दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 17 जुलै 2025; वार : गुरुवार
भारतीय सौर : 26 आषाढ शके 1947; तिथि : सप्तमी 19:09; नक्षत्र : रेवती 27:38
योग : अतिगंड 09:28; करण : विष्टी 08:07, बालव 30:07
सूर्य : मिथुन; चंद्र : मीन 27:38; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
करी दिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली असणार आहे. पण उत्साहाची पातळी घसरलेली असेल. अनावश्यक खर्च करण्याचे टाळा, अन्यथा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते.
वृषभ – व्यवसायात प्रगती होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. अनावश्यक ताण टाळणे प्रकृतीसाठी चांगले ठरेल. मानसिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक कणखर बनाल. आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन – आज आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढलेली असेल. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळविण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आर्थिक समस्या वाढू शकतात. व्यापाऱ्यांना फायदा होईल. प्रियजनांकडून सहकार्य मिळेल. एखाद्या रोमँटिक ट्रीपवर जाण्याची शक्यता आहे.
कर्क – एखादी चांगली बातमी मिळू शकते. दिवस लाभदायक ठरणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. खर्च मर्यादित ठेवा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी, आजचा दिवस त्यांचा बायोडेटा अपडेट करण्यासाठी चांगला आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करून व्यग्र दिनचर्येतून थोडासा वेळ नक्कीच स्वतःसाठी काढा.
सिंह – घरी पाहुणे येऊ शकतात. व्यवसाय किंवा आर्थिक दृष्टिकोनातून दिवस फारसा फायदेशीर नाही. आर्थिक स्थिती तपासा आणि खर्च मर्यादित करा. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी कामांची यादी तयार करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या – मनाचा गोंधळ उडून निराशा पदरी पडणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत असेल. मात्र, काही आर्थिक व्यवहार आणि पालकांचे आरोग्य यामुळे चिंता वाढू शकते. व्यावसायिकांना विस्ताराच्या संधी मिळतील. परदेश दौऱ्याची योजना आखता येईल.
हेही वाचा – आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ!
तुळ – शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे. मन प्रसन्न राहील. पालकांच्या सहकार्याने काही महत्त्वाच्या कामात यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी डेडलाइनवर लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख बनवाल. मात्र काही कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य राहणार आहे.
वृश्चिक – व्यवसायात चढ-उतार येतील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खर्चाचा आढावा घ्या. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकल्पाबाबत गोंधळ असेल तर, वरिष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. अहंकार बाजूला ठेवावा लागेल. जोडीदारासोबत एक उत्तम संध्याकाळ एकत्र घालवू शकता.
धनु – मानसिक शांतीसाठी योग किंवा ध्यानधारणा करा. स्वतःसाठी पैसे वाचवण्याचा विचार आज पूर्ण होऊ शकतो. योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुमच्या बाजूने असल्याचे दिसून येईल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासोबत थोडा वेळ घालवण्याचा आग्रह धरू शकतो.
मकर – तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. जे जातक जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांबरोबर व्यवसाय करत आहेत, त्यांनी खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असाल. मित्रांच्या मदतीने एखाद्या कामात यश मिळू शकते. जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल.
कुंभ – कमाई वाढवण्याची ताकद आणि कौशल्य यात वाढ होईल. व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या स्थितीत असाल. मात्र, अनेक तणावांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे अस्वस्थता वाढेल. ज्यांनी अजूनही मागील रक्कम परत केलेली नाही, त्यांना पुन्हा पैसे उधार देऊ नका. जोडीदाराकडे लक्ष द्या.
मीन – मेहनतीचे अपेक्षित परिणाम दिसून येतील. सध्याचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. स्वतःला अनावश्यक खर्च करण्यापासून रोखा, तेव्हाच बचत करू शकाल. मित्रांचा पाठिंबा व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो.
हेही वाचा – नातवंडांचे वजन करणारे आजोबा!
दिनविशेष
अभिनेत्री शांता हुबळीकर
टीम अवांतर
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने आणि गायनाने विख्यात झालेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म 14 एप्रिल 1914 रोजी कर्नाटकातील हुबळीजवळच्या अदरगुंची या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव राजम्मा होते. 1930मध्ये गदग येथे गुब्बी या नाटक कंपनीत काम करत असताना नाटकात थोड्याफार महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या. कंपनीचा मुक्काम हुबळी, बेळगाव येथे असताना शांताबाईंना 1935 साली त्यांना कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी मिळाली आणि त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली. शांताबाईंना भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. याशिवाय मराठी, हिंदी आणि कन्नड या तीनही भाषांवर हळूहळू प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. 1937मध्ये त्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजू झाल्या. इथून त्यांना अमाप लोकप्रियता आणि वैभव मिळण्यास सुरुवात झाली. माझा मुलगा (हिंदी – मेरा लडका) हा चित्रपट दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांना नायिकेची भूमिका दिली. नंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित माणूस (हिंदी – आदमी) या सामाजिक चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा आणि लोकप्रियता मिळवून दिली. पुण्यातील डेक्कन एम्पोरियमचे मालक बापूसाहेब गीते यांच्याशी शांताबाईंचा परिचय झाला. 1939मध्ये पूर्वविवाहित आणि वयाने मोठे असलेल्या गीते यांच्याशी शांताबाईंनी विवाह केला. 1945मध्ये शांताबाईंनी कुलकलंक हा चित्रपट केला. तो त्यांचा नायिका म्हणून अखेरचा मराठी चित्रपट होय. नंतर 1957 – 1958मध्ये अनुक्रमे फिल्मिस्तान कंपनीचे सौभाग्यवती भव आणि घरगृहस्थी असे दोन हिंदी चित्रपट त्यांनी केले; पण या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी स्वतःचे घर सोडले आणि 1974 साली त्या वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमात राहू लागल्या. यानंतर 1989मध्ये पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात शांताबाई राहू लागल्या. तेथेच 17 जुलै 1992 अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी 1990मध्ये कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र लिहिले होते.