Sunday, March 15, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 15 मार्च 2026; वार : रविवार
  • भारतीय सौर : 24 फाल्गुन शके 1947; तिथि : एकादशी 09:16; नक्षत्र : श्रवण 29:55;
  • योग : परिघ 10:24; करण : कौलव 21:33;
  • सूर्य : मीन; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:49; सूर्यास्त : 18:47;
  • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : विश्वावसू;
  • शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127.

पापमोचनी एकादशी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

देशातील पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल

टीम अवांतर

देशातील पहिल्या महिला वैमानिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरला ठकराल यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या 16व्या वर्षी सरला यांचं लग्न लाहोरमधील पी. डी. शर्मा यांच्याशी झालं. शर्मा स्वतः एअरमेल पायलट लायसन्स मिळालेले तत्कालीन अविभक्त भारतातले पहिले भारतीय पायलट होते. शर्मा यांच्या घरात ते धरून एकूण नऊ पायलट होते. लग्नानंतर सरला यांनीही विमानोड्डाणाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 21व्या वर्षी, 1935 साली साडी नेसून कॉकपिटमध्ये बसून विमान त्यांनी उडवलं.

हेही वाचा – योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

लायसन्स मिळवताना सरला यांनी जिप्सी मॉथ जातीचं दोन आसनी विमान उडवलं होतं; परंतु एकदा लायसन्स हाती आल्यावर त्यांना लाहोर फ्लाइंग क्लबच्या मालकीचं विमान उडवण्याची संधी मिळाली आणि तिचा पुरेपूर फायदा उठवत एक हजार तासांचं उड्डाण पूर्ण करून मे 1936 मध्ये सरला यांनी ‘ए‘ लायसन्स मिळवलं. हे लायसन्स मिळालं तेव्हा सरला चार वर्षे वयाच्या मुलीची आई होत्या. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची वृत्तपत्रांनी तर प्रशंसा केलीच, परंतु आता अवकाशावर केवळ पुरुषांचा एकाधिकार राहिलेला नाही, असे मत स्पष्टपणे नोंदवत भविष्यातील महिलायुगाच्या नांदीचे संकेतही दिले होते.

’ए’ लायसन्स मिळवल्यानंतर ’बी’ लायसन्स घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने 1939 मध्ये एका उड्डाणादरम्यान शर्मा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सरला यांनी कमर्शियल पायलट लायसन्स मिळावं, यासाठी अर्ज केला; दुर्दैवाने त्यावेळी दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झाल्याने नागरी उड्डाणांना स्थगिती दिली गेली. शिवाय, मुलगी लहान असल्यानं सरला यांनी कमर्शियल पायलट बनण्याचा विचार सोडून दिला आणि त्या लाहोरला परतल्या. तिथल्या मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि बेंगाल स्कूल ऑफ पेंटिंग शिकत डिप्लोमा इन फाइन आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं.

हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!

पुढे 1948 साली त्या आर. पी. ठकराल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. एक यशस्वी उद्योजिका, चित्रकार आणि कपडे तसेच दागिने डिझायनर म्हणून त्यांनी नाव कमावलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी ज्वेलरी मेकिंग, साडी डिझायनिंग, पेंटिंग आणि डिझायनिंगची कामंही त्यांनी यशस्वीपणे हाताळली. 15 मार्च 2008 ला वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!