दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 डिसेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 25 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वादशी 23:56; नक्षत्र : स्वाती 14:08
- योग : अतिगंड 13:22; करण : कौलव 10:38
- सूर्य : धनु; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:03; सूर्यास्त : 18:02
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
धनुर्मासारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी घाई केल्यास गोष्टी बिघडू शकतात. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दूर राहणारा कुटुंबातील एखादा सदस्य आज अचानक येऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. पालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा.
वृषभ – दिवस सकारात्मक असेल. एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. कुटुंबातील एखाद्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. आज संततीच्या करिअरबद्दल वाटणारी चिंता कमी होईल. प्रगतीतील अडथळे दूर होतील. एखाद्या पिकनिकची योजना आखू शकता. कार्यालयात काम करताना, मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही.
मिथुन – दिवस गुंतागुंतीने भरलेला असेल. मात्र आज तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसाय भागीदारीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तथापि, घराच्या नूतनीकरणाचा खर्च वाढेल. आईशी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा.
कर्क – दिवस उर्जेने भरलेला असेल. जबाबदाऱ्या सहजतेने पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. कर्जाशी संबंधित कोणतेही प्रकरण आज सोडवता येईल. शहाणपणा आणि विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या आरोग्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते.
सिंह – आजचा दिवस महत्त्वाचा असेल. आज भूतकाळातील चुकांमधून शिकावे लागेल. व्यवसायात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. आज मुलांचा राग सहन करावा लागेल, मात्र त्यांचे मुद्दे पटणारे असल्याने त्यांच्याशी सहमत व्हावे लागेल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.
कन्या – दिवस प्रगतीचा असेल. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पालकांनी दिलेला सल्ला फायदेशीर ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी ज्याला शत्रू समजत होतात, तो खरेतर तुमचा हितचिंतक आहे, याची जाणीव होईल. सामाजिक क्षेत्रात आदर वाढेल.
हेही वाचा – मोठा मम्मी… आमची दोस्ती आजही पक्की!
तुळ – दिवस मौजमजेने आणि आनंदाने भरलेला असेल. त्याचवेळी तुम्हाला जबाबदाऱ्यांकडेही लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. एखादा जुनाट आजार वाढू शकतो. कौटुंबिक जीवनात असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वृश्चिक – आजचा दिवस कायदेशीर प्रकरणात विजय मिळवून देईल. वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटा हिस्सा काही जातकांना मिळू शकेल. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. संततीच्या शैक्षणिक अधोगतीमुळे ताण येऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. आज जोडीदाराकडून अचानक एखादी भेटवस्तू मिळू शकते.
धनु – आजचा दिवस विचारपूर्वक कृती करण्याचा आहे. इतरांच्या कामात व्यग्र राहिल्याने तुमच्या स्वतःच्या जबाबदाऱ्यांवर परिणाम होईल. आज वरिष्ठांकडून अधिक जबाबदारी दिली जाऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आज व्यवसायात बदल करण्याचा विचार करू शकता.
मकर – संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ करणारा दिवस असेल. कार्यालयात कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदल करा. पालकांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होईल. आज घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करू शकता. पैसे उधार देणे टाळा.
कुंभ – दिवस संमिश्र असेल. कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीच्या निमित्ताने दूरचा प्रवास करेल. घरातील विवाहोत्सुकांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होऊ शकतात. हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकते. राजकीय विरोधकांपासून सावध रहा. कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी रागावर नियंत्रण ठेवा.
मीन – दिवस चांगला जाईल. आरोग्यात सुधारणा होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून व्यवसायाबाबत एखादा मोलाचा सल्ला दिला जाईल. अफवांवर अवलंबून राहू नका, कारण त्यामुळे वैवाहिक नात्यातील तणाव वाढेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती होईल.
हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम
दिनविशेष
मराठी कोशकार चिंतामण कर्वे
टीम अवांतर
कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संग्राहक आणि संपादक म्हणून ओळखले जाणारे चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1894 साली वडोदरा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर 1919 मध्ये ज्ञानकोशकार केतकरांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. तसेच, केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यांनी खूप मदत केली. डॉ. केतकरांसारख्या विद्वान, बुद्धिवंताच्या सहवासात कोश संपादनाचे सुरुवातीचे धडे कर्वे यांनी गिरवले आणि नंतर ज्ञानकोशाच्या कामाला स्वतःला वाहून घेतले.
ज्ञानकोशाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र शब्दकोशाच्या एकंदर सात रंगांची देखील निर्मिती केली. त्यानंतर महाराष्ट्र वाक्-संप्रदाय कोशाचे 2 भाग, शास्त्रीय परिभाषा कोश यांचीही निर्मिती केली. यापैकी ‘शब्दकोश’ हा मराठी भाषेतील सर्वसमावेशक, व्यापक स्वरूपाचा पहिलाच कोश होता. या कोशासाठी त्यांनी मराठी भाषा ज्या ज्या प्रांतात बोलली जाते, त्या त्या बोलीभाषेतील शब्दसंग्रह आवर्जून गोळा केले. त्यांच्या कोशाचे वैशिष्ट्य म्हणजे माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा, सूक्ष्म संशोधन आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन.
त्यांनी ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’, ‘प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये’, ‘आनंदीबाई पेशवे आदी ग्रंथांसह विविध नियतकालिकांतून संस्कृती, इतिहास, साहित्य भाषा या विषयांवर 400 हून अधिक लेख लिहिले आहेत. याखेरीज ‘पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे’, ‘पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे’, ‘छोट्या शोधनोंदी’, ‘व्यक्ती नोंदी’, ‘व्यक्तिपरिचय’ हे त्यांचे लेखनकार्यही अतिशय मोलाचे ठरले आहे. अशा या थोर कोशकाराचे 16 डिसेंबर 1960 रोजी निधन झाले.


