दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 24 भाद्रपद शके 1947; तिथि : नवमी 25:31; नक्षत्र : मृगशीर्ष 07:31
- योग : व्यतिपात 26:33; करण : तैतिल 14:15
- सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:41
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
नवमी श्राद्ध
अविधवा नवमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. वरिष्ठ कामावर खूप खूश असतील, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. धर्मादाय कार्यात सामील होऊन तुम्ही चांगले नाव कमवाल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
वृषभ – आज मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यात नक्कीच यश मिळेल. पैशांशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती कोणालाही देण्याची गरज नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना थोडा शहाणपणा दाखवावा लागेल. एखादा नातेवाईक भेटायला येऊ शकतो.
मिथुन – आजचा दिवस यशाचा असेल. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. आज नवीन वाहन खरेदीचा विचार करू शकता. वाढत्या खर्चाबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल.
कर्क – आजचा दिवस गुंतागुंतीचा असेल. कोणताही निर्णय अतिशय हुशारीने घ्या. कौटुंबिक बाबी एकत्र बसून सोडवा. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आवश्यक कर्जासाठी अर्ज करू शकता. सरकारी प्रकरणात निर्णय येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. त्यामुळे थोडे निराश होऊ शकता.
सिंह – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. हाती घेतलेल्या कामात चांगले यश मिळेल. तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून राहणार नाही. एखादे प्रलंबित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात भागीदाराशी आगामी योजनांबद्दल बोलू शकता. एखादी चांगली योजना समजली तर त्यात हुशारीने गुंतवणूक करा.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याचा असेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर, ती संधी सोडू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर ते काही काळासाठी पुढे ढकला. कामाच्या बाबतीत पालक काही सल्ला देत असतील तर त्यावर अवश्य अंमलबजावणी करा.
तुळ – काम करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. विरोधक सतर्क आहेत, जे त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेक दिवसांपासून असणाऱ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याची संधी सोडू नका. दुसऱ्याच्या खासगी आयुष्याबाबत अनावश्यक बोलणे टाळावे लागेल. सामाजिक कार्यासाठी एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आजचा दिवस अनुकूल असेल. कौटुंबिक खर्चाकडे जरा लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या कुरबुरी असतील, त्यामुळे त्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. एखादी गोष्ट जोडीदाराला पटवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. वाहन सावधगिरीने चालवा. व्यवसायात वाढ होईल, ज्यामुळे कामाची गुणवत्ता सुधारेल.
धनु – आजचा दिवस तुमच्या प्रभाव आणि वैभवात वाढ आणणारा आहे. सरकारी काम उरकण्याची योजना आखू शकता. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन झाल्यामुळे वातावरण आनंददायी असेल. कामाबद्दल थोडी काळजी घ्या.
मकर – आजचा दिवस आनंदाचा असेल. आजूबाजूला होणाऱ्या वादविवादांपासून दूर रहाणे उत्तम. नोकरीच्या शोधात असलेल्या जातांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, अविवाहित जातकांसाठी घरात लग्नाचा विषय निघू शकतो. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून मुक्तता मिळेल.
कुंभ – आजचा दिवस फायदेशीर असेल. एखादे नवीन काम सुरू करता येईल. नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. महिलांना मैत्रिणींकडून व्यवसायात चांगला नफा होईल. जुन्या चुकांपासून धडा घ्या आणि यशस्वी वाटचाल करा. यशस्वी नवीन वाहन खरेदीचा विचार करू शकता.
हेही वाचा – कंडक्टरचं गणित खरं ठरलं, पण…
मीन – शंकांचे काहूर असल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. कोणत्याही व्यवहाराला अंतिम रूप मिळायला आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकारी ताण वाढवू शकतात. दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आज तिथून मुलाखतीसाठी फोन येण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
टीम अवांतर
प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. 1880मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. 1883मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 1884मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता आला. पुढे 1909 साली हैदराबाद संस्थानात हैदराबाद शहराची पुनर्रचना तसेच, मूसा आणि इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. नंतर 1912 ते 1918 ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग, कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्स) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला. म्हैसूरपासून 18 किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. 12.5 कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड तसेच विजापूर शहर पाणीपुरवठा योजनाही त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद आणि म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. 1955 साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ दिला. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. 14 एप्रिल 1962 रोजी बंगलोर येथे या शतायुषी अभियंत्याचे निधन झाले.