दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 24:21; नक्षत्र : आर्द्रा 06:45, पुनर्वसू 30:25
- योग : वरियान 24:33; करण : वणिज 12:53
- सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 24:27; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
दशमी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरेल. अनेक निर्णय तुमच्या बाजूने लागतील, ज्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. अचानक पैसे मिळवण्याच्या संधी वाढण्याची शक्यता असून त्या हातून जाणार नाहीत, याची काळजी घ्या. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
वृषभ – व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. कार्यालयातील एखादे काम पूर्ण झाल्याने कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बेरोजगार आहेत त्यांना आज मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न यशस्वी होतील. मात्र आज खर्चात वाढ होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मिथुन – दिवस संमिश्र असेल. काही आनंददायी तर काही निराश करणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा त्रासदायक असू शकतो, एखाद्या सहकाऱ्यामुळे नुकसान सोसावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राहील. तथापि, वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांची विशेष काळजी घ्यावी लागेल.
कर्क – आज घाईघाईत कोणतेही काम करणे टाळा. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. दुसऱ्याच्या सल्ल्याने गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित कामे वेगाने होतील आणि चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार जातकांना आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल.
सिंह – दिवस खूप फायदेशीर ठरेल आणि तो चमत्कारापेक्षा कमी नसेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल होऊ शकतो. संततीची प्रगती उत्तम असेल. शिक्षण क्षेत्रात एखादी मोठी कामगिरी ते साध्य करतील. खाण्याच्या सवयीवर थोडे नियंत्रण ठेवा, अन्यथा मधुमेहासारखे आजार वाढू शकतो.
हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…
कन्या – आजचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल. जे नोकरी करतात ते किंवा जे नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना आज चांगल्या ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा फायदा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खूश असतील. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आज मोठे नुकसान होऊ शकते.
तुळ – आजचा दिवस काहीतरी नवीन करण्यासाठी असेल. कमाईच्या काही नवीन संधी मिळतील ज्या अनेक महिने फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी काही नवीन कामगिरी करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना आज व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी, आज कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आज संपत्ती, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी काम करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तिथे झालेली चूक महागात पडू शकते. शत्रू तुमचे काही नुकसान करू शकतात, त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. भौतिक सुखांवर थोडे जास्त पैसे खर्च कराल.
धनु – कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कमी उत्पन्नामुळे तुम्ही मानसिक ताणतणावात असाल. नोकरदार जातकांवरील कामाचा ताण वाढू शकतो. ज्यांचा मालमत्तेशी संबंधित वाद होता, त्यात आता गुंतागुंत वाढू शकते, त्यामुळे चिंता वाढतील. आज वेळ तुमच्या बाजूने नाही, त्यामुळे खूप संयम आणि शांतपणे सगळी कामे करावी लागतील.
मकर – आज खूप शांततेत दिवस घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जे जातक दुसऱ्याचे वाहन चालवणारे असतील त्यांनी सावधगिरी बाळगावी. एखादा लहानसा अपघात घडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी, एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आरोग्य चांगले राहील.
कुंभ – आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरेल. नोकरी आणि व्यवसायातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल. आज कोणतेही कर्जविषयक व्यवहार टाळा. जे जातक कोणत्याही सरकारी कामाशी संबंधित आहेत, त्यांचे काम आज अडकू शकते, परंतु कौशल्याने ते काम पूर्ण करू शकाल.
हेही वाचा – प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी
मीन – आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायात चांगली वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज नोकरदार जातकांसाठी पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. कामात उत्साह असेल आणि लोकांना भेटण्याची प्रक्रिया सुरू राहील. आज अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकते. नवीन कामाच्या शोधात असलेल्या जातकांना आज चांगली बातमी मिळू शकते.
दिनविशेष
श्रेष्ठ भारतीय शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी
टीम अवांतर
कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 रोजी मदुराई येथे झाला. त्यांच्या आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांच्या आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. या दोघींच्या संगीताचा वारसा सुब्बुलक्ष्मी यांना लाभला. सेमनगुडी श्रीनिवास अय्यंगार हे सुब्बुलक्ष्मी यांचे कर्नाटक संगीतातील गुरू होत. पंडित नारायणराव व्यास यांनी त्यांना हिंदुस्थानी संगीत शिकविले. प्रख्यात नर्तकी बालासरस्वती यांनी त्यांना पदम्चे शिक्षण दिले, तर दिलीपकुमार राय आणि सिद्धेश्वरीदेवी यांनी त्यांना ठुमरी आणि टप्पा गायनाचे धडे दिले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका बाजारात आली तर, सतराव्या वर्षी मद्रासच्या संगीत अकादमीत गाण्याचा मान त्यांना लाभला. या मैफलीने त्यांचा खूपच नावलौकिक झाला. तमिळ चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. 1938 मध्ये सेवासदनम् हा सुब्बुलक्ष्मी अभिनित पहिला तमिळ चित्रपट होय. यानंतर शकुंतला, सावित्री, मीरा या त्यांच्या चित्रपटांनी अमाप लोकप्रियता मिळविली. मीरा हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाल होता. या चित्रपटात त्यांनी संत मीरेची भूमिका केली. त्यांचा त्यातील अभिनय व त्यांनी गायिलेली मीरेची सुमधुर भजने देशभर अत्यंत गाजली व त्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या त्यानंतर त्यांनी अनपेक्षितपणे चित्रपटसंन्यास घेतला आणि शास्त्रीय संगीतोपासनेला सर्वस्वी वाहून घेतले. सुब्बुलक्ष्मींनी भक्तिसंगीतात अनेक प्रयोग केले. नवनवीन रचना निर्माण केल्या. कर्नाटक संगीतातील कृती, पदम्, वर्णम्, तिल्लाना इत्यादी संगीतप्रकार त्या बिनचूक आणि प्रभावीपणे सादर करीत. त्यांनी गायिलेल्या श्रीविष्णुसहस्रनाम आणि व्यंकटेशस्तोत्र या रचना त्यांच्या आवाजातील अवीट गोडीमुळे अजरामर ठरल्या आहेत. त्या जशा उत्तम गायिका होत्या, तशाच उत्कृष्ट वीणा आणि मृदंगवादकही होत्या. भारत सरकारकडून पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच सर्वोच्च असा भारतरत्न हे पुरस्कार त्यांना लाभले. स्पिरिट ऑफ फ्रीडम, राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार, तसेच रॅमन मॅगसेसे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली. चेन्नई येथे 11 डिसेंबर 2004 रोजी सुब्बुलक्ष्मींचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ 2016 मध्ये भारतीय टपाल खात्याने पोस्टकार्डाचे आणि संयुक्त राष्ट्रसंघाने एका टपाल तिकीटाचे अनावरण केले आहे.