Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 15 जून 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 15 जून 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 25 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 15 जून 2025

वार : रविवार

तिथि : चतुर्थी 15:51

नक्षत्र : श्रवण 24:59

योग : एन्द 12:18

करण : कौलव 27:44

सूर्य : वृषभ

चंद्र : मकर

सूर्योदय : 06:00

सूर्यास्त : 19:17

पक्ष : कृष्ण

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

गलवान खोऱ्यातील संघर्षाची पाच वर्षे

एकीकडे संपूर्ण जग कोविड -19च्या महामारीला तोंड देत असताना भारत आणि चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 15 जून‌ 2020च्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताच्या एका कर्नलसह 20 जवान शहीद झाले. चीनचे जवळपास 40 सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येते. खिळे लावलेल्या लोखंडी रॉड्चा वापर हत्यार म्हणून चिनी सैनिकांनी केल्याचे आढळले. खरंतर, 2020मधील एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाला सुरुवात झाली होती. 15 जून 2020च्या संघर्षानंतर भारताने ऑपरेशन स्नो लेपर्ड सुरू केले. 1962च्या लढाईनंतर पहिल्यांदाच लडाखमध्ये सैन्यासह रणगाडे आणि इतर यंत्रसामग्रीची मोठ्या प्रमाणात जमवाजमव करण्यात आली. हा चीनसाठी एक मोठा धक्का होता आणि म्हणूनच त्यानंतरच्या काळात सैन्य माघारीवरील चर्चेसाठी चीन तयार झाला. अखेर 31 ऑक्टोबर 2024ला दोन्ही देशांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सरोजिनी वैद्य

प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. सरोजिनी वैद्य यांचा जन्म 15 जून 1933 साली पुण्यात झाला. 1956मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठात मराठी विषय घेऊन प्रथम क्रमांकाने एम.ए. पदवी प्राप्त केली. 1957 ते 1993 या काळात त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होत्या. मुंबई विद्यापीठात त्या मराठीच्या विभागप्रमुख होत्या. लोकहितवादी, काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्याबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांचे तत्कालीन महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी कादंबरी, काव्य, आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारांतील पुस्तकांची उत्तम समीक्षा केली. ‘माती आणि मूर्ती’ हे पुस्तक त्यांच्या समीक्षालेखनाचे विविध पैलू दाखवते. ‘गोपाळराव हरी’, ‘श्रीमती काशीबाई कानिटकर : आत्मचरित्र आणि चरित्र’, ‘इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर’, ‘कहाणी लंडनच्या आजीबाईची’, ‘वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन’ ही चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. भारतीय शिक्षण प्रतिष्ठानकडून त्यांना 1988मध्ये उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. सत्यशोधक पुरस्कार (ओतूर 1994) हा शैक्षणिक कार्यासाठीचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांचे 3 ऑगस्ट 2007 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!