टाळण्याबरोबरच गुंतवणुकीबाबत पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या.

कर्क – घोटाळेबाजांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही कामात सावधगिरी बाळगणे फायदेशीर ठरेल. आपले ध्येय पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचबरोबर आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुटुंबाकडून पाठिंबा मिळत राहील. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सिंह – आज तुम्ही महत्त्वाच्या संधींचा फायदा घेण्यात आघाडीवर असाल. सरकारी उपक्रमांमध्ये आणि संयुक्त प्रयत्नांमध्ये तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे व्यावसायिक नफा होईल. वैवाहिक जीवन सुसंवादी असेल. कोणालाही उधार पैसे देताना पूर्ण विचारांती द्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

हेही वाचा – पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

कन्या – करिअरमध्ये स्वतःला स्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायाची परिस्थिती सामान्य राहील, म्हणून व्यवहारांमध्ये घाई करू नका. वेळेवर कामे पूर्ण करण्यासाठी नोकरदारांवर वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. उत्पन्न आणि खर्च दोन्ही जास्त राहतील, त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.

तुळ – वातावरण अनुकूल असेल. आज प्रियजनांसोबत आनंदी आणि शांततेने वेळ घालवाल. तुमच्या स्वभावामुळे नोकरीच्या ठिकाणी वातावरण हलकं-फुलकं राहील. सहकाऱ्यांकडून योग्य मदत मिळेल. वरिष्ठांकडूनही पाठबळ मिळेल. नवे करार करताना कागदपत्रांची योग्य पडताळणी करण्याची खबरदारी व्यावसायिकांनी घ्यावी.

वृश्चिक – कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात परिस्थिती सकारात्मक राहील. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य घ्या, ज्येष्ठांचा आदर करा. आज तुम्ही तुमच्या घराची सजावट आणि व्यवस्था सुधारण्यावर विशेष भर द्याल. नोकरीच्या ठिकाणी आज पदोन्नती किंवा बदली होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचे काम व्यवस्थित ठेवा.

धनु – आज संवादकौशल्य खूप प्रभावी असेल. तुम्ही योग्य संपर्क आणि चांगल्या संवादामुळे व्यावसायिक संबंध मजबूत होतील. आज होणाऱ्या नवीन ओळखींचा फायदा, भविष्यात होऊ शकतो. व्यावसायिक बाबींमध्ये दूरदृष्टीचा वापर केलात तर त्याचा जास्त लाभ होऊ शकतो.

मकर – आज घरात उत्सवाचे वातावरण असेल. कुटुंबात प्रेम आणि आपुलकी वाढेल, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. प्रलंबित कामे आज गती घेतील. तुमचा उच्च आत्मविश्वास तुमच्या वागण्यावर आणि विचारशक्तीवर परिणाम करेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील.

कुंभ – आज, सर्जनशीलता नवीन उंची गाठेल. वैयक्तिक प्रगती साधण्यासोबतच, नोकरीची एखादी आकर्षक ऑफर देखील मिळू शकते. नातेसंबंध सुधारतील आणि तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे आधुनिक विचार आणि कलात्मक कौशल्य यामुळे समाजात लोकप्रियता वाढेल. तुम्हाला व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत यश मिळेल. तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील.

मीन – सर्वोत्तम कामगिरी दाखविण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर करावा लागेल. कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्ही कार्यप्रणालीत सुधारणा करू शकाल. परराष्ट्र व्यवहारात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आज खर्च नियंत्रित करणे थोडे आव्हानात्मक असू शकते, म्हणून आर्थिक शिस्त राखा. विरोधक अधिक सक्रिय होऊ शकतात, म्हणून व्यवहारात सावधगिरी बाळगा.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!